मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

...म्हणून सडपातळ व्यक्तींचं वजन वाढत नाही; संशोधकांनी शोधलं स्लीम बॉडीचं सिक्रेट

...म्हणून सडपातळ व्यक्तींचं वजन वाढत नाही; संशोधकांनी शोधलं स्लीम बॉडीचं सिक्रेट

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

सडपातळ व्यक्ती काहीही खाऊ शकतात, त्यांच्या शारीरिक हालचाली भरपूर प्रमाणात असतात असा अससेला समज चुकीचा आहे.

एडिनबर्ग, 19 जुलै : अतिरिक्त वजन (Overweight) असलेल्या व्यक्ती लठ्ठपणा (Obesity) दूर व्हावा, यासाठी काटेकोर आहार, व्यायामावर भर देतात. जास्त प्रमाणात खाणं आणि त्या तुलनेत कमी हालचाल यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते, असं म्हटलं जातं. एकीकडे अधिक वजन असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत ही स्थिती असताना दुसरीकडे बारीक अर्थात सडपातळ (Slim) व्यक्तींच्या बाबतीत काहीशी निराळी स्थिती पाहायला मिळते. बारीक व्यक्ती शारीरिक हालचाली (Physical Activity) भरपूर प्रमाणात करत असल्याने ते काहीही खाऊ शकतात त्यामुळे त्यांचं वजन वाढत नाही, असा समज आहे. परंतु, हा समज चुकीचा असल्याचं एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

सडपातळ व्यक्तींचं वजन नेमकं का वाढत नाही, याबाबत अभ्यास करण्यात आला. सडपातळ व्यक्तींच्या आहाराच्या सवयी आणि वजनाविषयी नुकतंच एक संशोधन करण्यात आलं. रिपोर्टनुसार स्कॉटलँडमधील अबरडीन विद्यापीठानं (University of Aberdeen) केलेल्या या संशोधनात 150 सडपातळ व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. संशोधनात सहभागी 150 सडपातळ व्यक्तींचा आहार (Diet) आणि एनर्जी लेव्हलविषयी निरीक्षणं नोंदवण्यात आली. त्यानंतर या निरीक्षणाची तुलना 173 सामान्य व्यक्तींशी करण्यात आली.

सडपातळ व्यक्ती अन्य व्यक्तींच्या तुलनेत जास्त व्यायाम करत नाहीत. तसंच त्यांचा आहार कमी असल्याने वजन कमी असतं. असं या संशोधनात दिसून आलं आहे.

बारीक किंवा सडपातळ व्यक्ती 23 टक्के कमी शारीरिक हालचाली करतात आणि बसून जास्त वेळ घालवतात. याशिवाय त्यांनी सामान्य व्यक्तींच्या तुलनेत 12 टक्के कमी जेवण घेतलं. परंतु, सडपातळ व्यक्तींचं रेस्टिंग मेटाबॉलिझम (Metabolism) जलद होतं. त्यामुळे सामान्य व्यक्तींच्या तुलनेत निष्क्रिय असतानाही या गोष्टीमुळे सडपातळ व्यक्तींच्या जास्त कॅलरीज बर्न होत असल्याचं दोन आठवडे चाललेल्या या संशोधनातून दिसून आलं.

हे वाचा - Walking for Health and Fitness : दररोज चालणं आरोग्यासाठी चांगलं; पण नेमकं किती पावलं चालयाल हवं?

संशोधनात सहभागी असलेल्या सडपातळ व्यक्तींनी सामान्य वजनाच्या व्यक्तींपेक्षा सरासरी 12 टक्के कमी जेवण घेतलं; पण या व्यक्तींनी बसून कॅलरीज बर्न केल्या. सामान्य व्यक्तींच्या तुलनेत या व्यक्तींची चयापचय क्रिया वेगवान असणं हे यामागचं कारण आहे. खरंतर त्यांच्या शरीरातल्या फॅट्सच्या पातळीच्या आधारावर त्यांचं मेटाबॉलिझम अपेक्षेपेक्षा 22 टक्के जास्त वेगवान होतं. मेटाबॉलिझमचा वेग थायरॉइड हॉर्मोनच्या (Thyroid Hormone) उच्च पातळीशी संबंधित असतो. त्यामुळे या व्यक्तींना कमी भूक लागते आणि ते सडपातळ राहतात, असं संशोधकांना वाटतं.

