मुंबई, 10 सप्टेंबर : शरीरासाठी जीवनसत्त्वे खूप महत्वाची असतात. अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आहेत आणि सर्वांचे स्वतःचे फायदे, कार्ये आहेत. मुख्यतः लोक व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी वर अधिक लक्ष केंद्रित करतात आणि त्यामध्ये भरपूर पदार्थ खातात. पण यासोबतच काही इतर जीवनसत्त्वेही आहेत, जी निरोगी राहण्यासाठी आणि अनेक समस्यांपासून दूर राहण्यासाठी आवश्यक आहेत. शरीरात काही जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण झाली की अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या सुरू होतात. शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता आहे. हे आपल्याला विविध चिन्हे आणि लक्षणांवरून कळू शकते. व्हिटॅमिनच्या कमतरतेचे तोटे अनेकदा हिवाळ्यात टाच अधिक तडकतात, पण उन्हाळ्यात, पावसातही टाचांना तडे जात असतील, तर समजून घ्या की शरीरात विशिष्ट जीवनसत्त्वाची कमतरता आहे. थंडीच्या मोसमात शरीरात आणि हवेत ओलावा नसल्यामुळे टाचांना तडे जातात. भेगा पडलेल्या टाचांना वेळीच दुरुस्त केले नाही तर त्यामध्ये खोल भेगा तयार होतात, ज्यामुळे खूप वेदना होतात. जेव्हा तुमच्या शरीरात व्हिटॅमिन सी, ई, बी3 ची कमतरता असते तेव्हा टाचांना भेगा पडण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्याही उद्भवतात.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी लसणाचा होतो उपयोग; आहारातील या गोष्टीही ठरतात फायदेशीरA, B, C, D, E आणि K अशा प्रत्येक पोषक घटकाचे स्वतःचे महत्त्व असते आणि त्याचा शरीराला फायदा होतो. त्यांच्या कमतरतेमुळे शरीर कमकुवत होते. हाडे आकुंचन पावू लागतात. स्नायूंनाही वेदना जाणवू लागतात. अशीही अनेक प्रकरणे आहेत ज्यात त्वचा कोरडी आणि सैल होऊ लागते. तसेच डोक्याचे केसदेखील कमकुवत होतात. या जीवनसत्त्वांनी समृद्ध पदार्थांचा आहारात नियमितपणे समावेश करणे महत्त्वाचे आहे. कोणत्या लोकांना अधिक जीवनसत्त्वे आवश्यक आहेत? झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही वयाच्या व्यक्तीला व्हिटॅमिन्सच्या कामातरतेला सामोरे जावे लागू शकते. मात्र वृद्ध आणि गर्भवती महिलांना याचा जास्त धोका असतो. त्याशिवाय जर काही आजारांदरम्यान तुम्ही औषधं घेत असाल तर कधीकधी त्यामुळेदेखील व्हिटॅमिन्सची कमतरता भासू शकते. अनेकदा उत्तम आरोग्य असलेल्या व्यक्तीने काही बाहेरचे किंवा अनहेल्दी पदार्थ खाल्ले तर त्यांनादेखील व्हिटॅमिन्सची कमतरता होऊ शकते.
Keratin Rich Foods: या 4 पदार्थांमुळे केस गळतीवर बसेल लगाम, वजन कमी करण्यासाठीही होईल फायदात्यामुळे जर कोणत्याही कारणाने तुमच्या शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असेल. तर तुम्ही मल्टीविटामिन सप्लिमेंट्स घेऊ शकतात. यामुळे व्हिटॅमिन्सची कमतरता दूर होईलच. शिवाय शरीराला क्रोमियम, झिंक, सेलेनियम, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखी खनिजेही मिळतील. त्याशिवाय मल्टीविटामिन्स खाल्ल्याने शरीराला प्रचंड ऊर्जा मिळते. तुमचे शरीर आणि मज्जासंस्था चांगली राहते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.