Home /News /lifestyle /

Summer Health: उन्हाळ्यात डिहायड्रेशनचे कारण ठरतात या 5 गोष्टी; आजपासूनच खाताना काळजी घ्या

Summer Health: उन्हाळ्यात डिहायड्रेशनचे कारण ठरतात या 5 गोष्टी; आजपासूनच खाताना काळजी घ्या

न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा (Nutritionist Lovneet Batra) यांनी अलीकडेच इंस्टाग्रामवर असे काही खाद्यपदार्थ शेअर केले आहेत, जे आपल्या हायड्रेशनवर विपरीत परिणाम करू (Summer Health Tips) शकतात. त्याविषयी जाणून घेऊया.

    नवी दिल्ली, 22 मे : उन्हाळ्यात हायड्रेटेड राहणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु हायड्रेशन म्हणजे फक्त पुरेसे पाणी पिणे नव्हे तर काही खाद्यपदार्थ खाण्याचे टाळणे देखील आहे. ज्यामुळे आपल्याला निर्जलीकरण वाटू शकते. तुम्ही विचार करत असाल, असे कोणते पदार्थ आहेत? न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा (Nutritionist Lovneet Batra) यांनी अलीकडेच इंस्टाग्रामवर असे काही खाद्यपदार्थ शेअर केले आहेत जे तुमच्या हायड्रेशनवर विपरीत परिणाम करू (Summer Health Tips) शकतात. त्यांनी आपल्या इन्स्टा पोस्टला असे कॅप्शन दिले आहे की, "हायड्रेशन महत्त्वाचे आहे आणि पाणी पिणे आरोग्यासाठी 101% फायदेशीर आहे. परंतु, तुम्हाला कदाचित माहित नसेल की, असे काही पदार्थ आहेत जे आपल्या उन्हाळ्यात आरोग्य बिघडवू शकतात, ज्यामुळे आपले अधिक निर्जलीकरण होऊ शकते.
    कॉफी - आपल्यापैकी अनेक लोकांना आधीच माहीत आहे की, कॉफी निर्जलीकरण करणारी आहे. कॉफी देखील लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे आणि दोन कपपेक्षा जास्त कॉफी आपल्या शरीरात सोडियमचे पुनर्शोषण रोखू शकते. ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. म्हणून कॉपीसारखे पेये मर्यादित प्रमाणात घ्यावी. डाएट सोडा - कोणत्याही शीतपेयाचा बाटली तुमची तहान शमवू शकते, परंतु या कोल्ड्रिंकमध्ये असलेल्या साखरेचा तुमच्या शरीरावर हायपरनेट्रेमिक प्रभाव पडतो, ते ऊतकांमधून पाणी काढते. दुसरे म्हणजे, सॉफ्ट ड्रिंकमध्ये कॅफीन देखील असते, ज्याचा आपल्या शरीरावर मूत्रवर्धक प्रभाव पडत असतो. अल्कोहोल - अल्कोहोल हा अत्यंत निर्जलीकरण करणारा पदार्थ आहे, जर तुम्ही रात्री प्यायल्यानंतर झोपलात तर तुम्हाला सकाळी जास्त तहान लागते. हँगओव्हर नंतर निर्जलीकरण वाटणे कॉमन आहे. हे सर्व मेंदूवर अल्कोहोलच्या प्रभावामुळे होते. त्यामुळे अल्कोहोल घेणे टाळणे गरजेचे आहे. हे वाचा - Causes of Dizziness: बसून उठल्यानंतर अचानक चक्कर का येते? तज्ज्ञांनी सांगितली 3 मोठी कारणं
    उच्च प्रथिने - उच्च प्रथिनेयुक्त आहार घेत असाल तर आपल्याला निर्जलीकरण वाटण्याची शक्यता आहे. खरं तर, आपले शरीर प्रथिनांमध्ये नैसर्गिकरित्या उद्भवणारे नायट्रोजन चयापचय करण्यासाठी अधिक पाणी वापरते, ज्यामुळे पेशी पाण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी करू शकतात, ज्यामुळे आपल्याला निर्जलीकरण वाटते. हे वाचा - Childhood Obesity: तुमचं मूलही दिवसेंदिवस लठ्ठ होत चालंलय? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या उपाय
    खारट स्नॅक्स - मिठामुळे आपल्या शरीरात सोडियमच्या प्रभावामुळे निर्जलीकरण होते. आपली मूत्रपिंडे मिठाचा हा पूर स्वीकारतील आणि तुमच्या शरीरातील इतर ठिकाणाहून पाणी काढून ते भरून काढण्याचा प्रयत्न करतील, ज्यामुळे अर्थातच इतर अवयव आणि पेशींना द्रवपदार्थाची कमतरता भासते. परिणामी, मीठाचे प्रमाण जास्त असलेल्या कोणत्याही अन्नामुळे शरीराला जास्त प्रमाणात निर्जलीकरण होऊ शकते, हे ध्यानात घ्या. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Summer, Summer hot

    पुढील बातम्या