जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Weekend होईल खास, मुंबईत या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यालगत सजलेत सुंदर पार्क-गार्डन्स, एकदा नक्की भेट द्या

Weekend होईल खास, मुंबईत या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यालगत सजलेत सुंदर पार्क-गार्डन्स, एकदा नक्की भेट द्या

Weekend होईल खास, मुंबईत या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यालगत सजलेत सुंदर पार्क-गार्डन्स, एकदा नक्की भेट द्या

मॉर्किंग वॉक ते संध्याकाळचा फेरफटका मारण्यासाठी तसंच लहान मुलांना खेळण्यासाठी अतिशय सुंदर विविध रंगी गार्डन्स मुंबईत सजलेली आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 मार्च : मुंबईत अनेक गार्डन्स, पार्क आहेत. मॉर्किंग वॉक ते संध्याकाळचा फेरफटका मारण्यासाठी तसंच लहान मुलांना खेळण्यासाठी अतिशय सुंदर विविध रंगी गार्डन्स मुंबईत सजलेली आहेत. कोरोना काळात गार्डन, पार्क बंद ठेवण्यात आले होते. परंतु आता पुन्हा हळू-हळू गार्डन सुरू करण्यात आले आहेत. प्रियदर्शनी पार्क (Priyadarshini Park) - मलबार हिल रोड इथे असलेलं हे गार्डन लहान मुलांच्या खेळण्यासाठी, स्पोर्ट्ससाठी, वर्कआउटसाठी, जॉगिंग-वॉकिंगसाठी प्रसिद्ध आहे. अतिशय मोठं असलेलं हे गार्डन समुद्रकिनाऱ्यालगत आहे. संध्याकाळी 8 वाजता हे बंद होतं. पत्ता - Nepeansea Rd, मलबार हिल, मुंबई - 400006 फोन - 022 2363 7186 हँगिंग गार्डन (Hanging Gardens) - हे गार्डन फिरोजशाह मेहता गार्डन म्हणूनही ओळखलं जातं. कमला नेहरु पार्कच्या अगदी समोर हे आहे. प्राण्यांच्या आकारात कोरलेली अनेक झाडं इथे आहेत. पत्ता - Ridge Rd, सिमला नगर, मलबार हिल, मुंबई - 400006

हे वाचा -  Libraries: वाचनप्रेमींची हक्काची जागा! मुंबईतील या ठिकाणी मिळतील हवी ती पुस्तकं

अमरसन्स गार्डन (Amarsons Garden) - पाम ट्री, समुद्रकिनारी असलेलं हे गार्डन विकेन्डसाठी नक्कीच खास ठरू शकतं. रात्री 9 वाजता हे बंद होतं. पत्ता - 76, भुलाभाई देसाई मार्ग, ब्रीच कँडी, कुंबला हिल, मुंबई - 400026 Victoria Gardens (Jijamata Udyan) - वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान मुंबईतील सर्वात जुनं गार्डन आहे. याला भायखळा प्राणीसंग्रहालय राणीची बाग असंही म्हटलं जातं. आधी व्हिक्टोरिया गार्डन म्हणून हे प्रसिद्ध होतं. पत्ता - रेल्वे स्टेशन, लालबाग फ्लायओव्हर, भायखळा - पूर्व - 400027

हे वाचा -  24 Hours Medical: नवी मुंबईत इथे मिळेल औषधांची फ्री होम डिलीव्हरी

कमला नेहरू पार्क (Kamala Nehru Park) - मलबार हिल येथील हँगिंग गार्डनचा हा भाग आहे. म्हातारीचा बूट म्हणूनही हे गार्डन अतिशय पॉप्युलर आहे. मुलांना खेळण्यासह, जॉगिंग-वॉकिंगसाठीही मोठ्या जागेत हे पार्क आहे. पत्ता - बाबुलनाथ, दादीशेठ वाडी, मलबार हिल, मुंबई - 400006 जॉगर्स पार्क (Joggers Park) - समुद्रकिनाऱ्यालगत असलेलं हा जॉगिंग ट्रॅक आहे. हा जॉगिंग ट्रॅक 400 मीटर लांब आहे. मुंबईतील वांद्र्ये इथे हे जॉगर्स पार्क आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात