जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Badhaai Do: Bhumi Pednekar चा लेस्बियन किसिंग सीन पाहून अशी होती तिच्या आईची रिअ‍ॅक्शन

Badhaai Do: Bhumi Pednekar चा लेस्बियन किसिंग सीन पाहून अशी होती तिच्या आईची रिअ‍ॅक्शन

Badhaai Do: Bhumi Pednekar चा लेस्बियन किसिंग सीन पाहून अशी होती तिच्या आईची रिअ‍ॅक्शन

Badhaai Do: साधारणतः प्रत्येक चित्रपट रिलीज होण्याआधी तो चित्रपटातले कलाकार आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही दाखवला जातो. त्यामुळे भूमीच्या ‘बधाई दो’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला तिची आईही आली होती. त्यावेळी मोठ्या पडद्यावर केलेला तो किसिंग सीन पाहून तिच्या आईची काय प्रतिक्रिया होती?

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 12 फेब्रुवारी: बॉलिवूडमध्ये सध्या धाडसी आणि हटके विषयांवर चित्रपट येत आहेत. अनेक अभिनेते आणि अभिनेत्रीही या सिनेमातून चौकटीबाहेरच्या भूमिका करताना दिसत आहेत. त्यामध्ये समलैंगिक संबंधांवरच्या (LGBTQ Relations) चित्रपटांचाही समावेश आहे. बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरही (Bhumi Pednekar) अशाच वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात भूमिका करताना दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘बधाई दो’ (Badhaai Do) असं आहे. या चित्रपटात भूमी एका लेस्बियनच्या भूमिकेत दिसणार आहे. राजकुमार राव आणि भूमी स्टारर (Rajkumar Rao and Bhumi Pednekar Badhaai Do) या चित्रपटाचं नुकतंच स्क्रीनिंग पार पडलं. तर शुक्रवारी (11 फेब्रुवारी) रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. साधारणतः प्रत्येक चित्रपट रिलीज होण्याआधी तो चित्रपटातले कलाकार आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही दाखवला जातो. त्यामुळे भूमीच्या ‘बधाई दो’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला तिची आईही आली होती. हा चित्रपट ‘लव्हेंडर मॅरेज’वर आधारित असल्यामुळे यामध्ये भूमीचा दुसऱ्या अभिनेत्रीसोबत किसिंग सीन आणि रोमान्सही दाखवण्यात आला आहे. मग यावर तिच्या आईची नेमकी काय प्रतिक्रिया होती, याबाबत भूमीने सांगितलं. भूमीच्या आईने तिच्या प्रत्येक आवडीचा स्वीकार केला आहे; पण तिला कधी ऑनस्क्रीन समलैंगिक सेक्स करताना पाहिलं नव्हतं. भूमीने हा चित्रपट तिच्या आईसोबत पाहिला आणि चित्रपट पाहून झाल्यावर भूमीने आईला विचारलं की, ‘अभिनेत्रीसोबत मला ऑनस्क्रीन रोमान्स करताना पाहून तुला काही वेगळं वाटलं का?’ तेव्हा तिची आई म्हणाली, ‘काहीच वेगळं वाटलं नाही.’

    जाहिरात

    हा चित्रपट करताना तिच्या स्वतःच्या विचारसणीतही बदल होत असल्याचं भूमीला जाणवलं होतं. ‘बधाई दो’नंतर समलैंगिक व्यक्ती आणि त्यांच्या नात्यांबाबतच्या विचारांमध्ये बदल झाल्याचं भूमीने सांगितलं. हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकाचंही जजमेंट वेगळं असेल, असं ती सांगते. ‘या चित्रपटामुळे माझ्या डोक्यामध्ये जे काही कमी-जास्त गैरसमज होते तेही दूर झाले. या चित्रपटामुळे मला एक चांगली व्यक्ती बनण्यात मदत केली आहे,’ असं ती म्हणाली. हे वाचा- नकुशी मालिकेतील अभिनेत्रीचं पार पडलं लग्न, आता परदेशात होणार स्थायिक? ‘बधाई दो’ या चित्रपटात भूमी आणि राजकुमार राव यांची जोडी असून त्यांचं लग्नही दाखवलं आहे; पण ते लग्न फक्त समाजाला दाखवण्यासाठी असतं. चुम दरांग या अभिनेत्रीने भूमी पेडणेकरसोबत चित्रपटात लेस्बियन व्यक्तिरेखा साकारली आहे. ती अरुणाचल प्रदेशातली आहे. भूमी आणि फीमेल रोमान्स या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हर्षवर्धन कुलकर्णीने केलं आहे. हलक्याफुलक्या कॉमेडीतून एक गंभीर संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. कारण आपल्याकडे आजही समलैंगिक संबंध सहजासहजी स्वीकारले जात नाहीत. भूमीच्या मते हा चित्रपट जरी लव्हेंडर मॅरेजवर असला तरी तो कुटुंबासोबत बसून पाहिला पाहिजे. तसं आवाहन तिने तिच्या सर्व चाहत्यांना केलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात