मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /'या' नंबरचे शूट घालणारे पुरुष असता विश्वासघातकी; नव्या संशोधनातून अनोखी माहिती समोर

'या' नंबरचे शूट घालणारे पुरुष असता विश्वासघातकी; नव्या संशोधनातून अनोखी माहिती समोर

1. पाय हलवणं - ज्योतिषशास्त्रानुसार, सतत पाय हलवण्याचा अर्थ असा होतो की, तुमचा चंद्र कमजोर आहे. पाय सतत हलत असतील, म्हणजे तुमच्या मनात सतत काहीतरी चालू आहे. जे लोक रिकाम्या वेळी किंवा बसून पाय हलवतात ते मानसिकदृष्ट्या कमकुवत असतात आणि त्यांच्या या सवयींमुळे मानसिक तणाव निर्माण होतो.

1. पाय हलवणं - ज्योतिषशास्त्रानुसार, सतत पाय हलवण्याचा अर्थ असा होतो की, तुमचा चंद्र कमजोर आहे. पाय सतत हलत असतील, म्हणजे तुमच्या मनात सतत काहीतरी चालू आहे. जे लोक रिकाम्या वेळी किंवा बसून पाय हलवतात ते मानसिकदृष्ट्या कमकुवत असतात आणि त्यांच्या या सवयींमुळे मानसिक तणाव निर्माण होतो.

कोणत्या क्रमांकाची पादत्राणं (Shoes) वापरणारी माणसं जास्त धोकादायक असतात, हे या संशोधनातून समोर आलं आहे.

    नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : प्रेमाचं (Love) नातं (Relation) हे खरं तर विश्वासावर अवलंबून असतं. एखाद्याच्या मनात धोका देण्याचा विचार आला, तर हे नातं टिकणं मुश्किल असतं. कोणाच्या मनात धोका देण्याचा विचार येतोय किंवा येऊ शकतो, हे शोधणं तसं अवघड असतं; मात्र आता एका संशोधनामुळे याबाबत लोकांना मदत करणं शक्य होत आहे. कोणत्या क्रमांकाची पादत्राणं (Shoes) वापरणारी माणसं जास्त धोकादायक असतात, हे या संशोधनातून समोर आलं आहे.

    यूकेतली प्रसिद्ध डेटिंग वेबसाइट असलेल्या `एलिसित एन्काउंटर्स`ने हे संशोधन केलं आहे. पायाचा आकार मोठा (Big Feet) असलेले पुरुष (Men) आपल्या जोडीदाराला धोका देण्याची शक्यता अधिक असल्याचं या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. ज्या पुरुषांच्या पायाचा आकार लहान असतो, असा पुरुष आपल्या जोडीदाराप्रति जास्त प्रामाणिक असतो. या संशोधनात 2 हजार पुरुषांचा समावेश करण्यात आला होता. त्यांच्या पायाच्या आकाराच्या आधारे, तज्ज्ञांनी असा निष्कर्ष काढला, की ज्या पुरुषांच्या पायाचा आकार 10 किंवा त्यापेक्षा जास्त आहे, ते त्यांच्या जोडीदाराला अगदी सहजपणे फसवतात. 7 किंवा त्यापेक्षा कमी साइजचे शूज वापरणारे पुरुष आपल्या जोडीदाराप्रति अधिक प्रामाणिक असतात.

    ज्यांचे विवाहबाह्य संबंध (Extra Marital Affairs) आहेत, अशा 2 हजार पुरुषांचा या संशोधनात समावेश करण्यात आला होता. यात 11 नंबरचे शूज वापरणाऱ्या 29 टक्के पुरुषांनी त्यांच्या जोडीदाराला धोका दिल्याचं स्पष्ट झालं. 10 नंबरचे शूज वापरणारे 25 टक्के पुरुष हे फसवणूक करणारे होते. 12 नंबरचे शूज वापरणाऱ्या 22 आणि 13 नंबरचे शूज वापरणाऱ्या 21 टक्के पुरुषांमध्ये फसवणुकीची प्रकरणं निदर्शनास आली. वेबसाइटच्या प्रवक्त्या जेसिका लेओनी यांनी याबाबत सांगितलं, की पायाचा आकार मोठा असलेल्या पुरुषांमध्ये फसवणुकीची किंवा धोका देण्याची प्रवृत्ती असण्यामागं काही कारणं आहेत.

    हे ही वाचा-Success Story: निवडुंगाच्या फळांचा ज्यूस विकून शेतकरी झाला लखपती; प्रयोगातून यश

    ज्या पुरुषांच्या पायाचा आकार 10 पेक्षा अधिक होता, ते पुरुष उंच होते. उंची जास्त असल्याने ते लक्षवेधी ठरत होते. या कारणामुळे ते अधिक महिलांच्या संपर्कात येतात. खरं तर आजपर्यंत लोकांचा असा समज होता. परंतु, आता संशोधनातून हे सिद्ध झालं असल्याचं जेसिका लेओनी यांनी सांगितलं. या संशोधनाचे निष्कर्ष समोर आल्यानंतर त्यावर वाद निर्माण झाले आहेत. 10 पेक्षा जास्त नंबरच्या चपला घालणाऱ्या अनेक पुरुषांनी यावर आक्षेप घेऊन, आम्ही आमच्या जोडीदाराला आजपर्यंत कधीही धोका दिलेला नाही, असा दावा केला आहे. फसवणूक करण्याचा संबंध हा पायाच्या आकारमानाशी नसून माणसाच्या मनोवृत्तीशी आहे, अशा कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत.

    First published:

    Tags: Love