मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /नो फॉल्ट डिव्होर्स’ म्हणजे काय, कसा आणि कधी घेता येतो?

नो फॉल्ट डिव्होर्स’ म्हणजे काय, कसा आणि कधी घेता येतो?

नो फॉल्ट डिव्होर्स म्हणजे काय

नो फॉल्ट डिव्होर्स म्हणजे काय

नो फॉल्ट डिव्होर्सची ही पद्धत स्त्रियांसाठी धोकादायक ठरू शकते. याबाबत अजून काही अभ्यास झालेला नाही.

    मुंबई : जोडीदारासोबतच्या नात्यात कटुता आली, की एकत्र राहणं अवघड होतं. हळूहळू हे नातं तुटण्याच्या मार्गावर जातं. घटस्फोट घेऊन नातं औपचारिकदृष्ट्या संपवताही येतं, पण त्यामध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप होतात. मनस्ताप आणि आर्थिक त्रासही जास्त होतो. घटस्फोटाची ही क्लिष्ट व कटकटीची प्रक्रिया चुकीची ठरवून काही देशांनी आता ‘नो फॉल्ट डिव्होर्स’चा अवलंब करायला सुरुवात केली आहे. यात कोणत्याही ‘ब्लेम गेम’शिवाय नातं संपवलं जातं. ‘नो फॉल्ट डिव्होर्स’ म्हणजे काय?

    आज तकने दिलेल्या वृत्तानुसार जगभरात घटस्फोटांची संख्या वेगानं वाढतेय. अमेरिकेसारख्या देशात वर्षाला 4.5 दशलक्ष लग्न होतात, त्यापैकी 50 टक्के लग्न घटस्फोटानं तुटतात. जवळपास सगळीकडे हीच परिस्थिती आहे. घटस्फोटाची प्रक्रियाही मोठी आणि क्लिष्ट आहे. त्यासाठीच अनेक देश आता ‘नो फॉल्ट डिव्होर्स’चा अवलंब करत आहेत.

    Divorce: घटस्फोट घेण्याचं प्रमाण वाढलंय; यामागचं कारण वाचून बसेल धक्का

    रशियामध्ये जवळपास 100 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली होती. 1917 मध्ये बोल्शेविक क्रांती झाली. त्यावेळी व्लादिमिर लेनीन यांनी रशियाला आधुनिक देश बनवण्याचा निश्चय केला होता. त्यावेळी रशियात चर्चमध्येच लग्न व घटस्फोटही व्हायचे. खूश नसूनही लोक लग्नबंधनात राहू शकतात. केवळ शारीरिक हिंसा, फसवणूक या प्रकरणांमध्येच घटस्फोट मिळत असे. बोल्शेविक क्रांतीनंतर लग्नांवरचा धार्मिक पगडा कमी करण्यात आला. रशियन रजिस्ट्री ऑफिसमध्ये जाऊन लोक वेगळे होण्यासाठी अर्ज करू लागले. तिथे 3 दिवसांत दुसऱ्या पक्षाला नोटीस पोहोचून लगेचच घटस्फोटाचा निर्णय होऊ लागला.

    अशा घटस्फोटांमध्ये आरोप-प्रत्यारोप, वाद फारसे होत नव्हते. दाम्पत्याला मूल असेल, तर मात्र त्याची जबाबदारी आईवर येत असे. वडिलांनी त्याची जबाबदारी घेतली किंवा नाही, याबाबत न्यायालय हस्तक्षेप करत नसे. यामुळे लग्न वेगानं तुटू लागली. त्यानंतर सत्तेत आलेल्या जोसेफ स्टॅलिन यांनी या नव्या घटस्फोट पद्धतीला कुटुंब तोडणारी ठरवून विरोध केला. त्यांनंतर रशियातही इतर देशांप्रमाणेच घटस्फोटाची पद्धत रूढ झाली.

    Divorce पेपर्सवर सही करण्यापूर्वीच असं घडलं की ते दोन्ही पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात

    काय आहे ‘नो फॉल्ट डिव्होर्स’?

