मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Badhaai Do मध्ये दाखवलंय Lavender Marriage, पण असं लग्न म्हणजे नेमकं काय हो?

Badhaai Do मध्ये दाखवलंय Lavender Marriage, पण असं लग्न म्हणजे नेमकं काय हो?

बधाई दो या चित्रपटामध्ये 'लव्हेंडर मॅरेज' (What is Lavender Marriage) ही कन्सेप्ट दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचा ट्रेलर (Badhai Do trailer) रिलीज झाल्यापासूनच या कन्सेप्टबद्दल लोकांच्या मनात बरंच कुतूहल निर्माण झालं आहे.

बधाई दो या चित्रपटामध्ये 'लव्हेंडर मॅरेज' (What is Lavender Marriage) ही कन्सेप्ट दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचा ट्रेलर (Badhai Do trailer) रिलीज झाल्यापासूनच या कन्सेप्टबद्दल लोकांच्या मनात बरंच कुतूहल निर्माण झालं आहे.

बधाई दो या चित्रपटामध्ये 'लव्हेंडर मॅरेज' (What is Lavender Marriage) ही कन्सेप्ट दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचा ट्रेलर (Badhai Do trailer) रिलीज झाल्यापासूनच या कन्सेप्टबद्दल लोकांच्या मनात बरंच कुतूहल निर्माण झालं आहे.

    मुंबई, 13 फेब्रुवारी: आपल्या हटके भूमिकांसाठी राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हे दोघेही कलाकार प्रसिद्ध आहेत. या दोघांचा 'बधाई दो' (Badhai Do movie) हा चित्रपट नुकताच (11 फेब्रुवारी 2022) रिलीज झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच दोन मेनस्ट्रीम कलाकार LGBTQ भूमिका साकारताना दिसले आहेत. दोन्ही मुख्य कलाकारांनी एलजीबीटीक्यू (LGBT+) समुदायातल्या व्यक्तींना दैनंदिन जीवनात कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाला पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसला, तरी समीक्षक आणि सोशल मीडियावर कित्येक प्रेक्षक या चित्रपटाचं कौतुक (Badhai Do review) करताना दिसून येत आहेत. या चित्रपटामध्ये 'लव्हेंडर मॅरेज' (What is Lavender Marriage) ही कन्सेप्ट दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचा ट्रेलर (Badhai Do trailer) रिलीज झाल्यापासूनच या कन्सेप्टबद्दल लोकांच्या मनात बरंच कुतूहल निर्माण झालं आहे.

    हे वाचा-पाहूया तुम्ही प्रेमाची ही परीक्षा पास करताय का; या फोटोत Heart balloon शोधा

    चित्रपटात दाखवलेलं ‘लव्हेंडर मॅरेज’ म्हणजे काय?

    चित्रपटामध्ये समलैंगिक पात्र साकारणारे राजकुमार राव आणि भूमी या दोघांचेही कुटुंबीय लग्नासाठी मागे लागलेले असतात. छोट्या शहरात राहत असलेले हे दोघे आपल्या इच्छांबाबत आणि समस्यांबाबत घरी सांगू शकत नसतात. त्यामुळे मग शेवटी कुटुंबीयांची तोंडं बंद करण्यासाठी हे दोघं एकमेकांशीच लग्न करण्याचा निर्णय घेतात. अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या समलिंगी (Homosexuals) व्यक्तींनी एकमेकांशी लग्न करण्यालाच 'लव्हेंडर मॅरेज' म्हणतात. अशा प्रकारच्या लग्नांना हे नाव का दिले गेले यामागची स्टोरीही अगदी रंजक आहे.

    शतकाहून जुनी आहे ही कन्सेप्ट

    तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल; मात्र लव्हेंडर मॅरेज ही कन्सेप्ट सुमारे शंभर वर्षांपूर्वीची आहे. विसाव्या शतकाच्या शेवटी हॉलिवूड (Lavender marriage in Hollywood) हळूहळू मोठी चित्रपटसृष्टी म्हणून उदयास येत होतं; मात्र त्या काळी समाजात समलिंगी संबंध किंवा समलिंगी असणंही आजप्रमाणे स्वीकारलं जात नव्हतं. त्यामुळे कित्येक सेलेब्रिटी आपली 'ती' ओळख लपवण्याचा प्रयत्न करत. यासाठीच ते आपल्याप्रमाणेच समलिंगी असणाऱ्या विरुद्धलिंगी व्यक्तीशी लग्न (Homosexual marrying another homosexual of opposite gender) करत होते. त्यामुळे सर्वांच्या समोर ते एक सर्वसामान्य विरुद्धलिंगी कपल (Heterosexual couple) असल्याप्रमाणे दिसेल. त्या काळी 'लव्हेंडर' रंग हा होमोसेक्शुअलिटीशी जोडला जात असे. त्यामुळे अशा प्रकारच्या लग्नांना 'लव्हेंडर मॅरेज' असं नाव पडलं.

    हे वाचा-भूमी पेडणेकरचा लेस्बियन Kissing सीन पाहून अशी होती तिच्या आईची रिअ‍ॅक्शन

    चित्रपट पूर्णपणे ‘ओरिजिनल’

    दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून साधारणपणे अशा प्रकारची कथा असलेल्या ‘टू वेडिंग्स अँड ए फ्युनेरल’ (Two weddings and a funeral) या कोरियन चित्रपटाचीही चर्चा सुरू झाली होती. 'बधाई दो' हा या कोरियन चित्रपटाचा रिमेक असल्याचं अनेक जण म्हणत होते; मात्र असं काही नसल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी (Harshvardhan Kulkarni) यांनी स्पष्ट केलं आहे. ज्याप्रमाणे प्रेमी युगुलं पळून जाऊन लग्न करण्याच्या घटना घडतात. त्याचप्रमाणे लव्हेंडर मॅरजच्या घटनाही होत असतात. त्यामुळे जगात या कन्सेप्टवर आणखी सिनेमे असणं ही साधारण बाब असल्याचं कुलकर्णी यांनी म्हटलं होतं.

    First published:
    top videos

      Tags: Bhumi pednekar, Rajkumar rao