Home /News /lifestyle /

Eye Care : डोळ्यांना खाज आल्यावर चोळू नका; घरच्या घरी करा हे सोपे उपाय

Eye Care : डोळ्यांना खाज आल्यावर चोळू नका; घरच्या घरी करा हे सोपे उपाय

आपल्या डोळ्यांना खाज येणे (Itchy Eyes), डोळे लाल होणे (Redness In Eyes), डोळ्यांमध्ये इरिटेशन होणे (Irritation In Eyes) अशा अनेक समस्या येतात. ही सर्व डोळे कोरडे (Dry Eyes) पडण्याची लक्षणे आहेत. यावर वेळीच उपाय करणे गरजेचे असते. कारण डोळे हा आपल्या शरीरातील एक अत्यंत नाजूक आणि महत्वाचा भाग असतो.

पुढे वाचा ...
  मुंबई, 21 जून : हल्ली आपल्यापैकी बरेच लोक कम्प्युटर किंवा लॅपटॉपसमोर काम (Work From Home) करतात. मात्र यामुळे आपल्याला डोकेदुखी (Headache), पाठदुखी (Back Pain) असे त्रास होतात. त्याचबरोबर सगळ्यात जास्त प्रभाव या गोष्टीचा पडतो तो आपल्या डोळ्यांवर. आपल्या डोळ्यांना खाज येणे (Itchy Eyes), डोळे लाल होणे (Redness In Eyes), डोळ्यांमध्ये इरिटेशन होणे (Irritation In Eyes) अशा अनेक समस्या येतात. ही सर्व डोळे कोरडे (Dry Eyes) पडण्याची लक्षणे आहेत. यावर वेळीच उपाय करणे गरजेचे असते. कारण डोळे हा आपल्या शरीरातील एक अत्यंत नाजूक आणि महत्वाचा भाग असतो. डोळ्यांमध्ये कोरडेपणा अजूनही बऱ्याच कारणांमुळे येऊ शकतो. स्टाईलक्रेझने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या शरीरात हार्मोनल चेंजेस (Hormonal Changes) होत असतात. ज्यामुळे आपल्या डोळ्यातील नैसर्गिक पाण्याचा स्तर कोरडा पडू लागतो. त्याचबरोबर कोरडे वातावरण किंवा सतत एसीच्या वातावरणात राहाणे, सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहाणे, धूम्रपान करणे अशा अनेक कारणामुळे आपले डोळे कोरडे पडू शकतात. आज आम्ही तुम्हाला यावर काही घरगुती उपाय सांगणार आहोत. कोरफड कोरफडीमध्ये (Aloe vera For Eyes) अनेक औषधी गुणधर्म आढळतात. जे अनेक प्रकारच्या समस्यांसाठी खूप प्रभावी मानले जाऊ शकतात. कोरफड त्वचेच्या आणि केसांच्या समस्येवरही खूप फायदेशीर असते. डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यासाठीही कोरफड उपयुक्त ठरते. यासाठी हाताच्या बोटांवर कोरफडीचा गर घ्या आणि डोळ्यांच्या वरच्या भागावर चांगले लावा. हा उपाय तुम्ही दिवसातून दोनदा करू शकता.

  Eye Care: चश्मा की कॉन्टॅक्ट लेन्सेस? तुमच्या डोळ्यांसाठी काय अधिक चांगलं?

  खोबरेल तेल खोबरेल तेल त्वचेसाठी फायदेशीर आहे. कोरड्या डोळ्यांच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी त्याचा वापर (Coconut Oil For Eyes) करणेदेखील फायदेशीर ठरू शकते. डोळ्यांचा ओलेपणा जपण्यासाठी खोबरेल तेल संरक्षक म्हणून काम करते. डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी कापसाच्या मदतीने डोळ्याभोवती खोबरेल तेल लावा. कोरडेपणाच्या समस्येपासून पूर्णपणे आराम मिळवण्यासाठी तुम्ही दिवसातून दोनदा याचा वापर करू शकता. एरंडेल तेल एरंडेल तेल (Caster Oil For Eyes) डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. एरंडेल तेल डोळ्यातील अश्रूंची कमतरता पूर्ण करण्यास मदत करते. यामुळे कोरड्या डोळ्यांची समस्या बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकते. यासाठी कापसाच्या साहाय्याने डोळ्याभोवती एरंडेल तेल लावा. जास्त त्रास असल्यास हा उपाय दिवसातून दोनदा करू शकता.

  Skin Care : खाण्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर असते विड्याचे पान, वाचा फायदे

  काकडी डोळ्यांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी काकडीचा (Cucumber For Eyes) वापर करणे फायदेशीर ठरू शकते. काकडीचे दोन तुकडे 10 मिनिटे डोळ्यांवर ठेवल्याने जळजळ खूप प्रमाणात कमी होते. यासाठी काकडीचे तुकडे करून ते आधी फ्रीजमध्ये ठेवून थंड करा. यानंतर ते तुकडे थोडा वेळ बंद डोळ्यांवर ठेवा. हा उपाय तुम्ही दररोज करू शकता.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Home remedies, Lifestyle

  पुढील बातम्या