मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही; घरच्या घरीच कोरोना रुग्णांना बरं करणार Pfizer चं औषध

रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही; घरच्या घरीच कोरोना रुग्णांना बरं करणार Pfizer चं औषध

प्रायमरी कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त होत आहे

प्रायमरी कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त होत आहे

चाचणी यशस्वी झाल्यास या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनावरील (Pfizer corona pill) हे औषध उपलब्ध होईल.

  नवी दिल्ली, 28 एप्रिल : सध्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी (Coronavirus treatment) वेगवेगळी औषधं वापरली जात आहे. आता लवकरच कोरोनावर एक औषध (Corona medicine)  उपलब्ध होणार आहे. हे औषध कोरोना रुग्णांना घरच्या घरीच बरं करणार आहे. रुग्णालयात जाण्याचीही गरज पडणार नाही. फायझर (Pfizer) कंपनीने कोरोनावरील (Pfizer corona pill)  हे औषध तयार केलं आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत हे औषध उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

  कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे करणाऱ्या या औषधाच्या चाचण्या सध्या अमेरिका (America)आणि बेल्जियममधील (Belgium)फायझर कंपनीच्या रिसर्च आणि टेस्टींग फॅसिलिटीज विभागात सुरू आहेत. या चाचणी यशस्वी झाल्यास या वर्षाखेरीपर्यंत या गोळीचं उत्पादन सुरू होईल आणि कोरोना संसर्गातून बरं होण्यासाठी हा एकमेव सोपा उपाय  ठरेल.

  ही गोळी प्रोटीज इनहिबिटिंग (Protease Inhabiting) या तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे तंत्रज्ञान एचआयव्ही-एड्स (HIV-Ads)विरोधात यशस्वी ठरलं आहे.

  हे वाचा - EXPLAINER : लसीकरणापूर्वी, लस घेताना आणि लसीकरणानंतर, काय काळजी घ्याल?

  फायझरच्या औषधी रसायनशास्त्र विभागाचे संचालक डेफिड ओवेन म्हणाले की, सध्याच्या महासाथीदरम्यान अँटिव्हायरल गोळी सुरुवातीपासूनच विकसित केली गेली होती. 210 संशोधकांच्या एकत्रित प्रयत्नातून कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस एक किलोग्रॅम औषध ऑर्डरनुसार तयार केले होते, असं वृत्त द टेलिग्राफने दिले.

  फायझर याविषयी अत्यंत सावधपणे काम करत असल्याने गोळीविषयी तपशील मिळालेला नाही. तथापि जगभरातील आरोग्य सेवा प्रणालीवरील दबाव आम्ही निश्चित कमी करू असं आश्वासन देण्यात आलं आहे. अधिक गंभीर रुग्णांवर रुग्णालयं आणि डॉक्टर याद्वारे उपचार करु शकतील. कारण ही गोळी घेतलेल्या रुग्णास रुग्णालयात भरती होण्याची आवश्यकता भासणार नाही.

  हे वाचा - Alert: RT-PCR चाचणी निगेटिव्ह, तरीही कोरोनाची लक्षणं दिसतायत? काय करायचं?

  कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळेआरोग्य यंत्रणांवर (Health System) मोठा ताण आल्याने ती कोलमडून गेली आहे. परिणामी कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ होताना दिसत आहे. भारतात गेल्या 24 तासांत 3.23 लाख नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दररोज तीन लाखांवर नव्या रुग्णांची नोंद होत आहे. ही स्थिती पाहता कोरोनातून असंख्य असहाय्य रुग्णांचे प्राण वाचावेत या उद्देशाने फायझर लवकरात लवकर या औषधाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करणार आहे.

  फायझर, रोचे आणि अॅस्ट्राझेनेका (Astrazenca) यासह अनेक कंपन्या कोरोनावर लाभदायी ठरुूशकणाऱ्या गोळ्यांच्या स्वरुपातील अँटिव्हायरल संशोधन करत असल्याचे एपी वृत्तसंस्थेच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

  First published:

  Tags: Corona, Coronavirus