जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ...म्हणून हिवाळ्यात दही खायचं ते मातीच्या भांड्यातीलच; फायदे वाचून थक्क व्हाल

...म्हणून हिवाळ्यात दही खायचं ते मातीच्या भांड्यातीलच; फायदे वाचून थक्क व्हाल

...म्हणून हिवाळ्यात दही खायचं ते मातीच्या भांड्यातीलच; फायदे वाचून थक्क व्हाल

आपल्याकडे मातीच्या भांड्याला पर्याय आहेत. मात्र मातीच्या भांड्यात दही बनवण्याचे वेगळे फायदे आहेत. मातीच्या भांड्यात दही बनल्याने केवळ त्याची चवच नाही तर गुणवत्ताही वाढते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 डिसेंबर : दही सर्वांच्याच आहाराचा भाग असतो. बरेच लोक चांगल्या आरोग्यासाठी नियमितपणे दही खातात. दही खाल्याने पोटाचे आरोग्य चांगले राहते. काही लोक बाहेरूनच दही आणून खातात तर काही लोकांना घरी बनवलेले दही आवडते. मात्र दही बनवण्यासाठी आपण कोणते भांडे वापरतो. बरेच लोक स्टीलच्या भांड्यामध्ये दही बनवतात. तुम्ही कधी मातीच्या भांड्यात बनवलेल्या दह्याची चव चाखली आहे का? आपल्या पूर्वजांपासून मातीच्या भांड्यात दही बनवण्याची परंपरा चालत आलेली आहे. आता आपल्याकडे मातीच्या भांड्याला पर्याय आहेत. मात्र मातीच्या भांड्यात दही बनवण्याचे वेगळे फायदे आहेत. मातीच्या भांड्यात दही बनल्याने केवळ त्याची चवच नाही तर गुणवत्ताही वाढते.

प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिताय ना? ही गंभीर बाब वेळीच समजून घ्या

मातीच्या भांड्यात दही बनवण्याचे फायदे - झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा दही मातीच्या भांड्यात बनवले जाते किंवा साठवले जाते तेव्हा त्याला मातीसारखा वास येतो. त्यामुळे दह्याची चव आणखी छान लागते.

News18लोकमत
News18लोकमत

- दही बनवण्यासाठी विशिष्ट तापमान आवश्यक असते. उन्हाळ्यात दही सहज बनते. परंतु हिवाळ्यात ते बनणे थोडे अवघड होते. अशावेळी जर तुम्ही मातीच्या भांड्यात दही साठवले तर ते दही इन्सुलेट होईल आणि हिवाळ्यातही ते लवकर सेट होईल. - जर तुम्हाला घट्ट दही आवडत असेल तर तुम्ही मातीच्या भांड्यातच दही बनवावे. कारण मातीची भांडी पाणी शोषून घेतात. त्यामुळे दही घट्ट होते. स्टील किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यात असे होत नाही. वजन कमी करायचंय? मग हे ट्रेंडी पदार्थ करतील मदत, वाचा सविस्तर - मातीच्या भांड्यात दही बनवल्याने आणि साठवल्याने शरीरासाठी आवश्यक नैसर्गिक खनिजे मिळतात. ज्यामध्ये लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांचा समावेश होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात