बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक सेलिब्रिटी (Celebrity) सुडौल बांधा, आरोग्यासाठी नेमका आहार कसा आणि कोणता असावा, याविषयीचा सल्ला प्रख्यात डाएटीशियन ऋजुता दिवेकर यांच्याकडून सातत्याने घेत असतात. त्यात बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरचा (Actress Kareena Kapoor) समावेश आहे. करिनाच्या डाएटीशियन अशीही ऋजुता यांची ओळख आहे. हे वाचा - कोरोनामुक्त रुग्णाला नीट चालता-बोलता येईना; मेंदूत जे सापडलं ते पाहून डॉक्टर शॉक ऋजुता दिवेकर यांची केवळ सेलिब्रिटी डाएटीशियन अशी ओळख नसून, त्या व्यायाम, आहार- विहाराविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये केस गळतीची समस्या दिसत आहे. यावर ऋजुता दिवेकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत काही मार्गदर्शक टिप्स दिल्या आहेत. केस गळती थांबण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात याविषयी ऋजुता यांनी सांगितलं, दररोजचा नाश्ता (Breakfast) टाळू नये. वेळेवर झोपणं आणि दैनंदिन आहारातून भात (Rice) वगळू नये. यामुळे तुमच्या केसांचं पोषण होऊन केस गळती थांबेल. हे वाचा - सणासुदीला गावाबाहेर जायचा प्लॅन करण्यापूर्वी जाणून घ्या नवे नियम ऋजुता दिवेकर यांनी सांगितले, की कोरोनामुळे केस गळतीची समस्या जाणवत असेल तर ती सोडवण्यासाठी 3 गोष्टींचा अवलंब करावा. केस गळती थांबवण्यासाठी दररोज नाश्त्या दह्याचा समावेश करावा. ऑलिव्हचे लाडू खावे. तसंच दररोजच्या जेवणात डाळ, भात आणि तुपाचा समावेश करावा. तसेच जेवणात पनीरचे पराठे असावेत. कोणत्याही परिस्थितीत नाश्ता टाळू नये.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Health, Health Tips, Lifestyle, Woman hair