Home /News /lifestyle /

कोरोनाच्या नियमांचं केलं उल्लंघन; भरमंडपात नवरीचा लग्नास नकार

कोरोनाच्या नियमांचं केलं उल्लंघन; भरमंडपात नवरीचा लग्नास नकार

लग्नमंडपात झालेल्या या गोंधळामुळे नवरदेवाला मात्र नवरीशिवाय घरी परतावं लागलं.

    पीलीभीत, 11 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) पीलीभीत येथे एका लग्नादरम्यान नवरीने (Bride) भरमंडपात लग्नास नकार दिल्याची (bride refuses to get married) घटना समोर आली आहे. या लग्नादरम्यान काही दारुड्या वऱ्हाड्यांनी गोंधळ घातला आणि नवरीच्या नातेवाईकांनाही मारहाण केली. यामुळे नाराज झालेल्या नवरीने लग्नास नकार दिला. हा प्रकार घडल्यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी अनेकांना अटक केली. या सर्व गोंधळामुळे नवरदेवाला मात्र लग्नाशिवाय घरी परतावे लागले. शाहजहांपुरमध्ये मवियापुर येथून बिसलंडा येथे वरात आली होती. या वादाची सुरुवात मर्यादेपेक्षा जास्त वऱ्हाडी सोबत आणल्यामुळे सुरू झाली होती. कोरोनामुळे लग्नात केवळ 50 जणं लग्नात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र वरपक्षाकडून 100 हून अधिक वऱ्हाडी लग्नात पोहोतले. अपेक्षेपेक्षा जास्त वऱ्हाडी आल्याने प्रकरण बिघडलं. हे वाचा - लग्नात नवरदेव झाला नाराज; रागाच्या भरात नवरीच्या लहान बहिणीचं केलं अपहरण दरम्यान काही दारुड्यांनी वरातीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मुलीच्या काकांनी याचा विरोध केला तर वऱ्हाडी भडकले. त्यांनी नवरीचे काका आणि भावाला मारहाण केसी. जेव्हा ही बाब नवरीला कळाली तर तिने लग्नास नकार दिला. लग्नमंडपात गोंधळ इतका वाढला की शेवटी पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी दोन्ही पक्षातील अनेकांना ताब्यात घेतलं. वरिष्ठ पोलिसांनी सांगितलं की, याबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. दोन्ही पक्षांना समजावून सोडण्यात आलं आहे. मात्र नवरी आता लग्न करण्यास तयार नाही. हे वाचा - लेकीच्या लग्नात आईच बनली नवरी; मुलीचं कन्यादान केलं आणि स्वत: घेतली सप्तपदी या प्रकरणात नवरीचं म्हणणं आहे की, ज्या प्रकारे वऱ्हाड्यांनी दारू पिऊन गोंधळ घातला त्यामुळे मी खूप घाबरले आहे. कोरोनामुळे लग्नात ठराविक वऱ्हाडी आणण्याचं ठरलं होतं. मात्र तरीही वरपक्षाने 100 हून अधिक जणांना आणलं. गरीब असतानाही माझ्या वडिलांनी शक्य तसं वरातीचं स्वागत केलं. मात्र तरीही वऱ्हाड्यांनी गोंधळ घातला आणि माझ्या नातेवाईकांना मारहाण केली.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Marriage, Uttar pradesh, Wedding

    पुढील बातम्या