जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / मसल डिस्मॉर्फिया म्हणजे नक्की काय? तरुण पिढीला ठरतोय खूप घातक

मसल डिस्मॉर्फिया म्हणजे नक्की काय? तरुण पिढीला ठरतोय खूप घातक

मसल डिस्मॉर्फिया म्हणजे नक्की काय? तरुण पिढीला ठरतोय खूप घातक

मसल डिस्मॉर्फिया म्हणजे नक्की काय आणि त्याची लक्षणं कोणती याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 10 नोव्हेंब : फिटनेसविषयी हल्ली सर्वच वयोगटातल्या व्यक्तींमध्ये जागरूकता दिसून येते. त्यातही तरुण वर्ग नियमित जिमला जाणं, व्यायाम करणं, धावणं, ग्रीन टी पिणं आदी बाबींकडे अधिक लक्ष देतो. सुंदर चेहरा आणि सुडौल शरीर याचं आकर्षण अनेकांना असतंच. हल्लीच्या दगदगीच्या जीवनशैलीमुळे फिटनेसवर अधिक भर दिला जातो. परंतु, सध्या मसल डिस्मॉर्फियाची समस्या गंभीर बनत आहे. अनेकांना मसल डिस्मॉर्फियाबद्दल पुरेशी माहितीही नसते. मसल डिस्मॉर्फिया म्हणजे नक्की काय आणि त्याची लक्षणं कोणती याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. डिस्मॉर्फिक डिसॉर्डरची लक्षणं संशोधनात असं निदर्शनास आलंयं की अनेक जण हे डिस्मॉर्फिक डिसॉर्डरने ग्रासलेले आहेत. याला एक मानसिक आजार म्हणता येईल. अशा स्थितीत त्या व्यक्तीला कायम असं वाटत असतं, की आपलं शरीर सुडौल नाही. आपल्या शरीरात काही तरी कमतरता आहे. हे या आजाराचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. तसंच सतत नकारात्मक विचार करत राहणं, मेकअप आणि चांगले कपडे परिधान करून आपल्यातलं न्यून झाकण्याचा प्रयत्न करणं, सतत दुसर्‍याचं दिसणं, उठणं, बसणं, राहणीमान याच्याशी स्वत:ची तुलना करणं आदी लक्षणांचा यात समावेश होतो. तसंच कायम परफेक्ट दिसण्यासाठी प्रयत्न करणं हेदेखील याच डिसॉर्डरचं लक्षण आहे. हेही वाचा -  शरीरातील ऊर्जा कमी करतात ‘या’ 5 गोष्टी; लगेच रुटीनमध्ये करा बदल शरीरातल्या अवयवांमध्ये कमतरता शोधणं डिस्मॉर्फिक डिसॉर्डर तरुण पिढीत खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यात त्या व्यक्तीला कायम आपल्या धडधाकट अवयवांमध्येही वैगुण्य दिसत राहतं. जसं की, नाक सरळ नाही, त्वचेचा रंग, त्वचेवरच्या किंवा चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, शरीराचा बांधा (बॉडी शेप), स्तनांचा आकार, जननेंद्रियांमधलं वैगुण्य आदी गोष्टीबाबत तरुण पिढी खूप विचार करताना दिसते. हे एका विचित्र मनोवस्थेचं लक्षण आहे याची त्यांना जाणीव नसते. तज्ज्ञांच्या मते, हा मनोविकार एखाद्या महामारीसारखा पसरतो आहे. तरुण पिढी याच्या विळख्यात सापडत आहे. प्लास्टिक सर्जरी आणि सोशल मीडियामुळे या समस्येची तीव्रता वाढली आहे. अशी लक्षणं दिसल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. या मानसिक आजारात तरुण-तरुणींना आपण अधिक सुंदर, आकर्षक दिसावं अशी तीव्र इच्छा होत असते. मेयो क्लिनिकच्या रिपोर्टनुसार, हा मानसिक आजार असून, यात तरुण-तरुणी आपल्या दिसण्याबद्दल सतत विचार करतात. किंबहुना, ते याबाबत विचार करणं थांबवूच शकत नाहीत. शरीरातल्या वैगुण्यांवर सतत विचार केला जातो. त्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. इंटरनॅशनल ओसीडी (OCD - Obsessive Compulsive Disorder) फाउंडेशनच्या मते, 40% पुरुषांमध्ये आणि 60% महिलांमध्ये या आजाराची लक्षणं वयाच्या 12-13 व्या वर्षापासून दिसायला लागतात. मसल डिस्मॉर्फिया म्हणजे, धडधाकट अवयव किंवा धष्टपुष्ट शरीराबद्दल सतत विचार करत राहणं. वेबएमडीच्या रिपोर्टनुसार, मसल डिस्मॉर्फिया हा बॉडी डिस्मॉर्फिक डिसॉर्डरचाच एक प्रकार आहे. अशा मानसिकतेत व्यक्ती आपलं शरीर खूप कमकुवत झालंय असा विचार कायमकरते. खरं तर असा विचार करणार्‍यांपैकी अनेकांचं शरीर फिट असतं. मसल डिस्मॉर्फिया ही आता सर्वच वयोगटांत दिसून येणारी समस्या आहे. ही समस्या वैश्विक आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण, ब्रिटनमध्ये या समस्येविषयी एक सर्व्हे घेण्यात आला. त्यातल्या निरीक्षणानुसार 54 % पुरुष आणि 49% महिलांना या समस्येने ग्रासलेलं आहे. तसंच दर 10 माणसांमागे एक माणूस या समस्येने त्रस्त आहे. यूके कौन्सिल ऑफ फिजिओथेरेपी या संस्थेचे प्रवक्ते एरेन हादजियोनाऊ यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांच्या मते, आपल्याला डिस्मॉर्फिया समस्येने ग्रासलेलं आहे, याची कल्पनाच अनेकांना नसते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात