• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • आता पैसे खर्च करून मिळवा अमरत्व; या कंपनीच्या दाव्यामुळे चर्चेला उधाण

आता पैसे खर्च करून मिळवा अमरत्व; या कंपनीच्या दाव्यामुळे चर्चेला उधाण

जवळपास सर्वच माणसांना अमर होण्याची सुप्त इच्छा असते. इतिहासात कित्येकांनी तर यासाठी विविध प्रयोगही करून पाहिले आहेत.

  • Share this:
    अमेरिका, 25 ऑक्टोबर : जवळपास सर्वच माणसांना अमर होण्याची सुप्त इच्छा असते. इतिहासात कित्येकांनी तर यासाठी विविध प्रयोगही करून पाहिले आहेत. आतापर्यंत अशा प्रयत्नांमध्ये कोणीही यशस्वी झालं नाही; पण आता अमेरिकेतल्या एका कंपनीने आपण कोणालाही अमर (Company claims to make people immortal) करू शकतो असा दावा केला आहे. एवढंच नाही, तर मृत्यूची वेळ येऊन गेल्यानंतर दर वर्षी तुम्ही केवळ 52 हजार रुपयांमध्ये जिवंत राहू शकता असंही या कंपनीने म्हटलं आहे. अमेरिकेतल्या स्कॉट्सडेल अॅरिझोनामध्ये (Arizona) असणाऱ्या अल्कोअर क्रायोनिक्स (Alcore Cryonics) या कंपनीने हा दावा केला आहे. डेली स्टारच्या हवाल्याने 'आज तक'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, विशिष्ट प्रकिया (Make people live forever) करून त्याला जिवंत करता येऊ शकतं असं या कंपनीचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे यासाठी लागणारा खर्चही अब्जावधींमध्ये नसून, तुलनेने अगदीच माफक आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर, त्याच्या मृतदेहाला आणि मेंदूला लिक्विड नायट्रोजनमध्ये (Freezing brain in Liquid nitrogen) ठेवण्यात येईल. यामुळे शरीरातले अवयव आणि मेंदू यांना कोणतंही नुकसान पोहोचणार नाही आणि ते बराच काळ सुस्थितीत राहतील. यानंतर व्यक्तीच्या मेंदूला एका निरोगी शरीरामध्ये ट्रान्सप्लांट (Transplant brain in healthy body) करण्यात येईल. हा मेंदू पुन्हा सुरू झाल्यामुळे, ती व्यक्तीही जिवंत होईल. हीच प्रक्रिया पुढे पुन्हा पुन्हा करून ती व्यक्ती अमर होऊ शकते. हे ही वाचा-तुमच्या आतल्या त्या 'बाल मनाला' कधीही मरू देऊ नका; मानसिक आरोग्य राहील उत्तम कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मृत शरीराला सुरक्षित ठेवण्यासाठी सुमारे दोन लाख (Charges to be Immortal) डॉलर्स, म्हणजेच सुमारे दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. ही प्रक्रिया केल्यानंतर दर वर्षीचा खर्च 705 डॉलर्स, म्हणजेच सुमारे 52 हजार रुपये असणार आहे. न्यूरो-रोगी (Neuro patients) असणाऱ्यांसाठी हा खर्च 80 हजार डॉलर्स, म्हणजेच सुमारे साठ लाख रुपये असणार आहे. या कंपनीचे सीईओ मॅक्स मोर हे ब्रिटिश आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, 80 हजार डॉलर्स किंवा दोन लाख डॉलर्स ही किंमत तुलनेने अगदीच स्वस्त आहे. “कित्येकांना असं वाटतं, की माझ्याकडे एवढे पैसे तर नाहीत; पण या प्रक्रियेचे फायदे ते लक्षात घेत नाहीत,” असंही मॅक्स म्हणाले. एकंदरीत, निवृत्तीनंतर वापरण्यासाठी जी बचत केली जाते, ती आता खरं तर उतारवयासाठी नाही, तर चक्क दुसऱ्या जन्मासाठीदेखील वापरणं शक्य आहे. कदाचित पुढील काही वर्षांमध्ये या तंत्रज्ञानात प्रगती होऊन ते अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि स्वस्तही होईल. तेव्हा भविष्यात अमर व्हायचं असेल, तर आताच पैसे साठवण्यास सुरुवात करा, असं कोणी म्हणत असेल तर त्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही.
    First published: