मुंबई, 01 जानेवारी : आजच्या काळाच फक्त महिलाच नाही तर पुरुषही स्वत:ला परफेक्ट लूक देण्यासाठी विविध प्रकारच्या मेकअप प्रोडक्ट्सचा (Makeup Products) वापर करतात. बरेच लोक ब्रँडेड मेकअप उत्पादने वापरतात, जी खूप महाग असतात. परंतु, अनेकदा असे घडते की त्यांचा जास्त वापर न केल्यामुळे ती कोरडी होऊ लागतात. त्याला मग अनेकजण निरुपयोगी समजून फेकून देतात. त्यादरम्यान कदाचित या वस्तू कालबाह्य झालेल्या नसतातही. याचे कारण असे की, काहींना असं वाटतं की ही मेकअप प्रॉडक्ट कोरडी झाल्यानंतर त्यांचा काहीच उपयोग होणार नाही, परंतु तसे नाही. तुम्ही ही मेकअप उत्पादने पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं नव्यासारखी वापरू शकता. फक्त यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. त्याबद्दल (Tips To Reuse Makeup Products) जाणून घेऊया. सुकलेल्या काजळावर हा उपाय करा काजळ किंवा लिक्विड काजळ जर सुकलं असेल आणि त्यामुळं तुमचं काम नीट होत नसेल तर त्यावर एक सोपा उपाय करा. सुकलेल्या काजळामध्ये तुमच्या घरात उपलब्ध असलेले कोणतेही आय ड्रॉप्सचे काही थेंब घाला. आणि चांगले मिक्स करा, त्यानंतर काजळ पूर्वीसारखे काम करू लागेल. तुटलेली कॉम्पॅक्ट पावडर कॉम्पॅक्ट पावडर तुटली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी पावडरचे तुकडे झिप बॅगमध्ये ठेवा आणि ते चांगले ठेचून बारीक पावडर बनवा. नंतर एका स्वच्छ डब्यात ठेवा आणि पावडरमध्ये अल्कोहोलचे काही थेंब मिसळा आणि ते ओले करा. याला चिकट करण्यासाठी टिश्यू पेपरने दाबा आणि कॉम्पॅक्ट रात्रभर कोरडे होऊ द्या आणि नंतर वापरा. सुकलेली लिक्विड लिपस्टिक तुमची लिक्विड लिपस्टिक सुकली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी त्यात खोबरेल तेलाचे काही थेंब टाका आणि चांगले मिसळा. नंतर थोडा वेळ नीट हलवत राहा आणि दुसऱ्या दिवसापासून वापरा. लिक्विड सिंदूर सुकल्यावर जर लिक्विड सिंदूर सुकली असेल तर ती नीट करण्यासाठी सिंदूरमध्ये गुलाबजलाचे काही थेंब मिसळा आणि कुपी चांगली हलवा. हा उपाय करन ती तुम्ही पूर्वीप्रमाणे वापरू शकाल. हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात नेल पेंट सुकल्यावर नेल पेंट सुकल्यावर, ते दुरुस्त करण्यासाठी त्यात एसीटोनचे काही थेंब घाला. त्यानंतर काही वेळ नेल पेंटची कुपी हलवत राहा. यामुळे तुम्ही ती नव्या सारखी पुन्हा वापरू शकाल. हे वाचा - Kidney Care Tips: किडनी निकामी करण्यास कारणीभूत ठरतात या 5 गोष्टी; आहारातील प्रमाण असावं मर्यादितच तुटलेली आयशॅडो कशी दुरुस्त करावी तुटलेली आयशॅडो दुरुस्त करण्यासाठी, त्याचे तुकडे प्लॅस्टिकच्या झिप लॉक बॅगमध्ये ठेवा, काहीतरी दाबा आणि त्याची बारीक पावडर बनवा. नंतर ही पावडर एका स्वच्छ डब्यात घेऊन त्यात काही थेंब पाणी मिसळून त्याची घट्ट पेस्ट बनवा. यानंतर, आयशॅडोवर टिश्यू लावून ते स्मूथ करा आणि नंतर टिश्यू काढून टाका. आयशॅडो रात्रभर कोरडे होऊ द्या आणि नंतर वापरा. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







