Home /News /lifestyle /

'अतरंगी रे' मध्ये उल्लेख असणारा आजार PTSD म्हणजे नक्की काय? वाचा त्याची लक्षणं आणि उपाय

'अतरंगी रे' मध्ये उल्लेख असणारा आजार PTSD म्हणजे नक्की काय? वाचा त्याची लक्षणं आणि उपाय

जाणून घ्या PTSD ची लक्षणं

जाणून घ्या PTSD ची लक्षणं

भूतकाळातल्या एखाद्या वाईट घटनेमुळं हा विकार होतो. हा आजार झालेली व्यक्ती भूतकाळातल्या आठवणींमधून कधीच बाहेर पडू शकत नाही.

    मुंबई, 04 जानेवारी:  वाढते ताण-तणाव, बदलती आर्थिक-सामाजिक परिस्थिती आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना शारीरिक, तसेच मानसिक विकारांचा सामना करावा लागत आहे. पूर्वी मानसिक आजार (Psychological Disease) किंवा समस्या असल्यास त्यांची सार्वजनिक स्वरूपात चर्चा होत नसे. परंतु, आता अशी स्थिती राहिलेली नाही. लोक खुलेपणानं मानसिक समस्यांवर, विकारांविषयी चर्चा करताना दिसतात. अनेक वैद्यकीय संस्था, सामाजिक संस्था मानसिक आजारांविषयी जनजागृती करत आहेत. चित्रपटांच्या माध्यमातूनदेखील असे विषय हाताळले जात आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान अभिनित `अतरंगी रे` या चित्रपटातदेखील एका मानसिक विकाराबाबत भाष्य करण्यात आलं आहे. या चित्रपटात सारा अली खाननं (Sara Ali Khan) पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डरने (Post Traumatic Stress Disorder) पीडित असल्याचं दाखवलं गेलं आहे. या आजाराविषयीची माहिती `टीव्ही नाइन हिंदी`ने प्रसिद्ध केलं आहे. भूतकाळातल्या एखाद्या वाईट घटनेमुळं हा विकार होतो. हा आजार झालेली व्यक्ती भूतकाळातल्या आठवणींमधून कधीच बाहेर पडू शकत नाही. पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर अर्थात पीटीएसडीला (PTSD) शेल शॉक अथवा बॅटल फेटिंग सिंड्रोम असंही म्हणतात. या आजारानं ग्रस्त असलेली व्यक्ती भूतकाळातल्या (Past tense) घटना विसरू शकत नसल्यानं स्वतःला नुकसान पोहोचवू लागते. या आजारात रुग्णामध्ये तीव्र भीती, असहायता वारंवार निर्माण होते. लैंगिक किंवा शारीरिक अत्याचार, एखाद्या प्रिय व्यक्तीचा अचानक अथवा अपघाती मृत्यू आदी कारणांमुळे पीटीएसडी होण्याची शक्यता असते. cashew: यामुळेच काजू खाण्याचा होतो त्रास; जाणून घ्या कधी खाणं टाळायलाच हवं केवळ मानसोपचार तज्ज्ञच या आजारावर उपचार करू शकतात. हा आजार झालेल्या रुग्णांना अनेकदा समुपदेशन, संमोहन आणि औषधोपचारांचीही गरज पडते. बिहेवियरल थेरपी (Behavioral Therapy) या आजारावर गुणकारी ठरू शकते. या थेरपीमध्ये रुग्णाशी संवाद साधून, त्याला समजून घेतलं जातं आणि त्याच्या मनातले नकारात्मक विचार (Negative Thinking) आणि भीती काढून टाकली जाते. या आजारावर ट्रॉमाकेंद्रित सीबीटी (CBT) ही थेरपीही उपयुक्त ठरू शकते. ही थेरपी देताना ज्या घटनेमुळे रुग्णाला मानसिक धक्का बसला आहे, त्याविषयी खुलेपणानं चर्चा केली जाते. या माध्यमातून रुग्णाला मोकळेपणानं बोलतं केलं जातं. पीटीएसडी झालेल्या रुग्णाला रिप्रोसेसिंग थेरपीही (Reprocessing Therapy) दिली जाते. या थेरपीत रुग्णाला डॉक्टरांच्या बोटाकडे पाहून त्याच्या मानसिक आघाताविषयी बोलण्यास सांगितलं जातं. या आजारापासून मुक्त होण्यासाठी ही थेरपी सर्वोत्तम समजली जाते. काय सांगता! आपली पॉटीसुद्धा करता येते दान; पू डोनेशनबाबत कधी ऐकलं आहे का? पीटीएसडी या विकाराची काही लक्षणं आहेत. हा आजार झालेल्या व्यक्तींना रात्री वाईट स्वप्नं पडतात आणि या व्यक्ती स्वप्नातदेखील नेहमीच्या गोष्टींमध्ये अडकलेल्या असतात. ज्या घटनेचा या रुग्णावर परिणाम झाला आहे, तीच घटना त्यांना वारंवार आठवते. त्यामुळे रुग्ण त्यातून बाहेर पडू शकत नाही. भूतकाळातल्या घटनेत कायम राहणारे हे रुग्ण कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. हा आजार झालेले रुग्ण कालांतरानं चिडचिडे होतात. त्यांना कोणासोबतही बोलावंसं वाटत नाही. या रुग्णांना काही वेळा पॅनिक अॅटॅकदेखील (Panic Attack) येतात. तसंच या रुग्णांच्या स्मृतीवर परिणाम झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर निदान झाल्यावर रुग्णांनी तातडीनं मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला आणि उपचार घेणं आवश्यक आहे.
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Stress

    पुढील बातम्या