मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /दररोज अंघोळ करणं बरं नव्हे; हेल्दी राहण्याऐवजी उलट आजारीच पडाल

दररोज अंघोळ करणं बरं नव्हे; हेल्दी राहण्याऐवजी उलट आजारीच पडाल

दररोज अंघोळ करण्याचे साइड इफेक्ट्स.

दररोज अंघोळ करण्याचे साइड इफेक्ट्स.

दररोज अंघोळ करण्याचे साइड इफेक्ट्स.

    मुंबई, 29 जुलै : शरीराच्या स्वच्छतेसाठी आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी (Health) दररोज आंघोळ (Bath) करावी, असं आपल्याला अगदी लहानपणापासून शिकवलं जातं. ही शिकवण आपण कायमस्वरूपी अंमलात आणतो. परंतु, दररोज आंघोळ (Bathing) करणं खरंच गरजेचं आहे का? यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं का? असे प्रश्न तुम्हाला कधी पडले आहेत का?  तुम्हाला आश्चर्य वाटेल पण खरंतर तज्ज्ञांच्या मते, दररोज अंघोळ (Daily bathing) करूच नये. दररोज अंघोळ करणं आरोग्यासाठी धोकादायक असतं.

    रोजच्या अंघोळीमुळे आपल्या शरीराला फारसा फायदा (Benefits of bathing) होत नाही; मात्र एक दिवसाआड अंघोळ केल्यास निश्चित फायदा होऊ शकतो, असं ब्राइट साइडच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

    रोज अंघोळ केल्याने त्वचेवरच्या सूक्ष्मजीवांचं संतुलन बिघडतं. त्यामुळे शरीर संसर्गाला (Infection) अधिक संवेदनशील होतं. रोगप्रतिकारशक्तीला प्रोत्साहन मिळण्यासाठी बॅक्टेरियाची (Bacteria) गरज असते. रोज आंघोळ केल्याने रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होऊन ती कमकुवत होण्याची शक्यता असते. प्रमाणापेक्षा अधिक वेळा अंघोळ केल्यास अॅलर्जी होण्याचा धोका असतो. कारण त्वचेवरचं अॅसिड मेंटल खराब झाल्यास बाहेरील जीवजंतूंशी लढण्याची त्वचेची (Skin) क्षमता कमी होते. त्वचेवरची सर्व घाण साफ केल्यास त्याचा थेट परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर (Immunity) होतो. यामुळे अॅलर्जी, अस्थमा, इतकंच नाही तर मधुमेह होण्याचा धोकाही वाढतो.

    हे वाचा - त्वचेसाठी वरदान ठरतात किचन मधले ‘हे’ पदार्थ; फेस पॅक वापरून घालवा चेहऱ्याचे डाग

    तुम्ही रोज गरम पाण्याने (Hot Water) आंघोळ करत असाल, तर तुमची त्वचा स्वच्छ दिसेल. परंतु यामुळे तुम्हाला अकाली वृद्धत्वाचा (Premature Aging) सामना करावा लागू शकतो. त्वचेचा बाह्य थर जाड असतो. हा जाड थर त्वचा तरुण दिसावी याकरिता ओलाव्याच्या सुरक्षाकवचाखाली बंद असतो. त्वचा वारंवार धुतल्याने किंवा घासल्याने हे सुरक्षाकवच घटू शकतं. यामुळे त्वचा कोरडी होऊन त्यावर सुरकुत्या पडू शकतात.

    जेवल्यानंतर लगेच आंघोळ केल्यास वजन (Weight) वाढण्याची शक्यता असते. अन्नपचनासाठी पोटात योग्य रक्तप्रवाह कार्यान्वित होणं गरजेचं असतं. आंघोळ केली तर शरीराचं तापमान पटकन कमी होतं. यामुळे पचनशक्तीवर परिणाम होऊ शकतो. सातत्याने अशा प्रकारे आंघोळ केली, तर पचनशक्तीवर परिणाम होऊन वजन वाढण्याचा धोका संभवतो.

    हे वाचा - फक्त एका फोटोवरून ओळखा तुमचे डोळे किती निरोगी? घरच्या घरी करा ही सोपी EYE TEST

    दररोज केस (Hair) धुतल्याने ते चांगले आणि चमकदार होतात; पण तुम्ही रोज केस धुत असाल तर त्यामुळे सीबमचा बाहेरचा थर कमी होतो. हा थर सुरक्षाकवच म्हणून काम करत असतो. त्यामुळे त्वचेवरची सूक्ष्म छिद्रं हा थर आणखी बनवण्याचं काम करू लागतात. यामुळे डोक्यावरच्या त्वचेवर खाज आणि जळजळ जाणवू लागते आणि छिद्रं बंद होऊ शकतात. याचा थेट परिणाम केसांच्या वाढीवर होतो.

    First published:
    top videos

      Tags: Health, Lifestyle