रोज प्या 5 हेल्दी ड्रिंक; डायबेटिज रुग्णांसाठी आहेत संजीवनी
आजच्या काळात मधुमेह एक गंभीर समस्या बनली आहे. मधुमेह पूर्णपणे बरा होत नसला तरी, नियंत्रणात ठेवला जाऊ शकतो
|
1/ 8
डायबेटिज मुळे अवयावांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हृदयविकर होण्याचा धोका जास्त असतो. किडनी आणि युरिनची समस्या देखील उद्भवू शकते.
2/ 8
त्यामुळे रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी डायबेटिज रुग्णांनी फळं,हिरव्या भाज्या आणि तांदूळ यांचा आपल्या आहारात समावेश करावा. काही खास ड्रिंकही डायबेटिजमध्ये फायदेशीर ठरू शकतात.
3/ 8
ग्रीन टी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खुप फायदेशीर आहे. यात कर्बोहायड्रेट आणि कॅलरीज खुप कमी असतात. ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात ऍन्टीऑक्सिडन्ट असतात. त्यामुळे डायबेटीज रुग्णांसाठी आणि हृदयासाठी खुप फायदेशीर आहे.
4/ 8
कारल्याचा रस मधुमेहासाठी खुप फायदेशीर आहे. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात रहाते. कारल्याचा रस ग्लूकोजचं प्रमाण नियंत्रणात ठेवतं आणि पोटाच्या अनेक आजारातही फायदा होतो.
5/ 8
नारळ पाण्यात व्हिटॅमीन,खनिज आणि अमीनो ऍसिड सारखे पौष्टिक घटक नारळ पाण्यात मुबलक प्रमाणात असतात. पोटॅशियम,कॅल्शिय,मॅग्नेशियम,व्हिटॅमिन सी,सोडियम आणि मॅंगनीज सारखे घटक नारळात आढळतात. नारळ पाण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
6/ 8
काकडीमध्ये कॅल्शियम,आयर्न,फॉस्फरस,व्हिटॅमिन ए,बी 1,व्हिटॅमिन सी आणि अमीनो ऍसिड असतात. काकडीचा रस शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतो.
7/ 8
त्याबरोबर उष्णता,संसर्ग,जळजळ आणि संधिवा कमी करण्यासाठी देखील काकडी फायदेशीर आहे. काकडी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि शरीर थंड राहतं. काकडीचा रस मधुमेहासाठी एक चांगलं पेय आहे.
8/ 8
कॅमोमाईल चहामध्ये कमी कॅलरीज आणि ऍन्टीऑक्सिडन्ट भरपूर प्रमाणात असतात. कॅमोमाईल चहा टाइप 2 डायबेटीजमध्ये ग्लायसेमिक नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे. नियमित घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी,किडनी आणि डोळे निरोगी राहतात.