मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Flat, Plus, Upto Discount; बम्पर सेलमध्ये शॉपिंग करण्यापूर्वी या ऑफर्सचा अर्थ नक्की समजून घ्या

Flat, Plus, Upto Discount; बम्पर सेलमध्ये शॉपिंग करण्यापूर्वी या ऑफर्सचा अर्थ नक्की समजून घ्या

जपून करा ऑनलाईन शॉपिंग

जपून करा ऑनलाईन शॉपिंग

डिस्काउंटचं तंत्र नीट जाणून घ्या आणि मगच खरेदी करा.

    मुंबई, 01 ऑक्टोबर : सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. दसरा, दिवाळी तोंडावर आहेत. सण, उत्सव म्हटले की शॉपिंग आलीच आणि सणांच्या निमित्ताने बंपर सेल (Bumper sale) ऑफर्सही आल्याच (Discount on shopping). दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ई-कॉमर्स कंपन्यांनीही (E-Commerce Companies) आतापासूनच सेलची (Sale) धामधूम सुरू केली आहे. कोरोना साथीच्या काळात ऑनलाइन शॉपिंगची (Online Shopping) सेवा अधिकच सोयीची ठरल्याने मोठ्या संख्येनं लोक याकडे वळले आहेत. याचा फायदा घेण्यासाठी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आदी दिग्गज ई-कॉमर्स कंपन्यांनी सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये मिळणाऱ्या आकर्षक सवलती, सूट, भेटवस्तू यांचा फायदा घेण्यासाठी ग्राहकवर्गही उत्सुक असून हे सेल कधी सुरू होतायत याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. मात्र सेलमध्ये दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या डिस्काउंटसाठी (Discounts) वेगवेगळ्या अटी असतात.

    सेलमध्ये फ्लॅट डिस्काउंट (Flat Discount), पर्सेंटेज प्लस डिस्काउंट (Percentage Plus Discount) आणि अप टू डिस्काउंट (UPTO Discount) असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट दिले जातात. याचा नेमका अर्थ काय असतो, याची माहिती घेऊन मग खरेदी करणं अधिक फायद्याचं ठरतं.

    फ्लॅट डिस्काउंट

    फ्लॅट डिस्काउंट (Flat Discount) म्हणजे तुम्हाला जितका डिस्काउंट जाहीर केला आहे, तेवढे टक्के रक्कम वस्तूच्या किमतीतून (Price) कमी केली जाते. समजा 30 टक्के डिस्काउंट जाहीर करण्यात आला असेल, तर त्या वस्तूच्या किमतीच्या 30 टक्के रक्कम कमी करून त्या किमतीला ती वस्तू तुम्हाला दिली जाईल.

    हे वाचा - काळ आला होता वेळ नाही! एका घड्याळानेच वाचवला तरुणाचा जीव

    म्हणजे तुम्हाला त्या वस्तूची फक्त 70 टक्के किंमत द्यावी लागेल. अनेकदा कंपन्या काही ठरविक वस्तूंवरच असा फ्लॅट डिस्काउंट जाहीर करतात. त्यामुळे त्याकडे लक्ष देणं आवश्यक असतं. फ्लॅट डिस्काउंटमध्ये अधिक फायदा होऊ शकतो.

    पर्सेंटेज प्लस डिस्काउंट

    पर्सेंटेज प्लस डिस्काउंट (Percentage Plus Discount) म्हणजे दोन डिस्काउंट दिले जातात; मात्र ते एकत्रित नसतात तर एकावर एक असतात. अनेकदा डिस्काउंट जाहीर करताना 30 प्लस 10 टक्के असं लिहिलेलं असतं. 30 अधिक 10 म्हणजे 40 टक्के असा अर्थ अनेक ग्राहक घेतात; पण इथेच त्यांची फसगत होते. या 30 अधिक 10 चा अर्थ असतो, की तुम्ही घेतलेल्या वस्तूच्या किमतीवर आधी 30 टक्के डिस्काउंट आणि तो देऊन जी किंमत येते त्यावर आणखी 10 टक्के डिस्काउंट दिला जाईल.

    हे वाचा - ...तर बंद होईल तुमचं Netflix, Hotstar आणि Amazon Prime

    उदाहरणार्थ, 1000 रुपये किमतीची वस्तू असेल तर 30 टक्के डिस्काउंट दिल्यानंतर तिची किंमत होईल 700 रुपये. त्यानंतर त्या 700 रुपयांवर 10 टक्के म्हणजे 70 रुपये आणखी डिस्काउंट दिला जाईल. म्हणजे तुम्हाला ती वस्तू 630 रुपयांना मिळेल.

    अप टू डिस्काउंट

    डिस्काउंटचा आणखी एक प्रकार असतो तो म्हणजे अप टू डिस्काउंट (UPTO Discount). अनेकदा फ्लॅट डिस्काउंटबरोबरच अप टू 1000 किंवा एक ठराविक रक्कम लिहिलेली असते. याचा अर्थ असा असतो, की तुम्हाला त्या रकमेपर्यंतचाच डिस्काउंट मिळेल. समजा तुम्हाला 50 टक्के डिस्काउंटनुसार, 1100 रुपये डिस्काउंट मिळत आहे; पण अप टू 1000 रुपये डिस्काउंट असल्याने तुम्हाला एक हजार रुपयेच सवलत मिळेल.

    हे वाचा - 'या' नंबरचे शूट घालणारे पुरुष असता विश्वासघातकी; नव्या संशोधनातून अनोखी माहिती

    त्यामुळे ऑनलाइन किंवा ऑफलाइन शॉपिंग करताना डिस्काउंट कसे जाहीर केले आहेत याची नीट माहिती करून घ्या आणि मगच खरेदी करा. आता सध्या तर ई-कॉमर्स कंपन्यांचे मोठे सेल सुरू होणार आहेत. सवलतींचा वर्षाव अशी खासियत असणाऱ्या या कंपन्यांच्या डिस्काउंटचं तंत्र नीट जाणून घ्या आणि मगच खरेदी करा. सेलमध्ये खरेदी करण्याचा तुमचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल.

    First published:

    Tags: Lifestyle, Online shopping, Shopping, Technology