    सर्वसाधारणपणे घटस्फोट हवा असेल तर काही कारण द्यावं लागतं. न्यायालयात त्याची सत्यता पडताळली जाते. लग्न टिकवण्यासाठी अवधी दिला जातो, प्रयत्न केले जातात. त्यानंतरच घटस्फोट मिळतो. नो फॉल्ट डिव्होर्समध्ये कोणत्याही पक्षाला दुसऱ्यावर आरोप करण्याची आवश्यकता नसते.

    समोरच्याच्या चुका दाखवण्याची गरज नसते. केवळ नातं उरलं नाही हे कारण घटस्फोटासाठी पुरेसं असतं. प्रस्थापित घटस्फोटाच्या पद्धतीतील आरोप-प्रत्यारोप, बदनामी यांसारख्या गोष्टींमुळे अनेक देश आता नो फॉल्ट डिव्होर्सचा अवलंब करत आहेत. ब्रिटनमध्ये 2022 मध्ये नो फॉल्ट डिव्होर्सचा कायदा आला. त्यानुसार कोणताही एक पक्ष किंवा दोघंही मिळून घटस्फोटासाठी अर्ज करू शकतात. दोघांना तडजोडीसाठी 20 आठवड्यांचा वेळ दिला जातो. त्यानंतर घटस्फोट होतो.

    संमतीने घटस्फोट घेताना 'हे' बंधनकारक नाही; केरळ हायकोर्टाने घटस्फोट कायद्यातील हा नियम ठरवला घटनाबाह्य

    ब्रिटिश महिला टिनी ओवेन्स यांनी लग्नाला 40 वर्ष झाल्यानंतर घटस्फोटासाठी अर्ज केला. नवऱ्याविषयी त्यांची शारीरिक-मानसिक अत्याचाराची किंवा फसवणुकीची कोणतीही तक्रार नव्हती. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. 2018मध्ये त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यानंतर त्यांनी त्याविरोधात एक कॅम्पेन सुरू केलं. एकमेकांसोबत आनंदी न राहणं हेदेखील घटस्फोटासाठीचं कारण असू शकतं असं त्यांचं म्हणणं होतं.

    यातले धोके काय असू शकतात?

    नो फॉल्ट डिव्होर्सची ही पद्धत स्त्रियांसाठी धोकादायक ठरू शकते. याबाबत अजून काही अभ्यास झालेला नाही. मात्र समाजशास्त्रज्ञांच्या मते, याचा अवलंब केल्यावर पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त घटस्फोट घेतील. त्यानंतर ते मुलांची किरकोळ जबाबदारी घेतील व स्त्रियांवर दुप्पट भार पडेल. हार्वर्ड जर्नल ऑफ लॉ अँड पब्लिक पॉलिसीचे समाजशास्त्रज्ञ डगलस डब्ल्यू एलन यांच्या मते, संधीसाधू लोक याचा गैरफायदा घेऊ शकतात व त्यामुळे स्त्रिया एकट्या पडू शकतात.

    यूकेव्यतिरिक्त अमेरिकेतील काही राज्यं, चीन, माल्टा, स्वीडन, स्पेन आणि मेक्सिको इथं सध्या या डिव्होर्सला मान्यता मिळाली आहे. स्वीडनमध्ये यात थोडा बदल केलेला आहे. भारताततही परस्पर सहमतीनं घटस्फोट मिळतो. मात्र घटस्फोटासाठी दोन्ही पक्ष तयार असावे लागतात. दोघांनाही तडजोडीसाठी थोडा वेळ दिला जातो. तडजोड झाली नाही आणि दोघंही खूप काळ वेगळे राहिले असतील, तर परस्पर सहमतीनं घटस्फोट दिला जातो. नो फॉल्ट डिव्होर्समध्ये 3 महिन्यांच्या आत प्रकरण निकाली निघतं व घटस्फोट मिळतो.

    First published:
    top videos

      Tags: Divorce, Life18, Lifestyle