नवी दिल्ली, 03 जानेवारी : सुक्या मेव्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. थंडीचा ऋतुही सुरू असून त्यात सुक्या मेव्याचे सेवन शरीरासाठी अधिक चांगले असते. वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रायफ्रुट्समध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात. आज आपण काजूच्या सेवनाविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. काजूच्या (cashew ) फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास केवळ शरीरासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही काजू खाणे फायदेशीर मानले जाते. त्यात भरपूर पोषक घटक असतात. त्यात लोह आणि जस्त भरपूर प्रमाणात असते. अॅनिमियाच्या समस्येपासून आराम मिळण्यासाठी त्याचे सेवन चांगले आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, झिंक, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि लोह भरपूर प्रमाणात (side effects of cashew nuts) असते. इतके फायदे असूनही काजूचा शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो. तुम्ही गरजेपेक्षा जास्त काजू खात असाल तर ते फायद्यांऐवजी हानिकारक ठरू शकते. मात्र, अनेकांना याची माहिती नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो. याविषयी जाणून घेऊया. पोटाच्या समस्या पोट बिघडलेले असेल तर चुकूनही अशा स्थितीत काजूचे सेवन करू नये. यामुळे पोटाची समस्या आणखी वाढू शकते. असे सांगितले जाते की, काजू जास्त प्रमाणात खाल्ल्याने अपचन, जुलाब, गॅस आणि पोटात इतर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रोज काजू खा, पण जास्त प्रमाणात खाऊ नका. लठ्ठपणा काजूमध्ये भरपूर कॅलरीज असतात आणि ते जास्त प्रमाणात खाल्ले तर लठ्ठपणा येऊ शकतो. ज्या लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो त्यांना काजू न खाण्याचा सल्ला दिला जातो. दिवसातून 4 ते 5 काजू खाणे उत्तम आणि असे केल्याने तुम्हीही निरोगी राहाल. हे वाचा - Bathroom Stroke: हिवाळ्यात अंघोळ करताना होणारी ही चूक ठरू शकते जीवघेणी; बाथरूम स्ट्रोकबद्दल माहीत आहे का? अॅलर्जी कधी कधी काजू खाल्ल्याने अॅलर्जीचा त्रास होतो. अॅलर्जीमुळे आपल्या त्वचेवर खाज सुटू शकते किंवा पुरळ उठू शकतात. तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना अॅलर्जीची समस्या आधीपासून आहे, त्यांनी काजूचे सेवन टाळावे. त्यामुळे त्यांचा त्रास आणखी वाढू शकतो. हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात डोकेदुखी काजूमध्ये असलेले टायरामाइन आणि फेनिलेथिलामाइन हे अमिनो अॅसिड्स डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरू शकतात. ज्या लोकांना अनेकदा डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होतो, त्यांना काजू अजिबात न खाण्याचा सल्ला दिला जातो. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.