बीजिंग, 12 जुलै : तंत्रज्ञान क्षेत्रात चीन (China) आघाडीवर आहे. अत्याधुनिक तंत्रनिर्मितीतही चीन अग्रेसर आहे. एकीकडे जगाला आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देणारा हा देश, आजही आपल्या रुढी, प्रथा, परंपरा जपताना दिसतो. यातल्या काही परंपरा विचित्रही आहेत; मात्र त्या जपण्याकडे चिनी माणसाचा कल आहे. लवकरच आई-वडील होणाऱ्या जोडप्याच्या अनुषंगाने चीनमध्ये अशीच एक विचित्र प्रथा रूढ आहे.
चीनमधल्या डॉग मीट फेस्टिव्हल सारख्या (Dog Meat Festival) चित्रविचित्र परंपरांविषयी (weird Tradition) तुम्हाला माहिती असेलच. चीनमध्ये अशीच एक अनोखी प्रथा आहे, की जी आई-वडील होणाऱ्या जोडप्यासाठी (Couple) असते. खरंतर गर्भवती महिलांच्या अनुषंगाने अनेक भागांत विविध प्रथा-परंपरा रूढ असतात. या सर्व प्रथा-परंपरा गर्भवती महिलांसाठी (Pregnant Women) लाभदायक समजल्या जातात. चीनमध्ये अशी एक परंपरा आहे, की ज्याविषयी जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल.
आता श्वानही करणार स्काय डायव्हिंग? दुर्गम भागात उपयोगासाठी रशियाकडून पाऊल
चिनी संस्कृतीच्या रिवाजानुसार, पती आपल्या गर्भवती पत्नीला उचलून घेऊन जळत्या कोळशांवरून (Burning Coal) चालतो. आपल्या गर्भवती पत्नीला घेऊन तिचा पती धगधगत्या कोळशांवरून निर्धारित अंतर पार करू शकला तर त्याच्या पत्नीची प्रसूती अत्यंत सुलभ होते, असं मानलं जातं. ही प्रथा पाळल्यास तिला प्रसूतिवेदना (Labour Pains) कमी तीव्रतेच्या होतात आणि बाळाचा सुलभ रीतीने जन्म होतो, असा समज आहे. पुरुष या अत्यंत अवघड सोहळ्यात का सहभागी होतात, याचं कारण ऐकून तुम्ही क्षणभर आश्चर्यचकित व्हाल. गर्भावस्थेत बाळाच्या आईच्या शरीरात 9 महिने अशा हॉर्मोन्सची निर्मिती होते, की ज्यामुळे त्या महिलेला मूड स्विंगसह अन्य समस्यांचा सामना करावा लागतो. तसंच त्यांना वेदनाही खूप होतात. त्यामुळे पिता होण्याचा आपला प्रवासही सहज आणि सुलभ नसावा, असा तिथल्या पुरुषांचा समज असल्याने ते या अवघड अशा पारंपरिक सोहळ्यात सहभागी होतात.
अनेक देशांत इंटरनेटच्या स्वायत्ततेवर हल्ले, पिचाईंच्या बोलण्याचा रोख कुणाकडे, भारत की चीन?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Pregnant woman