• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Vitamins for Skin: सुंदर चेहऱ्यासाठी फॉलो करा या घरगुती Tips; तीन दिवसांत मिळेल Result

Vitamins for Skin: सुंदर चेहऱ्यासाठी फॉलो करा या घरगुती Tips; तीन दिवसांत मिळेल Result

आपला चेहरा चांगला दिसावा यासाठी आपण काय करत नाही, सातत्याने वेगवेगळ्या औषधी किंवा क्रिम्स आपण आपल्या चेहऱ्याला निखळपणा यावा यासाठी लावतो. परंतु आपल्याला आपल्या मनासारखा रिजल्ट मिळत नाही.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : आपला चेहरा चांगला दिसावा यासाठी आपण काय करत नाही, सातत्याने वेगवेगळी औषधं किंवा क्रिम्स आपण आपल्या चेहऱ्याला निखळपणा यावा यासाठी लावतो. परंतु आपल्याला आपल्या मनासारखा रिजल्ट मिळत नाही. त्यामुळे आपल्याला कधीकधी या गोष्टीचं फार टेन्शन येतं. अशावेळी आपण डॉक्टरांचाही सल्ला घेतो. परंतु आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आता काही घरघुती उपाय करण्याची (Vitamins for Skin skin diseases) गरज निर्माण झाली आहे. कारण बदलते हवामान आणि सातत्याने आपल्या आहारातील बदलांमुळे (diseases caused by fungus how to cure fungal infection on skin) आपल्याला या गोष्टींचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी काय करायला हवं, याबाबत आपण काही गोष्टी जाणून घेऊयात. निखळ चेहऱ्यासाठी आपल्याला आपल्या आहारात वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सची (Vitamins) आवश्यकता असते. कारण आपल्या चेहऱ्यावर तयार झालेल्या सुरकुत्या (diseases) आणि काळे डाग यासाठी आपल्याला हेल्दी आहार मिळायला हवा. त्यासाठी आपण Vitamins संदर्भातील काही गोष्टींचा समावेश आपल्या आहारात करायला हवा. व्हिटॅमिन-सी हे त्वचेसाठी सर्वात महत्वाचे जीवनसत्व आहे. जे आपल्या शरीरात कोलेजनचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. त्यामुळे सुरकुत्या आणि कोरडेपणापासून आपली सुटका होऊ शकते. व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी लिंबू, संत्रा, ब्रोकोलीसारखे पदार्थांचा समावेश आहारात करणे गरजेचे आहे. Relationship Promises : प्रेमळ नात्यासाठी आपल्या पार्टनरची अशी घ्या काळजी व्हिटॅमिन-सी प्रमाणे, व्हिटॅमिन-ई देखील एक अॅन्टीऑक्सिडेंट आहे. ज्यामुळे चेहऱ्यावर कोरडेपणा येतो. यासाठी आपण आपल्या आहारात बदाम आणि सूर्यफूल बिया यांचा समावेश करणं गरजेचं आहे. त्वचेला सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी मिळत असते. त्याचबरोबर हे व्हिटॅमिन सोरायसिस सारख्या त्वचेच्या संसर्गावर देखील प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर सॅल्मन, टूना सारख्या माशांचे सेवन करणेदेखील फायदेशीर ठरू शकते.
  Published by:Atik Shaikh
  First published: