जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / लग्नात नवरदेव झाला नाराज; रागाच्या भरात नवरीच्या लहान बहिणीचं केलं अपहरण

लग्नात नवरदेव झाला नाराज; रागाच्या भरात नवरीच्या लहान बहिणीचं केलं अपहरण

यावेळी नवऱ्यामुलाची मोठी शोधाशोधही झाली, पण अखेरीस तो गायब न होता स्वत: आपल्या मर्जीने पळून गेल्याची माहिती मिळाली.

यावेळी नवऱ्यामुलाची मोठी शोधाशोधही झाली, पण अखेरीस तो गायब न होता स्वत: आपल्या मर्जीने पळून गेल्याची माहिती मिळाली.

हा प्रकार समोर आल्यानंतर लग्नाच्या घरात एकच गोंधळ उडाला

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 डिसेंबर : बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाकडून समुपदेशनाबरोबरच तातडीने कारवाई केली जात आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे. मात्र पोलिसांच्या कारवाईपूर्वी भलतीच घडना घडल्याने मुलीच्या कुटुंबीयांची चिंता अधिक वाढली. मात्र वेळीच तपास सुरू केल्याने दोन्ही अल्पवयीन मुली सुरक्षित आहेत. पोलीस प्रशासन बाल विवाह रोखण्यासाठी गेले असता नवरदेवाने रागाच्या भरात नवरीच्या अल्पवयीन बहिणीचं अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी अल्पवयीन तरुणीचं लग्न थांबवलं असून अपहरण झालेल्या नवरीच्या बहिणीलाही ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात नवरदेवाच्या नात्यातील एका महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र नवरदेव फरार झाला आहे. मुरैना जिल्ह्याजवळील पोरसा ठाणे क्षेत्रात एका गावात दलित अल्पवयीन मुलीचं लग्न होणार असल्याची सूचना मिळाली होती. यानंतर पोलीस प्रशासन आणि महिला बाल विकास विभागाने रेस्क्यू सुरू केलं. कुटुंबीयांची समजूत काढून मुलीला पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. मात्र या गोंधळात नवरदेवाने अल्पवयीन मुलीच्या भांगेत कुंकू भरला होता. पोलीस व प्रशासनाने डॉक्टरांकडून परीक्षण केल्यानंतर मुलीला मुरैनामधील वन-स्टॉप सेंटरमध्ये दाखल केलं आहे. लग्न थांबल्यामुळे रागाच्या भरात नवरदेवाने आपल्या नात्यातील एक महिलेला मुलीच्या घरी पाठवलं व अल्पवयीन मुलीच्या छोट्या बहिणीला लग्न करण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने घेऊन गेला. याची माहिती मिळताच पोलीस व प्रशासनाने तपास सुरू केला व अपहरण केलेल्या मुलीची सुटका केली. या घटनेत नवरदेवाला मदत करणाऱ्या महिलेलाही पकडण्यात आलं आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन अपहरण आणि बाल विवाह अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करीत फरार झालेल्या नवरदेवाचा शोध सुरू केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime
  • First Published :
जाहिरात
जाहिरात