Home /News /lifestyle /

विनायक चतुर्थीला अशा पद्धतीनं करा गणेशाची पूजा; सर्व आशा-आकांक्षा होतील पूर्ण

विनायक चतुर्थीला अशा पद्धतीनं करा गणेशाची पूजा; सर्व आशा-आकांक्षा होतील पूर्ण

03 जून रोजी विनायक चतुर्थी व्रताची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 10:56 ते दुपारी 01:43 पर्यंत आहे. यावेळी विनायक चतुर्थी सर्वार्थ सिद्धी योगात आहे. पूूजेची सर्व माहिती जाणून घेऊया.

    मुंबई, 03 जून : विनायक चतुर्थी व्रत शुक्रवार, 03 जून रोजी आहे. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथीला चतुर्थी (Vinayak Chaturthi) असते. ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी तिथी गुरुवार, 02 जून रोजी दुपारी 12.17 वाजल्यापासून सुरू होत आहे आणि ही तिथी शुक्रवार, 3 जून रोजी दुपारी 2:41 पर्यंत वैध आहे. 03 जून रोजी विनायक चतुर्थी व्रताची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 10:56 ते दुपारी 01:43 पर्यंत आहे. यावेळी विनायक चतुर्थी सर्वार्थ सिद्धी योगात आहे, ज्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण करते. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 05:23 ते संध्याकाळी 07:05 पर्यंत आहे. विनायक चतुर्थीच्या निमित्ताने तुम्हाला यश, आनंद, सौभाग्य, संपत्ती इत्यादी गोष्टी मिळू शकतात. पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा यांच्याकडून विनायक चतुर्थीला करावयाच्या उपायांची माहिती जाणून घेऊया. विनायक चतुर्थीला काय करावे - 1. विनायक चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर गणेशजींच्या पूजेच्या वेळी डोक्यावर लाल सिंदूराचा तिलक लावावा. त्या दरम्यान सिंदूरम् शोभनम् रक्तम् सौभाग्यम् सुखवर्धनम्. शुभदं कामदं चैव सिंदूरम् प्रतिघ्यतम् मंत्र वाचावा. श्रीगणेश प्रसन्न होऊन आपल्या मनोकामना पूर्ण करतील. 2. विनायक चतुर्थीला गणेशाला झेंडूच्या फुलांची माळ घाला. त्यानंतर पूजा पूर्ण झाल्यावर ती माळ घराच्या मुख्य दारावर लावावी. असे केल्याने घरातील संकटे दूर होतील, सुख-शांती वाढेल. 3. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशजींना हिरवे वस्त्र अर्पण करा. गणपती बाप्पाला पाच क्रमांकात लवंग आणि वेलची अर्पण करा. यामुळे प्रेम जीवनातील समस्या दूर होतील आणि प्रेम वाढेल. 4. विनायक चतुर्थीच्या दिवशी घरातील सुख, समृद्धी, संपत्ती इत्यादी वाढीसाठी गणेशजींना 5 किंवा 21 गाठी दुर्वा अर्पण करा. हे वाचा -  आवळ्याचा रिकाम्या पोटी करा असा उपयोग; वजनात लगेच दिसेल फरक 5. गणेशाला मोदक खूप प्रिय आहेत, त्यामुळे विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला मोदक अर्पण करावेत. गणपतीच्या कृपेने तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. 6. जर तुमचे कोणतेही काम अडकले असेल किंवा तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करत असाल तर विनायक चतुर्थीला खालील मंत्राने श्रीगणेशाची पूजा करा. तुमचे काम यशस्वी होईल. अडथळे दूर होतील. वक्रतुंडा महाकाया, सूर्यकोटी समप्रभा:। निर्विघ्न कुरु मध्ये देव, सर्वदा सर्व क्रिया. हे वाचा - मंकीपॉक्समध्ये शारीरिक संबंधांवरही बंधन; प्रसार रोखण्यासाठी इतके दिवस दूर राहा (या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ganesh chaturthi, Lifestyle

    पुढील बातम्या