दिल्ली, 4 जानेवारी: प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला आपण सुंदर दिसावं, आपली त्वचा (Skin) तजेलदार दिसावी, असं वाटतं. यासाठी बहुतांश लोक बाजारात उपलब्ध असणाऱ्या सौंदर्य प्रसाधनं (Cosmetics) आणि त्वचेशी संबंधित औषधांचा वापर करतात. काही लोक आपल्या त्वचेच्या आरोग्याप्रती अधिकच दक्ष असतात. यासाठी हे लोक वैद्यकीय सल्ला आणि उपचारांचाही आधार घेतात. मात्र बोटॉक्स (Botox) आणि फिलर्स (Fillers) या ट्रीटमेंटचा वापर करून त्वचेची निगा राखणं शक्य आहे. ही एक प्रकारची अँटिएजिंग ट्रीटमेंट (Anti-Ageing Treatment) आहे. या ट्रीटमेंटमुळं कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तसेच ही ट्रीटमेंट वेदनारहित मानली जाते. सध्याच्या काळात विशेषतः तरुणींमध्ये ही ट्रीटमेंट चर्चेचा विषय ठरली आहे. याबाबतची माहिती `
टीव्ही नाइन हिंदी`ने दिली आहे.
बोटॉक्स आणि फिलर्स ट्रीटमेंट सुरक्षित आणि प्रभावी मानली जाते. यामुळे त्वचा तजेलदार (Bright) आणि आकर्षक (Attractive) होते. ही एक सर्जिकल ब्युटी ट्रीटमेंट (Surgical Beauty Treatment) आहे. चेहरा (Face) अधिक चांगला दिसावा आणि त्यावर वृद्धत्वाची लक्षणं दिसू नयेत, यासाठी ही ट्रीटमेंट फायदेशीर ठरते. बोटॉक्स ट्रीटमेंट चेहऱ्यावरील स्नायूंना रिलॅक्स करते.
सुकून गेलीत का तुमची महागडी मेकअप प्रोडक्ट्स?फेकून देण्यापूर्वी हे सोपे उपाय करा
त्वचेवरील डाग दूर होतात तर फिलर्समुळे चेहऱ्यावरील खोलवर असलेल्या सुरकुत्या नाहिशा होतात. परंतु, फिलर्स केल्यानंतर संबंधित व्यक्तीनं दक्षता घेणं गरजेचं असतं. चेहऱ्यावर फिलर्स केल्यावर मसाज करू नये. तसेच चेहऱ्यावरील त्वचेला संसर्ग झाला असेल तर फिलर्स करणं टाळावं. ही ट्रिटमेंट घेतल्यानंतर काही दिवस धूळीत आणि कडक उन्हात जाणं टाळावं. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणि देखरेखीखाली ही ट्रीटमेंट करावी.
एखाद्याला जांभई देताना पाहून आपल्यालाही का येते जांभई? काय आहे यामागचं कारण?
त्वचेच्या आरोग्यासाठी बोटॉक्स ट्रीटमेंट फायदेशीर ठरते. चेहरा पातळ करण्यासाठीदेखील ट्रीटमेंट उपयुक्त ठरते. बोटॉक्स ट्रीटमेंट केल्यानंतर काही तास संबंधित भागावर मसाज करणं टाळावं. या ट्रीटमेंट नंतर सौंदर्य प्रसाधनं वापरण्याची फारशी गरज भासत नाही. तसेच फिलर्स ट्रीटमेंट घेतल्यास मृत त्वचा तजेलदार होण्यास मदत होते. या ट्रीटमेंटमध्ये त्वचेच्या पृष्ठभागावर लहान आणि पातळ सुईने इंजेक्शन दिले जाते. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात.
या दोन्ही ट्रीटमेंट सुंदर दिसण्याची इच्छा असणाऱ्यांकरिता `जादुची कांडी` ठरतात. उपकरणांव्दारे केल्या जाणाऱ्या या ट्रीटमेंटमुळे चेहरा आणि त्वचा सुंदर आणि आकर्षक होते. या ट्रीटमेंट घेताना कोणत्याही स्वरुपाचा त्रास किंवा नुकसान होत नाही. त्यामुळे विशेषतः महिलांचा या ट्रीटमेंटकडे कल अधिक असतो. चेहऱ्यावरील त्वचेच्या कोणत्याही समस्येवर या ट्रीटमेंट घेणं फायदेशीर ठरतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.