मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Vagina Discharge मध्ये बदल; महिलांनो दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजार

Vagina Discharge मध्ये बदल; महिलांनो दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजार

सर्वसामान्यपणे याला व्हाईट डिस्चार्ज (White Discharge) असं म्हटलं जातं, व्हाईट डिस्चार्जमध्ये होणारे हे बदल काही वेळा सामान्य असू शकतात. तर काही वेळा गंभीर अशा समस्येचं लक्षणही असू शकतं. त्यामुळे महिलांना व्हजायना डिस्चार्जबाबत  (vagina Discharge) माहिती असायलाच हवी.

पुढे वाचा ...
  • Published by:  Priya Lad
मुंबई, 3 फेब्रुवारी : व्हजायना डिस्चार्ज  (vagina Discharge) म्हणजे योनीमार्गातून येणारं पाणी. सर्वसामान्यपणे याला व्हाईट डिस्चार्ज (White Discharge) असं म्हटलं जातं, कारण त्याचा रंग तसा असतो. व्हाईट डिस्चार्ज, हे महिलांमध्ये सामान्य आहे. मात्र त्यामध्ये अनेक बदल होत असतात. व्हाईट डिस्चार्जमध्ये होणारे हे बदल काही वेळा सामान्य असू शकतात. तर काही वेळा गंभीर अशा समस्येचं लक्षणही असू शकतं. त्यामुळे महिलांना व्हजायना डिस्चार्जबाबत माहिती असायलाच हवी. गुलाबी, लालसर किंवा ब्राऊन डिस्चार्ज मासिक पाळीच्या (Menstrual Period) आधी आणि नंतर असा डिस्चार्ज असतो. तसंच जर तुम्ही गर्भनिरोधक वापरल्यानंतर काही महिन्यांनीही असा डिस्चार्ज येतो. पारदर्शी, पांढरा आणि पातळसर 2 मासिक पाळीच्या मध्ये ovulation होतं, तेव्हा  असा डिस्जार्च येतो. मात्र अनेक महिला असा डिस्चार्ज झाल्यास घाबरतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, हा डिस्चार्ज सामान्य आहे. पांढरा, जाड डिस्जार्ज आणि खाज येत असल्यास हे यिस्ट इन्फेक्शन (yeast infection) असू शकतं. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार व्हजायनामध्ये Candida हे बॅक्टेरिया नैसर्गिकरित्या असतात. त्यांची वाढ जास्त झाल्यास यिस्ट इन्फेक्शन होतं. यिस्ट इन्फेक्शन झाल्यास डिस्चार्ज हा दुर्गंधयुक्त नसला तरी भरपूर प्रमाणात खाज येते. पिवळा डिस्चार्ज तज्ज्ञांच्या मते, सर्वाधिक दिवस जर तुम्हाला पिवळा डिस्चार्जच दिसत असेल, तर ते सामान्य आहे. कारण व्हाईट डिस्चार्ज हवेच्या संपर्कात आल्यास तो पिवळा होऊ शकतो. मात्र जर तुम्हाला पिवळ्या डिस्चार्जसह वेदना, खाज अशी समस्या जाणवत असेल तर मात्र हे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं. पिवळसर-हिरवा डिस्चार्ज आणि वेदना असा डिस्चार्ज असल्यास हे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं. तज्ज्ञांच्या मते, या लक्षणांसह पेल्विक पेन आणि लघवी करताना जळजळ होणे अशीही लक्षणं दिसून येतात. दुर्गंधीयुक्त ग्रे डिस्चार्ज तुमच्या डिस्चार्जला माशांसारखा वास येत असेल, तर bacterial vaginosis हे व्हजायना इन्फेक्शन असू शकतं, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. फेसाळ, ग्रे किंवा हिरव्या रंगाचा, घाणेरडा वास येणारा डिस्चार्ज अशी लक्षणं दिसल्यास Trichomoniasis या सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन असू शकतं. औषधोपचार करून हा आजार बरा करता येतो. सूचना – या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज १८ लोकमत याची पुष्टी देत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
अन्य बातम्या स्त्रियांनी SEX नंतर चुकूनही करू नयेत 'या' 5 गोष्टी प्रेग्नन्सीत ब्लीडिंगमुळे होणारा गर्भपात टळणार, 'ही' हार्मोन थेरेपी वरदान ठरणार
First published:

Tags: Health, Woman

पुढील बातम्या