• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • चवीला कडू असलेल्या या 5 गोष्टी आरोग्यासाठी आहेत खूप फायदेशीर; असा करा आहारात समावेश

चवीला कडू असलेल्या या 5 गोष्टी आरोग्यासाठी आहेत खूप फायदेशीर; असा करा आहारात समावेश

Bitter Foods Benefits : कडू असल्या तरी या गोष्टी पोषक तत्वांनी परिपूर्ण आहेत. यामुळे आरोग्य चांगले राखण्यासाठी देखील खूप मदत होते. चला जाणून घेऊया काही कडू पण आरोग्यासाठी फायदेशीर गोष्टींबद्दल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : आपण आहारात घेत असलेल्या अनेक गोष्टींची कदाचित चव चांगली नसते मात्र, त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असू शकतात. अनेकजण कडू फळे, भाज्या, पदार्थ खाण्यास तयार नसतात, मात्र त्यांच्यापासून मिळणाऱ्या फायद्यांचाही विचार करणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कडू (Bitter) गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्या कडू असल्या तरी पोषक तत्वांनी परिपूर्ण आहेत. यामुळे आरोग्य चांगले राखण्यासाठी देखील खूप मदत होते. चला जाणून घेऊया या कडू पण आरोग्यासाठी फायदेशीर गोष्टींबद्दल. मेथीचे दाणे मेथीच्या दाण्यांची चव खूप कडू असली तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे खनिजे, जीवनसत्त्वे आणि विद्रव्य आहारातील फायबरने समृद्ध आहे. मेथी दाणे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या तर दूर होतेच, त्याचबरोबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही ते चांगली भूमिका बजावते. यासोबतच हे कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. कारले कारले आणि त्याचा रस बऱ्यापैकी कडू असतो. पण या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. कारल्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्ससारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो, जे आरोग्य राखण्यासाठी चांगली भूमिका बजावतात. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे खूप उपयुक्त असल्याचे सिद्ध होते. ग्रीन टी ग्रीन टीची चव कडू असली तरी अनेक लोकांना ती आवडत नाही. पण ते प्यायल्याने आरोग्याला एक नाही तर अनेक फायदे होतात. याच कारणामुळं अलिकडे बरेच लोक तुम्हाला दुधासह गोड चहाऐवजी ग्रीन टी पिताना दिसतात. ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असल्याचे सिद्ध होते. यासोबतच ते प्यायल्याने रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. हे अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध आहे आणि त्यात असलेले पॉलीफेनॉल कर्करोगाच्या विरोधी पेशींशी लढण्यास मदत करतात. हे वाचा - चाचा, चाचा बस हो गया…रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणीला पाहून काकांनी दिली अशी रिअ‍ॅक्शन; VIDEO व्हायरल पालेभाज्या पालकसारख्या काही कडू किंवा तुरट चव असलेल्या अनेक पालेभाज्या आहेत. पण त्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यात असलेले लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्वांचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो आणि ते तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. हे वाचा - ‘तो ज्यादा काही करु शकत नाही’, MS Dhoni च्या नव्या रोलवर सुनील गावस्करांनी सोडले मौन डार्क चॉकलेट तरुण-तरुणींना चॉकलेट खायला आवडत असेल, पण ते डार्क चॉकलेट खाणे टाळताना दिसतात. कारण डार्क चॉकलेट हे खायला कडू असते. कारण त्यात कोको पावडर टाकली जाते, जी कोको वनस्पतीच्या बीन्सपासून बनवली जाते. पण कडू असूनही ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये झिंक, कॉपर, मॅग्नेशियम, लोह, पॉलिफेनॉल आणि अँटी-ऑक्सिडंट घटक असतात. जे रक्तवाहिन्या मोकळ्या राहण्यास मदत करतात तसेच इंफ्लेमेशन होण्याच्या समस्येमध्ये आराम मिळतो. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: