नवी दिल्ली,29 जानेवारी : आपली पॅशन पूर्ण करण्यासाठी माणूस कोणत्या थराला जाईल, हे सांगता येत नाही. विशेषतः ती पॅशन जर कुणासारखं किंवा ठरावीक पद्धतीने दिसण्यासाठी असेल (Body Modification) बघायलाच नको. अँथोनी लोफ्रेडो (Anthony Loffredo) या फ्रेंच व्यक्तीने परग्रहवासी म्हणजे एलियनसारखं दिसण्यासाठी चक्क आपला वरचा ओठच छाटून टाकला.
ब्लॅक एलियन प्रकल्पाच्या (Black Alien Project) माध्यमातून असाच काहीसा प्रयत्न केला आहे. एलियन सारखं दिसण्यासाठी अँथनीने त्याच्या ओठाचा वरील भाग काढून टाकला आहे. मात्र यामुळे गंभीर परिणाम झाला असून त्यास बोलताना त्रास जाणवत आहे.
32 वर्षीय अॅन्थोनीने आपण ब्लॅक एलियनसारखे दिसावे म्हणून सर्व अंगावर शाई लावली आहे. तसेच त्याने आपले नाक देखील काढून टाकले आहे. ओठाचा वरील भाग काढून टाकल्याने मला बोलण्यास त्रास होत आहे, परंतु मला या गोष्टीचे वाईट वाटत नाही, असा खुलासा अॅन्थोनीने स्थानिक माध्यमांशी बोलताना केला.
लॅडबायबलच्या वृत्तानुसार, फ्रेंचमधील या नागरिकाने आपल्या ओठांची शस्त्रकिया स्पेनमध्ये (Spain) जाऊन केली. कारण अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यास फ्रान्समध्ये (France) बंदी आहे. सध्या त्याच्या ओठांचा खालील भाग तसाच असून वरील भाग काढून टाकल्याने त्याच्या नाकाखालील भाग एखाद्या गुहेसारखा भासत आहे. यामुळे त्याचे सर्व दात बाहेरुन दिसू लागले आहेत. त्याचे बोलणेदेखील आता पहिल्यासारखे स्पष्ट नसून, त्याचे शब्दोच्चार समोरच्या व्यक्तीस समजण्यास कठीण जात आहे. इन्स्टाग्रामवर खुलेपणाने व्यक्त होणारे लोफ्रेडो आता आपली स्किन धातूंनी आच्छादित करण्याचे स्वप्न पाहत आहेत. इ्न्स्टाग्रामवर (Instagram) ब्लॅक एलियन प्रोजक्ट इव्होल्युशन अशी कॅप्शन देत माझी प्रत्येक वाटचाल ही ब्लॅक एलियन होण्याच्या दिशेने होत असल्याचं म्हटलं आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर 288k फाॅलोअर्स आहेत.
Instagram वर ही पोस्ट पहा
अँथोनीनं आपल्या सर्व शरीरावर टॅटू (Tattoo) काढले असून, डोळ्यांना देखील टॅटूच्या माध्यमातून ब्लॅक इफेक्ट दिला आहे, जेणेकरुन ब्लॅक एलियनसारखे दिसावेत यासाठी. त्यांनी त्यांचे कान देखील शस्त्रक्रिया करून काढून टाकले आहेत. आपला चेहरा एलियन सारखा दिसावा यासाठी त्यांनी विशिष्ठ प्रकारे त्वचारोपणही केले आहे. त्यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये हा फक्त 20 टक्के बदल आहे, असे नमूद केलं आहे. परंतु, त्यांची शारीरिक स्थिती पाहता, हा जर फक्त 20 टक्के बदल असेल तर उरलेला 80 टक्के बदल हा किती भयावह असेल, याचा अंदाज न बांधलेलाच बरा.
फ्रेंच भाषेत लिहिलेल्या दुसऱ्या एका पोस्टमध्ये अँथोनी म्हणतात, की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल की नाही मला माहिती नाही. परंतु हे खरे असल्याचे मी वचनपूर्वक सांगतो. मी जगातील सर्वात आनंदी व्यक्ती आहे. माझ्यासारखं नक्कीच कुणालाही करण्याची गरज नाही, असा मी आग्रह धरतो.
Instagram वर ही पोस्ट पहा
पुढील काही महिन्यांच्या योजनांचा विचार करताना मला बेशुद्ध झाल्यासारखं वाटलं, पण मी आता नॉर्मल आहे. मला भयावह पात्रांमध्ये प्रवेश करायला आवडतं.. मी बऱ्याचदा कुठेतरी स्थिर होतो आणि भूमिका निभावतो. विशेषतः रात्री अंधार असलेल्या रस्त्यांवर मला मजा येते. मी साकारत असलेल्या भूमिकेत आणि स्वतःमध्ये असलेला फरक मी शोधतो, असे त्यांनी फ्रान्समधील वृत्तपत्रांशी बोलताना सांगितले.
Instagram वर ही पोस्ट पहा
बॉडी मॅाडिफिकेशनच्या माध्यमातून व्हायरल झालेलं अँथनीचं हे काही पहिलं उदाहरण नाही. यापूर्वी 39 वर्षीय सॅंड्रो हा विचित्र बॉडी आर्ट आणि आयबॉल्समुळे व्हायरल झाला होता. मि. स्कल फेस (Mr. Skull Face) या नावाने तो सोशल मिडीयावर ओळखला जातो. यासाठी त्याने 6 हजार डॉलर्स खर्च केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.