सडपातळ व्यक्तींनी त्यांचा 96 टक्के वेळ हा कोणतं काम न करता किंवा कमी शारीरिक हालचाली करून घालवला; पण सामान्य व्यक्तींच्या तुलनेत या व्यक्तींचा बीएमआय (BMI) 21.5 पेक्षा जास्त आणि 25 पेक्षा कमी होता. सडपातळ व्यक्तींचं वजन कमी असण्यामागे त्यांचा कमी आहार हे कारण आहे. ते कमी कॅलरीज घेतात, म्हणून ते सडपातळ राहतात, असं संशोधकांना आढळून आलं आहे.

याबाबत अबरडीन विद्यापीठाच्या या संशोधनाचे प्रमुख आणि प्राध्यापक जॉन स्पीकमन म्हणाले, "या अभ्यासाचा निष्कर्ष खरोखरच धक्कादायक आहे. बऱ्याचदा सडपातळ व्यक्तींशी संवाद साधला असता, आम्ही हवं ते खाऊ शकतो, असं ते सांगतात. सडपातळ व्यक्ती जास्त शारीरिक हालचालींमुळे नाही, तर कमी खाण्यामुळे बारीक असतात, असं आमच्या अभ्यासातून दिसून आलं आहे. ते जे खातात ते सामान्य बॉडी मास इंडेक्स श्रेणीतल्या व्यक्तींपेक्षा खूपच कमी असतं"

हे वाचा - Lemon Side Effect : तुम्हाला माहित आहे का? लिंबाचे अतिसेवन ठरू शकते धोकादायक; हे आहेत दुष्परिणाम

सडपातळ व्यक्तींच्या मेटाबॉलिझमबाबत दिसून आलेल्या गोष्टी पाहता, नैसर्गिकरीत्या सडपातळ व्यक्तींचा मेटाबॉलिझम रेट अधिक असतो का, थायरॉइड हार्मोनला त्यांच्या जनुकांमुळे चालना मिळते का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न संशोधक आता करत आहेत. या गोष्टी सडपातळ व्यक्तींचं वजन वाढू देत नाहीत. आतापर्यंतच्या पुराव्यांवरून असं दिसतं, की सुमारे 1.7 टक्के व्यक्तींचं वजन कमी आहे. यापैकी काही व्यक्तींना इटिंग डिसॉर्डर असू शकते. तसंच काही जणांना इतर आजारदेखील असू शकतात.

अलीकडच्या अभ्यासात केवळ चिनी व्यक्तींचा समावेश केला आहे. ज्या व्यक्ती नैसर्गिकरीत्या सडपातळ आहेत, ते वजन कमी असल्यानं तसेच कमी खात असल्यानं व्यायाम करत नाहीत. संशोधनात सहभागी असलेल्या सामान्य व्यक्तींच्या तुलनेत या व्यक्तींमध्ये खराब कोलेस्टेरॉलचं (Bad Cholesterol) प्रमाण कमी असल्याचं अभ्यासादरम्यान दिसून आलं आहे.

अबरडीन विद्यापीठातल्या या संशोधनाच्या सहलेखिका डॉ. सुमी हू म्हणाल्या, "माझ्यासाठी हे निष्कर्ष खूप धक्कादायक होते. सडपातळ व्यक्ती सामान्य बीएमआय श्रेणीतल्या लोकांपेक्षा खूपच कमी सक्रिय होत्या. सडपातळ व्यक्तींनी आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सक्रिय राहिलं पाहिजे, असं आम्हाला वाटत होतं; पण याचे निष्कर्ष उलट आले"

हे वाचा - तुम्हाला इडली खाण्याचे हे 10 फायदे माहित आहेत का? पाहा काय सांगतात फिटनेस एक्सपर्ट

सर्वसामान्यपणे प्रौढ महिलांनी दिवसाला 2000 कॅलरीज आणि पुरुषांनी 2500 कॅलरीज (Calories) घेतल्या पाहिजेत. दिवसभरात विविध कामं करण्यासाठी किती ऊर्जेची आवश्यकता आहे, यावरदेखील हे अवलंबून असतं. ज्या व्यक्ती जास्त प्रमाणात व्यायाम करतात, त्यांना अधिक कॅलरीज घेणं गरजेचं असतं. एका दिवसात बर्न करत असलेल्या कॅलरीपेक्षा अधिक अन्न (Food) खाल्लं तर वजन वाढू शकतं. तुम्ही बर्न करत असलेल्या कॅलरीजच्या तुलनेत कमी खाल्लं तर तुमचं वजन कमी होतं. फळं आणि भाज्यांच्या तुलनेत प्रक्रियायुक्त पदार्थ म्हणजेच ज्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स, साखर आणि मीठ जास्त प्रमाणात असतं, त्यात कॅलरीज अधिक असतात. त्यामुळे असे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे.

First published:

Tags: Health, Lifestyle