घरगुती उपाय करा आणि सर्दी खोकला पळवून लावा, त्यासाठी करा फक्त 'याचा' वापर!
पेनकिलरच्या सततच्या वापराने तुम्हाला भविष्यात अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू (Side Effects Of Painkillers) शकते. यातीलच एक गंभीर समस्या म्हणजे हार्ट अटॅक. होय, पेनकिलरच्या जास्त वापराने हृदयासंबंधित समस्या आणि हार्ट अटॅकदेखील होण्याची शक्यता असते. तसेच पेनकिलरच्या अतिवापराने (Painkiller Overdose) पोटासंबंधित आजार, पचनक्रिया मंदावणे हे त्रास संभवतात. तर काही गंभीर प्रकारांमध्ये श्वास घेण्यास त्रास होतो. किडनी, लिव्हर आणि मेंदूवरही याचा वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच पेनकिलरच्या पाकिटावर याबाबतच्या सूचनाही दिलेल्या असतात.Superfood For Women : वेगवेगळ्या वयोगटानुसार महिलांचा आहार कसा असावा?
आपल्याला डोकेदुखी किंवा हात, पाय दुखत असताना पेनकिलर घेऊन त्वरित अराम मिळतो आणि नकळत आपल्याला या पेनकिलरची सवय लागत जाते. मात्र ही सवय आपल्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे पेनकिलरचा वापर शक्य तितका कमी करावा आणि उत्तम आरोग्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप ही त्रिसूत्र पाळावी. कोणतीही पेनकिलर घेताना ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Drugs, Pain, Side effects