जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / लग्नात मेहुण्या नवरदेवाचे शुज का लपवतात? या मागचं कारण माहितीय का?

लग्नात मेहुण्या नवरदेवाचे शुज का लपवतात? या मागचं कारण माहितीय का?

सोर्स : Google

सोर्स : Google

नवऱ्याची चप्पल किंवा शूज लपवण्याची पद्धत. हे का केलं जातं हे अनेकांना माहिती नाही. चला याच परंपरेबद्दल जाणून घेऊ.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. त्यामुळे तुम्हाला जिकडे तिकडे लग्नच पाहायला मिळतील. तसे पाहाता लग्नात अनेक चालीरिती-परंपरा असतात. ज्याबद्दल अनेकांना ठावूक नसतं किंवा काही लोकांना असं का केलं जातं, यामागचं शास्त्रीय कारण माहिती नसतं. सगळेच करतात म्हणून लोक ते करत असतात. त्यांपैकीच एक आहे नवऱ्याची चप्पल किंवा शूज लपवण्याची पद्धत. हे का केलं जातं हे अनेकांना माहिती नाही. चला याच परंपरेबद्दल जाणून घेऊ. जेव्हा नवरा लग्नाच्या मंडपात प्रवेश करतो, तेव्हा तो मंडपाबाहेर त्याची चप्पल काढतो. या दरम्यान, वधूची बहीण किंवा तिचे मित्र नवऱ्याचे शूज गायब करतात. काही ठिकाणी हळद उतरवणी किंवा पाचपरतावनाला देखील असं करण्याची परंपरा आहे. Lagna Vidhi Marathi : मराठी लग्नात सीमांत पूजन का केलं जातं? शुज लपवल्यानंतर ते शुज परत घेण्यासाठी नवऱ्याला मुलीकडच्यांना पैसे द्यावे लागतात. तर आणि तरच त्याला शुज परत मिळतात. शूज लपवण्याचा असा एक विधी आहे, ज्याद्वारे वराचे व्यक्तिमत्व तपासले जाते. असे म्हटले जाते की, एखाद्या व्यक्तीच्या शूजमुळे त्याची अनेक रहस्ये उघड होतात. जेव्हा मेहुनी आपल्या भावोजीचे शुज चोरते, तेव्हा एक प्रकारे ही भावोजीच्या संयमाची परीक्षा असते. याशिवाय भावोजी किती हुशारीने त्याच्या मेहुण्यांकडून आपले बूट परत घेऊ शकतो हेही पाहायला मिळते. ज्यामुळे त्याचा व्यवहारीकपणा देखील समोर येतो. लग्नासाठी नवरा-बायकोच्या वयात किती अंतर असावं? सायन्स काय सांगतं? शुज लपवण्याच्या विधीमागे आणखी एक तर्क दिला जातो. असे म्हणतात की निरोपाच्या वेळी बहुतेक लोक रडायला लागतात, मग शूज लपवण्याच्या विधीमुळे तेथे आनंदी वातावरण निर्माण होते. या विधीच्या वेळी तिथे बसलेल्या पाहुण्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटते. म्हणून ही परंपरा आहे. बुटांची चोरी करण्याच्या विधीमुळे दोन कुटुंबातील नाते दृढ होते असे देखील काही वडीलधारी माणसं सांगतात. या विधीने वधू-वरांची कुटुंबे एकमेकांशी बोलतात आणि समन्वय वाढू लागतो. यामुळे नात्यातील एकमेकांवरील विश्वासही वाढतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात