Home /News /lifestyle /

एखाद्याला जांभई देताना पाहून आपल्यालाही का येते जांभई? काय आहे यामागचं कारण?

एखाद्याला जांभई देताना पाहून आपल्यालाही का येते जांभई? काय आहे यामागचं कारण?

अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये असलेल्या प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीने (Prinston University research on yawning) प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, जांभईचा संबंध थेट मेंदूशी आहे. खरंतर जांभई म्हणजे मेंदूचे तापमान नियंत्रित (Yawning maintains brain temperature) करण्यासाठी होत असलेली प्रक्रिया असते.

पुढे वाचा ...
मुंबई, 3 डिसेंबर : कित्येक वेळा दुसऱ्या कोणाला तरी जांभई देताना पाहून आपल्यालाही जांभई येते. अशावेळी आपल्याला ना झोप आलेली असते, ना आपण थकलेले असतो; मात्र तरीही आपण जांभई (Why do we yawn) देतो. असं का होतं याचा वैज्ञानिकांनी शोध लावला आहे. विशेष म्हणजे, आपल्याला जांभई का येते यामागेही खरंतर एक वेगळंच कारण (Reason behind yawning) असल्याचं समोर आलं आहे. हे कारण काय आहे, याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. कित्येक वेळा जांभई आल्यानंतर यामागे झोप आली आहे, किंवा कंटाळा आला आहे असा तर्क लावला जातो. मात्र, यामागे वेगळंच कारण (Science of yawning) असल्याचं स्पष्ट झालं आहे. अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये असलेल्या प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीने (Prinston University research on yawning) प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, जांभईचा संबंध थेट मेंदूशी आहे. खरंतर जांभई म्हणजे मेंदूचे तापमान नियंत्रित (Yawning maintains brain temperature) करण्यासाठी होत असलेली प्रक्रिया असते. जेव्हा वातावरणातील तापमान कमी होते, तेव्हा शरीराचे तापमान वाढते, आणि वातावरणातील तापमान वाढल्यावर शरीराचे तापमान कमी होत असते. अशा वेळी मेंदू शरीरातील अधिक ऑक्सिजन वापरून आपले तापमान नियंत्रित ठेवतो. घरगुती सिलेंडरवर लिहिलेल्या नंबर्समध्ये दडलंय मोठं सिक्रेट, अर्थ समजून घ्या नक्कीच फायदा होईल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 160 लोकांवर संशोधन केले. यातील 80 लोकांचे उन्हाळ्यात आणि 80 लोकांचे हिवाळ्यात निरीक्षण करण्यात आले. यामध्ये संशोधकांना समजले, की उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात लोक अधिक प्रमाणात जांभई (Humans yawn more in winters) देतात. TV9 हिंदीने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. दुसऱ्यांना पाहून आपल्यालाही का येते जांभई? जगभरातील जवळपास 50 टक्के लोक समोरच्या व्यक्तीला जांभई देताना पाहून स्वतः जांभई (50% people copy others yawning) देतात. एवढंच नाही, तर टीव्ही स्क्रीनवर जरी कोणाला जांभई देताना पाहिलं, तरी लोक जांभई देत असल्याचं एका संशोधनात समोर आलं आहे. असं का होतं, हे जाणून घेण्यासाठी जर्मनीतील म्यूनिक येथे असणाऱ्या सायकॅट्रिक युनिव्हर्सिटी रुग्णालयाने 300 लोकांवर संशोधन केलं होतं. या संशोधनात सहभागी झालेल्या लोकांना इतर लोक जांभई देतानाचे व्हिडीओ दाखवण्यात आले. यात संशोधकांना दिसून आलं, की व्हिडीओ पाहणाऱ्या सर्व लोकांनी किमान एकदा, तर काहींनी तब्बल 15 वेळा जांभई दिली. Kidney Care Tips: किडनी निकामी करण्यास कारणीभूत ठरतात या 5 गोष्टी; आहारातील प्रमाण असावं मर्यादितच यासाठी मेंदूमधील मिरर न्यूरॉन सिस्टीम (Mirror neuron system) कारणीभूत असल्याचं संशोधकांना समजलं आहे. मिरर न्यूरॉन सिस्टीम ही आपल्याला दुसऱ्या व्यक्तीची नक्कल करण्यासाठी प्रवृत्त करते. यामुळेच अगदी टीव्ही स्क्रीनवर किंवा मग फोनवरही एखाद्याला जांभई देताना पाहिलं वा ऐकलं की आपणही जांभई देतो.
First published:

Tags: Health

पुढील बातम्या