जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / काय सांगता! व्हॅलेंटाईन डे ला बॉयफ्रेंडही मिळणार भाड्याने? भारतात रुजतोय 'Rent a Boyfriend' नावाचा ट्रेंड

काय सांगता! व्हॅलेंटाईन डे ला बॉयफ्रेंडही मिळणार भाड्याने? भारतात रुजतोय 'Rent a Boyfriend' नावाचा ट्रेंड

 'Rent a Boyfrind' नावाचा ट्रेंड

'Rent a Boyfrind' नावाचा ट्रेंड

‘रेंट अ बॉयफ्रेंड’ नावाचा हा ट्रेंड आहे. म्हणजेच घर किंवा गाडी भाड्यानं घेतल्याप्रमाणं तुम्ही बॉयफ्रेंडदेखील भाड्यानं घेऊ शकता. मात्र…..

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 13 फेब्रुवारी:  उद्या (14 फेब्रुवारी) व्हॅलेंटाईन्स डे आहे. ज्या व्यक्ती रिलेशनशीपमध्ये असतील त्यांच्यासाठी हा दिवस फार विशेष असेल. त्यामुळे या व्यक्ती आनंदी आहेत. ज्या व्यक्ती सिंगल आहेत त्या काहीशा नाराज झाल्या असतील. आपल्यालाही कोणीतरी सरप्राईज द्यावं, भेटवस्तू द्याव्यात अशी अनेकांची इच्छा असेल. पण, सिंगल असल्यामुळे त्यांना अशा गोष्टींचा आनंद घेता येणार नाही. अशा वेळी त्यांना सध्या सुरू असलेला एक नवीन ट्रेंड मदत करू शकतो. ‘रेंट अ बॉयफ्रेंड’ नावाचा हा ट्रेंड आहे. म्हणजेच घर किंवा गाडी भाड्यानं घेतल्याप्रमाणं तुम्ही बॉयफ्रेंडदेखील भाड्यानं घेऊ शकता. मात्र, ही सुविधा फक्त मुलींसाठीच उपलब्ध आहे. सध्या मुलांसाठी भाड्यानं गर्लफ्रेंडची सुविधा उपलब्ध झालेली नाही. ‘दैनिक भास्कर’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलेलं आहे. भारतात 2018 मध्ये आलेली ही संकल्पना चीन आणि जपानमध्ये फार पूर्वीपासून सुरू आहे. 2010 मध्ये, चीनमधील अनेक वेबसाइट्सवर भाड्यानं बॉयफ्रेंडच्या मिळण्याच्या अनेक जाहिराती दिसल्या होत्या. चीनमध्ये नवीन वर्ष सुरू झालं की तेथील तरुण कुटुंबाला भेटायला जातात. घरच्यांना खूश करण्यासाठी, आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं दाखवण्यासाठी बनावट बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड्सना ते घरी घेऊन जाऊ लागले होते. जपानचे लोक किती कष्टाळू आहेत हे साऱ्या जगाला माहीत आहे. कामात व्यग्र असलेल्या मुली भाड्याने बॉयफ्रेंड शोधण्यात व्यस्त असतात. तिथल्या मुली एका तासासाठी पाच हजार जपानी येन म्हणजेच तीन हजार 156 रुपये भाडं देऊन बॉयफ्रेंड मिळवतात. जपानच्या Soine-ya प्राईम नावाच्या कंपनीने 2011 मध्ये या प्रकारची सेवा सुरू केली होती. Valentine’s Day: शाहजहान-मुमताज ते बाजीराव-मस्तानी; या आहेत अजरामर प्रेम कथा ग्लोबल व्हिलेजच्या काळात हा ट्रेंड भारतातही लोकप्रिय होत आहे. ज्या मुलींना रिलेशनशिप आणि कमिटमेंटपासून दूर राहायला आवडतं त्यांच्यासाठी हा प्रकार सोयीस्कर आहे. गरज असेल तेव्हा अॅपद्वारे काही तासांसाठी हँडसम आणि बुद्धिमान बॉयफ्रेंड मिळवता येतो. भारतात 2018 मध्ये ‘रेंट अ बॉय | फ्रेंड’ (RABF) हे अ‍ॅप लाँच झालं. त्याची फार चर्चा झाली. या अ‍ॅपवर मुली बॉयफ्रेंड म्हणून बुक करू शकतात. अ‍ॅप लाँच झाल्यानंतर काही वर्षातचं कोरोना आणि लॉकडाऊन सुरू झालं. मात्र, कोरोना कमी झाल्यानंतर लवकरच हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर सर्वाधिक सर्चिंग अ‍ॅप बनले. सध्या या अ‍ॅपचे एक लाखाहून अधिक वापरकर्ते आहेत. त्याचप्रमाणे, 2022 मध्ये मोहित चुरीवाला आणि आदित्य लाखियानी नावाच्या दोन तरुणांनी बेंगळुरूतील लोकांसाठी ‘द बेटर डेट’ नावाचं अ‍ॅप सुरू केले. याशिवाय, याच शहरात ‘ToYBoY’ नावाचं पोर्टल देखील सुरू आहे. या अ‍ॅप्सवर मॉडेल, सेलिब्रिटी आणि अगदी सामान्य मुलांसोबत वेळ घालवण्याचे अनेक पर्याय आहेत. सेलिब्रिटी बॉयफ्रेंडसाठी प्रती तास तीन हजार रुपये, मॉडेल बॉयफ्रेंडसाठी दोन हजार रुपये आणि सामान्य बॉयफ्रेंडसाठी 400 रुपये भाडं आकारलं जातं. रोमँटिक वेडिंग फोटोशूट करताना कपलसोबत घडला भयंकर प्रकार, VIDEO VIRAL RABF अ‍ॅपचे संस्थापक कुशल प्रकाश यांनी एका मुलाखतीत सांगितलं की ‘रेंट अ गर्लफ्रेंड’ ही संकल्पना भारतात योग्य वाटत नाही. म्हणून ‘रेंट अ बॉयफ्रेंड’ ही संकल्पना सुरू झाली. मुलींचा एकटेपणा दूर करून त्यांना नैराश्यातून मुक्त करणं हा या अ‍ॅपचा उद्देश आहे. रिलेशनशिप समुपदेशक डॉ. गीतांजली शर्मा सांगतात की, एकाकीपणामध्ये न्यूनगंडानं वेढलेल्या व्यक्तीला स्वतःमध्ये जास्त कमतरता जाणवतात. अशी व्यक्ती कोणाचातरी सहवास आणि प्रेम शोधू लागते. आजकाल लोक त्यांच्या आयुष्यात इतके व्यस्त आहेत की, त्यांच्याकडे इतर नात्यांसाठी वेळ नाही. आजची तरुणाई कमिटमेंटदेखील टाळते. व्हॅलेंटाइन वीक सुरू होताच सगळीकडे त्याची धूम सुरू होते. आजूबाजूचा परिसर रोमँटिक दिसतो. रोमँटिक जोडपं पाहिल्यानंतर सिंगल व्यक्तींना अधिक एकटं वाटू लागतं. अशाप्रकारे त्यांचा एकटेपणा वाढतो ज्याचे रूपांतर नैराश्यात होतं. दिल्लीत राहणारी एक तरुणी सांगते की, गेल्या वर्षी तिचं ब्रेकअप झालं होतं. सध्या तिला कोणत्याही नात्यात रस नाही आणि तिला कोणाशीही कमिटेड व्हायचे नाही. पण, तरीही तिला कोणीतरी महत्त्व द्यावं, स्पेशल ट्रिटमेंट द्यावी, अशी तिची इच्छा आहे. त्यासाठी रेंटल बॉयफ्रेंड ही संकल्पना तिला सोयीस्कर वाटते. लग्न मंडपात जाण्याऐवजी वधू पोहोचली भलत्याच ठिकणी, Video होतोय व्हायरल बहुतांशी रिलेशनशिप समुपदेशकांच्या मते, भाड्यानं बॉयफ्रेंड घेतल्यामुळे व्यक्तीची सोशल इमेज खराब होऊ शकते. आपल्या समाजात लग्नाआधी मुली किंवा मुलासोबत फिरणं योग्य मानलं जात नाही. अशा परिस्थितीमध्ये एखाद्यानं बनावट बॉयफ्रेंडची ओळख कुटुंबीयांशी किंवा मित्रांशी करून दिली तर नंतर प्रत्येकाला सत्य सांगणं कठीण होऊ शकतं. अशा खोट्या नात्यामुळे ब्लॅकमेलिंगसारख्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात