दिल्ली, 29 सप्टेंबर: आजच्या जगात आपलं आयुष्य आरामदायी आणि सुरळीत पद्धतीने जगण्यासाठी सर्वांत आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे पैसा किंवा संपत्ती. हिंदू संस्कृतीनुसार भगवान कुबेर ही संपत्तीची देवता असून, वास्तुशास्त्रातल्या योग्य टिप्सचा (Vastu Tips for prosperity) अवलंब केला, तर घरात विपुल प्रमाणात संपत्ती येऊ शकते. भगवान कुबेर (God of prosperity Kuber)आनंदी असले, तर तुमच्या आयुष्यात कधीही कशाचीही उणीव भासणार नाही. इथे आम्ही वास्तूशी संबंधित एक साधा-सोपा उपाय सांगत आहोत. तो केल्यावर तुमच्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतील.
मोर हा जगातल्या सर्वांत सुंदर पक्ष्यांपैकी एक पक्षी आहे. हिंदू धर्मात मोर (Peacock) हा लक्ष्मी (Lakshmi) आणि सरस्वती (Sarswati) या देवतांशी संबंधित पक्षी आहे. वास्तुशास्त्राचा विचार केला, तर घरात चांदीचा मोर (Silver Peacock) ठेवणं हे घरासाठी भाग्याचं असतं. नृत्य करत असलेला चांदीचा मोर घरात असेल, तर लक्ष्मी आणि सरस्वती अर्थात बुद्धिमत्ता आणि संपत्ती या दोन्हीही घराकडे आकर्षित होतात, असं म्हटलं जातं.
या ड्रिंक्समुळे पॉझिटिव्ह येऊ शकतो कोरोना रिपोर्ट; समोर आली धक्कादायक बाब
चांदीचा मोर घरात ठेवल्यानंतर अन्य काही गृहदोष असल्यास त्यांचंही निवारण होण्यास मदत होते. उदाहरणार्थ, समजा तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी आहेत किंवा तुमचे तुमच्या जोडीदाराशी कायम मतभेद होत असतील, तर घरात मोराची चांदीची मूर्ती जरूर ठेवावी. त्यामुळे तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होईल. तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि शांतता नांदेल आणि घरात समृद्धी येईल.
वास्तुशास्त्र असं सांगतं, की आर्थिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी मोराची चांदीची मूर्ती घरात किंवा ऑफिसमध्ये आग्नेय दिशेला ठेवावी. तिथे मूर्ती ठेवणं शक्य नसल्यास घरातल्या तिजोरीत ही मूर्ती ठेवावी. असं केल्यास तुमच्या घरात कधीही पैशांची उणीव भासणार नाही.
तुम्हाला माहीत आहे नवरात्र उत्सव 9 दिवसच का असतो? जाणून घ्या नवरात्राविषयी सर्व
मोराची चांदीची मूर्ती घरात ठेवण्याव्यतिरिक्त आणखीही एक महत्त्वाची गोष्ट आहे. घरात आपण ज्या लॉकरमध्ये किंवा तिजोरीत पैसे, दागिने वगैरे मौल्यवान वस्तू ठेवतो, तो लॉकर किंवा तिजोरी घराच्या दक्षिणेकडच्या किंवा आग्नेयेकडच्या भिंतीला लागून हवी. तसंच तिजोरी किंवा लॉकर उत्तर दिशेला उघडायला हवा. उत्तर दिशा ही भगवान कुबेरांची मानली जाते. तुमच्या लॉकरचं किंवा तिजोरीचं दार उत्तर दिशेला उघडत असेल, तर ती कधीही रिती होत नाही.
हे सगळं करताना एक गोष्ट मात्र मनाशी पक्की लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे वाईट मार्गाने, लांड्यालबाड्या करून, दुसऱ्यांना फसवून मिळवलेला पैसा किंवा संपत्ती कधीच टिकून राहत नाही. प्रामाणिकपणे आणि स्वतःच्या कष्टाने मिळवलेली श्रीमंती शाश्वत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Home-decor