जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Weirdest Beer : हत्तीच्या शीपासून तर कधी मानवी सुसूपासून, अशा बनवल्या जातात या 7 विचित्र बिअर

Weirdest Beer : हत्तीच्या शीपासून तर कधी मानवी सुसूपासून, अशा बनवल्या जातात या 7 विचित्र बिअर

Weirdest Beer : हत्तीच्या शीपासून तर कधी मानवी सुसूपासून, अशा बनवल्या जातात या 7 विचित्र बिअर

बिअर हे जगातील सर्वात जुन्या पेयांपैकी एक आहे. ख्रिस्तपूर्व 5000 वर्षांपूर्वी ते बनवले गेल्याचे पुरावे आहेत. आताच्या काळातही हे पेय चहा आणि कॉफीनंतर जगातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 ऑक्टोबर : अल्कोहोलिक पेयांमध्ये, पाणी आणि चहानंतर बिअर हे जगातील सर्वात लोकप्रिय पेय असल्याचे म्हटले जाते. साधी नेहमीची बियर तर सर्वाना माहित असेल पण जगात काही अगदी विचित्र बियरसुद्धा आहेत. तुम्हाला त्यांच्याबद्दल महिती आहे का? बियरचा इतिहास इतका जुना आहे, त्यामुळे त्यात अनेक प्रयोग देखील करण्यात आले आहेत. त्यामुळे मानवांना अशी बिअर चाखायला मिळाली ज्याची सामान्य लोक कल्पनाही करू शकत नाहीत. येथे अशातच काही अनोख्या आणि विचित्र बिअरबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. या आहेत जगातील काही विचित्र बिअर उन-कोनो-कूरो (Un Kono Kuro) कॉफीपासून बनवली जाणारी ही एक जपानी बिअर आहे. ही बियर बनवण्यासाठी वापरण्यात येणारी कॉफी आधी हत्तींला खायला दिली जाते आणि हत्तीच्या पॉटीबरोबर बाहेर आलेल्या कॉफी बीन्सपासून ही बिअर बनवली जाते. ही कॉफी हत्तीच्या पोटातील उष्णतेने कॉफी भाजली जाते आणि नंतर पॉटीमधून निवडून त्याची बिअर बनवली जाते. त्यामुळे बिअरमध्ये कॉफीची वेगळीच चव येते. ही बिअर खूप महाग आहे. कारण हत्तीला भरपूर कॉफी दिली जाते. परंतु पॉटीमधून कॉफी खूपच कमी प्रमाणात बाहेर येते. (Photo Credit : ahsokajt instagram)

जेवणानंतर गोड खाल्ल्याने वाढतं वजन; तज्ज्ञांनी दिला कंट्रोल करण्याचा रामबाण उपाय

सपोरो स्पेस बार्ली (Sapporo Space Barley) अजतकने दिलेल्या माहितीनुसार, ही बिअर अंतराळात उगवलेल्या विशिष्ट प्रकारच्या धान्यापासून बनवली जाते. ही बिअर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांवर पिकवलेल्या धान्यापासून सपोरो ब्रुअरीज लिमिटेडने तयार केली आहे आणि ती मर्यादित प्रमाणात आहे. या बियरच्या विक्रीतून मिळालेली रक्कम वैज्ञानिक कामांसाठी दान केली जाते.

News18लोकमत
News18लोकमत

द एंड ऑफ हिस्ट्री (The End of History) ही बिअर स्कॉटलंडच्या ब्रूडॉग कंपनीने तयार केली आहे. यात 55 टक्क्यांहून अधिक अल्कोहोल आहे. बिअरचा दर्जा काहीही असला तरी तिची बाटली अतिशय विचित्र आहे. ही बाटली स्टोट (stoat) आणि खार या प्राण्यांच्या त्वचेने कव्हर करण्यात आली येते. मात्र हे सर्व प्राणी रस्ते अपघातात बळी पडले होते. या बिअरच्या फक्त 12 बाटल्या तयार करण्यात आल्या होत्या. एका बाटलीची किंमत 20 हजार डॉलर्स होती. (Photo Credit : Uncrate.com) स्नेक वेनम (SNAKE Venom) या बिअरचे नाव जरी सापाचे विष असे असले तरी विष अजिबात नसते. मात्र ती जगातील सर्वात स्ट्रॉग बिअर असल्याचा दावा केला जातो. यात 67.5 टक्के अल्कोहोल असते. हे प्रमाण व्हिस्की, रम, वोडका यांसारख्या हार्ड ड्रिंक्सपेक्षा जास्त आहे. ही बिअर स्कॉटलंडमध्ये तयार केली जाते. यात चेरी आणि सफरचंदची चव मिसळली जाते. ही बिअर जास्त प्रमाणात पिल्यास घातक ठरू शकते. वाइन तज्ञ एका वेळी फक्त 35 मिली पिण्याची शिफारस करतात, तीही हळूहळू. (Photo Credit : snake_venom_beer) गोस्ट फेस किलाह (Ghost face Killah) मिरचीपासून बनवलेली ही बिअर अमेरिकेच्या कोलोरॅडो राज्यात तयार केली जाते. 5.2 टक्के अल्कोहोल असलेली ही एक माईल्ड बिअर आहे. ही बिअर एकाहून एक गरम मिरचीपासून बनवली जाते, ज्यात जालापीनो, हाबानेरो, सेराना, फ्रेस्नो, अनाहिम मिरची आणि गोस्टसारख्या मिरचीच्या प्रकारांचा समावेश असतो. ही बिअर एढी तिखट आहे की भल्याभल्यांना पिणे कठीण होते. (Photo Credit : Uncrate.com) फॉसिल फ्यूल्स (Fossil Fuels) ही बिअर अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात तयार करण्यात आली होती. एका मायक्रोबायोलॉजिस्टने 1995 मध्ये केलेल्या संशोधनादरम्यान एका जीवाश्मामध्ये 45 दशलक्ष वर्ष जुने यीस्ट सापडले. त्यापासून या बिअरचे उत्पादन करण्यात आले. सर्वात जुन्या यीस्टमुळे तयार झालेल्या या बिअरची चव पूर्णपणे वेगळी आहे. (Photo Credit : fossilfuelsbeer) Diwali 2022 : मिठाई कितीही खाल्ली तरी काही फरक पडणार नाही; फक्त खाण्याची पद्धत बदला फुल सर्कल (Full Circle) अमेरिकेतील सॅन दिएगो शहरातील स्टोन ब्रुअरीने ही बिअर बनवली. ही बिअर पुनर्वापर केलेल्या नाल्याच्या पाण्यापासून तयार करण्यात आली होती. या बिअरमध्ये वापरलेले पाणी घाणेरडे वाटू शकते,परंतु पुनर्वापर केल्यानंतर ते बिअरला वेगळी चव देते. दरम्यान डेन्मार्कमध्ये काही लोकांनी बिअरवर भलताच प्रयोग केला. या प्रयोगात 2015 मध्ये रॉकस्लाइड म्युझिक फेस्टिव्हल दरम्यान लोकांकडून 50 हजार गॅलन सुसू गोळा करण्यात आली आणि त्यापासून पिसनर बिअर तयार करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात