Home /News /lifestyle /

अंडं आधी की कोंबडी? अखेर या सर्वात कठीण प्रश्नाचं योग्य उत्तर सापडलंच

अंडं आधी की कोंबडी? अखेर या सर्वात कठीण प्रश्नाचं योग्य उत्तर सापडलंच

जगातील सर्वात कन्फ्युझिंग प्रश्नाचं उत्तर अखेर शास्त्रज्ञांनी शोधून काढलंच.

    मुंबई, 18 डिसेंबर : अंडं आधी की कोंबडी? (What Came First Hen Or Egg) या प्रश्नावरून अजूनही वाद होतात. कुणी म्हणतं अंडं, कुणी म्हणतं कोंबडी. पण अंडं म्हटलं तर मग ते कुठून आलं कारण अंडं तर कोंबडीच देते आणि कोंबडी म्हटलं तर मग ती कुठून आली कारण ती अंड्यातूनच येते. त्यामुळे या प्रश्नाचं या दोघांपैकी काही उत्तर दिलं तर ते अचूक म्हणता येणार नाही. त्यामुळे उत्तर दिलं तरी प्रश्न तसाच कायम राहतो. त्यामुळे जगातील सर्वात कठीण प्रश्न म्हटला तरी चालेल. अशाच प्रश्नाचं उत्तर अखेर सापडलं आहे. शास्त्रज्ञांनी याचं उत्तर शोधून काढलं आहे (Egg Hen Answer Given By Science). अंडं आधी की कोंबडी यावर यूकेतील शेफील्ड आणि वारविक युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांनी शोध सुरू केला. अनेक वर्षांच्या शोधानंतर त्यांना याचं उत्तर सापडलं आहे. संशोधनानुसार जगात अंड्याआधी कोंबडी आली होती. हे शास्त्रज्ञ कशावरून सांगत आहेत, याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे. याचं एक खास कारण आहे, ज्याशिवाय अंड्याची निर्मिती होऊच शकत नाही. हे वाचा - Egg Recipes : हेल्दी ब्रेकफास्टमध्ये अंड्याच्या या 6 रेसिपींचा करा समावेश संशोधनात दिसून आलं की, अंड्याच्या कवचेत एक ओवोक्लाइडिन नावाचं प्रोटिन असतं. याशिवाय अंड्याचं कवच बनूच शकत नाही. हे प्रोटिन फक्त कोंबडीच्या गर्भाशयात तयार होतं. जोपर्यंत कोंबडीच्या गर्भाशयातील प्रोटिनचा अंड्याच्या निर्मितीत वापर होत नाही, तोपर्यंत अंडं बनूच शकत नाही. त्यामुळे जगात अंड्याआधी कोंबडी आली हे पक्कं झालं. जेव्हा कोंबडी आली तेव्हाच तिच्या गर्भाशयात ओवोक्लाइडिन बनलं आणि मग या प्रोटिनमुळे अंड्याचं कवच. हे वाचा - निरोगी राहण्यासाठी चुकूनही या गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नका, हे आजार वाढतात हे संशोधन करणारे डॉ कोलिन फ्रीमॅन यांनी सांगितलं, बऱ्याच कालावधीपासून लोक जगात अंडं आधी की कोंबडं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपलं डोकं खाजवत होते. अखेर शास्त्रज्ञांना पुराव्यानिशी याचं उत्तर सापडलं आहे. जगात आधी कोंबडी आली आणि त्यानंतर कोंबडीच्या गर्भामार्फत अंडं जगात आलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle

    पुढील बातम्या