मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Vastu Tips: या गोष्टींमुळे वाढू शकतात तुमच्या अडचणी, कुटुंबाच्या प्रगतीत येऊ शकतात अडथळे

Vastu Tips: या गोष्टींमुळे वाढू शकतात तुमच्या अडचणी, कुटुंबाच्या प्रगतीत येऊ शकतात अडथळे

कधीकधी आपल्या घरात आपण काही अशा गोष्टी करतो ज्यामुळे घरातील वास्तू दोष (Vastu Dosh) वाढायला मदत होते. या वास्तू दोषांमुळे आपली प्रगती खुंटते. घरात शांतता नांदण्याऐवजी भांडण-तंटे, मारामाऱ्या सुरू होतात. वास्तुदोषांमुळे तुमच्या प्रगतीत अडसर येऊ नये म्हणून खालील उपाय करता येऊ शकतात.

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 15 डिसेंबर : प्रत्येकाला त्याची वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रगती व्हावी असं नेहमी वाटत असतं. आपल्या कामात प्रचंड कष्ट करून पैसे कमवणं आणि जगणं अधिक समृद्ध करणं यासाठी सगळेच प्रयत्नशील असतात. पण इतर अनेक गोष्टींचाही आपल्या प्रगतीशी संबंध असतो. त्यापैकी एक आहे वास्तू शास्र. कधीकधी आपल्या घरात आपण काही अशा गोष्टी करतो ज्यामुळे घरातील वास्तू दोष (Vastu Dosh) वाढायला मदत होते. या वास्तू दोषांमुळे आपली प्रगती खुंटते. घरात शांतता नांदण्याऐवजी भांडण-तंटे, मारामाऱ्या सुरू होतात. नोकरीत हवं तसं काम होत नाही, बढती मिळत नाही, धंदा (Business) मंदावतो. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. वास्तुदोषांमुळे तुमच्या प्रगतीत अडसर येऊ नये म्हणून खालील उपाय करता येऊ शकतात.

    - जर तुमच्या घरात एखाद्या देवीची किंवा देवाची खंडित मूर्ती असेल तर ती लवकरात लवकर घरातून बाहेर न्या आणि योग्य विधीवत तिचं विसर्जन करा. खंडित मूर्ती घरात असणं हा एक वास्तू दोष आहे. त्यामुळे अशी मूर्ती घरात ठेवू नये.

    - घरातल्या कुणाचंही मनगटी घड्याळ (Wrist Watch) बराच काळ बंद पडलं असेल आणि ते बराच काळ घरातच असेल तर ते काढून घराबाहेर टाका. जर दुरुस्त होऊन चालू होत असेल तर तसं करा. वास्तू शास्रात घड्याळाला प्रगतीचं द्योतक मानतात त्यामुळे घरात बंद पडलेलं घड्याळ ठेवणं तुमच्या कुटुंबासाठी हिताचं नाही.

    अशी स्वप्नं तुम्हालाही पडतात का? भविष्यात भरपूर पैसा मिळण्याचे असे असतात संकेत

    - घरातील वायव्य कोपरा नीट असायला हवा. हा कोपरा घरातील व्यक्तींची शक्ती आणि आरोग्य यांच्याशी संबंधित असतो. या कोपऱ्यात गडबड झाली तर विनाकारण शत्रू निर्माण होतात.

    - तुम्ही तुमच्या घरातल्या बागेत कॅकटस किंवा बोनसाय (Cactus or Bonsai) झाडं लावू नका. वास्तू शास्रात त्यांना वर्ज्य मानलं आहे. ही झाडं नकारात्मकतेचं प्रतीक असतात. त्यामुळे तुमची दैनंदिन कामं बिघडू शकतात, त्यात अनेक अडथळे येऊ शकतात.

    - घरात स्वच्छता नसेल तरीही तुमच्या आयुष्यात नकारात्मक घटना घडतात आणि तुमचं दुर्दैव लवकर सरत नाही. कुटुंबातले सदस्य आजारी पडतात. आपल्या बेडच्या खाली चपला ठेवू नका तसं केलंत, तर रोगराईसोबतच तुमच्या मनावरचा तणावही वाढेल.

    - तुटलेल्या आणि वापरात नसलेल्या वस्तू घरात ठेवू नका. जुने कपडेही घरातून काढून टाकले पाहिजेत. घरातल्या कोपऱ्यांमध्ये होणारी कोळीष्टकंही वेळोवेळी साफ करायला हवीत.

    आर्थिक समस्यांनी त्रस्त आहात? वास्तुदोष दूर करण्यासाठी लक्षात घ्या 'या' गोष्टी

    आपल्याकडे मराठीत म्हटलंच आहे की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे, याचा अर्थ तोच आहे घर स्वच्छ असलं की ते प्रसन्न राहतं आणि तिथं लक्ष्मी देवी वास करते.

    First published:

    Tags: Lifestyle, Vastu