मुंबई, 08 जून : कोरोनातून (Coronavirus) सावरत असताना रुग्णांची संख्या आता झपाट्यानं कमी होत आहे. मंगळवारी राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा (Tuesday 8th June Corona Update) हा आणखी कमी झाल्याचं पाहायला मिळालं. 11 हजारांच्याही खाली एका दिवसांतील कोरोना रुग्णांचा आकडा आला आहे. तर राज्यातला रिक्वहरी रेट (Recovery Rate) हा 95 टकक्यांपेक्षाही अधिक झाला आहे. (वाचा- डेल्टानंतर भारतात आणखी एक भयंकर कोरोना; पुण्यात सापडला सर्वात घातक स्ट्रेन ) मंगळवारच्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा विचार करता दिवसभरात राज्यात आढळलेल्या नव्या कोरोना रुग्णांची संख्या ही 10 हजार 891 एवढी आहे. तर दिवसभराता कोरोनावर मात करून घरी गेलेल्या रुग्णांचा आकडा हा 16 हजार 577 एवढा आहे. राज्यातील आतापर्यंतचा कोरोना रुग्णांचा एकूण आकडा हा 55 लाख 80 हजार 925 झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) 95.35% झालं आहे. (वाचा- परदेशात जाणाऱ्या नागरिकांना दिलासा; लसीकरणाबाबत सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय ) राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र असं असलं तरी मंगळवारी मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांचा आकडा 295 एवझा आहे. राज्यातील सध्याचा कोरोनाचा मृत्यूदर हा 1.73 एवढा आहे. कोरोना रुग्ण आढळण्याचं प्रमाण म्हणजे पॉझिटिव्हिटी रेट 15.86 एवढा आहे. राज्यातील विविध जिल्हे आणि शहरांच्या आकडेवारीचा विचार करता सगळीकडं आकडे कमी होत असल्याचं दिसत आहे. कोल्हापूर वगळता कोरोना रुग्णांचा आकडा कुठंही 1000 च्या वर गेलेला पाहायला मिळालेला नाही. मृत्यूमध्येही कोल्हापुरात 28 आणि रत्नागिरीत 27 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळं काही शहरं वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी परिस्थिती आवाक्यात आलेली पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.