Home /News /lifestyle /

लेकीच्या लग्नात आईच बनली नवरी; मुलीचं कन्यादान केलं आणि स्वत: घेतली सप्तपदी

लेकीच्या लग्नात आईच बनली नवरी; मुलीचं कन्यादान केलं आणि स्वत: घेतली सप्तपदी

ज्या मंडपात लेकीचं लग्न लागत होतं (daughter wedding) त्या मंडपात आईच नवरी (mother wedding) म्हणून उभी राहिली.

    लखनऊ, 12 डिसेंबर : प्रत्येक लग्नात (wedding) काही ना काही असं घडतं, जे प्रत्येकाच्या कायम लक्षात राहतं. फक्त वधू-वर आणि त्यांचं कुटुंबच नाही तर वऱ्हाड्यांही तो क्षण विसरू शकत नाही. असंच काहीसं घडलं ते एका लग्नात. जिथं लेकीच्या लग्नाच (daughter wedding) आईच नवरी (mother wedding) म्हणून उभी राहिली. लेकीचं कन्यादान केलं आणि त्याच मंडपात आईनं सात फेरे घेतले आहे. हा अनोखा विवाहसोहळा पार पडला आहे तो उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) गोरखपूरमध्ये. एकाच मंडपात आई आणि मुलीनं लग्न केलं आहे. एकाच वेळी मायलेकी लग्नबंधनात अडकल्या आहेत. नवभारत टाइम्सच्या रिपोर्टनुसार गोरखपूरमध्ये सामूहिक विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. तिथं एकूण 63 जोडप्यांची एकाच वेळी लग्नं झाली. पिपरॉलीमध्ये राहणाऱ्या बेला देवी यांच्या मुलीचंही लग्न इथंच होत होते. त्यांची मुलगी इंदूचं पालीतल्या राहुलशी लग्न ठरलं. सामूहिक विवाहसोळ्यात त्यांचं लग्न झालं. आई म्हणून बेला देवी यांनी आपल्या मुलीचं कन्यादान केलं. आपलं कर्तव्य पार पाडलं आणि त्यानंतर त्या नवरीसारख्या नटूनथटून आल्या आणि याच मंडपात त्यांनीही लग्न केलं. हे वाचा - बायकोसाठी कायपण! प्रसिद्ध कंपनीच्या CEO ने सोडला तब्बल 750 कोटी रुपयांचा बोनस बेला देवी यांच्या पतीचं 25 वर्षांपूर्वी निधन झालं. त्यांना एकूण पाच मुलं. दोन मुलं आणि तीन मुली. त्यापैकी चौघांचं लग्न झालं होतं आणि सर्वात छोटी मुलगी इंदूचंही लग्न त्यांनी करून दिलं. मुलांना आपापल्या संसाराला लावून आपली जबाबदारी पार पाडून बेला देवी एकट्या राहिल्या होत्या.  म्हणजे त्यांना मुलं होती पण पुढील आयुष्य घालवण्यासाठी आयुष्याचा जोडीदार नव्हता. त्यामुळे मुलांच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडला. त्यांनी आपला 55 वर्षीय दीर जगदीश यांच्यासह लग्न करण्याचं ठरवलं. हे वाचा - बायकोच्या हाती लागली एक चावी आणि एका क्षणात उलगडले नवऱ्याचे सर्व सिक्रेट्स कुरमोमध्ये राहणारे जगदीश हे तीन भावांमध्ये सर्वात लहान. ते अविवाहित होते. जेव्हा सामूहिक लग्नाबाबत दोघांनाही समजलं तेव्हा दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न करण्याधी त्यांनी आपली मुलं आणि कुटुंबाची परवानगी घेतली आणि सामूहिक विवाहसोहळ्यात सर्वांच्या समक्ष त्यांनी लग्न केलं. त्यानंतर या मायलेकीच्या लग्नाची चर्चाच सर्वत्र होऊ लागली.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Marriage, Relation, Relationship, Wedding

    पुढील बातम्या