कॅनबेरा, 03 जानेवारी : रक्तदान, नेत्रदान, अवयवदान, शरीरदान तुम्हाला माहिती असेल. पण कधी मलदान ऐकलं आहे का? (Poo Donation). सध्या मलदानही चर्चेत आहे (Poo or Stool). ज्याच्या मदतीने आतड्यांसंबंधी किंवा पोटासंबंधी आजारांचा उपचार केले जात आहे. बरेच लोक फिकल ट्रान्सप्लांट किंवा स्टूल ट्रान्सप्लांट (Stool transplant) म्हणजे मल प्रत्यारोपण (Poo transplant) करून घेत आहेत. मानवी आतड्यांमध्ये काही बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया फक्त पचनक्रियेशी संबंधित काम करत नाहीत तर तुमची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करण्यात, शारीरिक आणइ मानसिक आरोग्य चांगलं राखण्यातही मदत करतात. काही अन्नपदार्थ आणि अँटिबायोटिक्स आपल्या आतड्यांमधील सूक्ष्म बॅक्टेरियांचं जग म्हणजे मायक्रोबायोटामध्ये बिघाड करत आहेत. काही लोकांचे मायक्रोबायोम इतकं बिघडतं की त्यांना बरं करण्यासाठी दुसऱ्या लोकांच्या मलाची गरज पडते. अशा वेळी निरोगी व्यक्तीचं मल आजारी व्यक्तीच्या आतड्यांमध्ये प्रत्यारोपित केलं जातं. ज्यामुळे त्यातील ताकदवान बॅक्टेरिया आपल्या शरीराला सुधारण्यात मदत करतात. आजार बरे होतात किंवा काही आजारांपासून बचाव करतात. मलदानात येणाऱ्या मलाला सुपर पू म्हटलं जात आहे आणि मलदान करणाऱ्या व्यक्तीला गूड पू डोनर्स. गूड पू डोनर्सना युनिकॉर्न्स म्हटलं जात आहे. कारण अशा व्यक्ती सापडणं खूपच कठीण आहे. द गार्डन च्या रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलियाच्या एडिलेटमधील बायोमबँकचे चीफ मेडिकल ऑफिसर सॅम कोस्टेलो आणि चीफ एक्झिक्युटिव्ह थॉमस मिशेल अशाच निरोगी लोकांच्या शोधात आहे, ज्यांच्याकडून उच्च गुणवत्तेचं मल मिळेल. ते मल दान करतील. त्यानंतर हे मल प्रयोगशाळेत संवर्धित करून ते प्रत्यारोपणा योग्य बनवलं जाईल. हे वाचा - सावधान! महिलांना त्रास देणाऱ्यावर आता ड्रोनचा वॉच; अवघ्या 4 मिनिटांतच मिळणार मदत सॅम कोस्टेलो सांगतात, माणूस असा एकमेव जीव आहे, ज्याचं शरीर म्हणजे बॅक्टेरियांचं भंडार आहे. त्याच्या शरीरात इतके वेगवेगळे बॅक्टेरिया असतात ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. काही बॅक्टेरियांचा तर अभ्यासही झालेला नाही. माणूस वेगवेगळे अन्नपदार्थ खातो. ज्यामुळे त्याच्या आतड्यांमध्ये आणि मलात लाखो बॅक्टेरिया असतात. आपण ज्या पद्धतीने खात आहोत त्यामुळे आपल्या आतड्याताली मायक्रोब्स नष्ट होत आहेत. जर हे पूर्णपणे नष्ट झाले तर आपलं शरीरही नष्ट होईल. अनेक आजार उत्पन्न होतील. शरीर योग्य पद्धतीने चालावं यासाठी शरीरात योग्य बॅक्टेरिया असायला हवेत. त्यामुळे जर आजार दुसऱ्याच्या मलाने ठिक करता येत असतील तर त्यात काहीच अडचण नाही. मलदानातून मिळालेल्या नमुन्याची तपासणी संस्थेतीत तज्ज्ञ डॉ. एमिली टकर करतात. त्या म्हणाल्या, त्या व्यक्तीचा मल घेण्याआधी त्याची तपासणी केली जाते. त्याची मेडिकल, ट्रॅव्हल आणइ अँटिबायोटिक हिस्ट्री तपासली जाते. त्या व्यक्तीला कोणता आजार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर त्याचं मल घेतलं जातं. ज्यांना मलदान करायचं आहे, त्यांच्यासाठी 8 आठवड्यांचा कार्यक्रम असतो. हे वाचा - आता प्रिस्क्रीप्शनमध्येच डॉक्टर देणार ‘हसण्याचं औषध’; नेमकी काय आहे संकल्पना? बायोमबँकमध्ये एक टॉयलेट बनवण्यात आलं आहे. या टॉयलेटमधून मल थेट लॅबच्या मशीनमध्ये जातो. तिथं त्यातून चांगले बॅक्टेरिया काढले जातात. सिक्रेट थेरेपीने त्याला अधिक चांगलं बनवलं जातं. वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी मल आणि त्यातील बॅक्टेरियात रसायनं मिसळली जातात ज्यामुळे बॅक्टेरियांची ताकद अधिक वाढते. त्यानंतर त्याला वेगवेगळ्या सीरिंजमध्ये भरून ठेवलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.