लंडन, 3 फेब्रुवारी : अनेक महिलांना प्रेग्नन्सीमध्ये (Pregnany) ब्लीडिंग (Bleeding) होतं, यामुळे गर्भपाताचा (Miscarriages) धोका वाढतो. कित्येक महिलांना वारंवार गर्भपाताला सामोरं जावं लागतं. मात्र आता अशाच महिलांसाठी प्रोजेस्ट्रॉन हार्मोन थेरेपी (Progesterone hormone therapy) वरदान ठरणार आहे. प्रोजेस्टेरॉन हार्मोन थेरेपीमुळे गर्भावस्थेत होणारी गुंतागुंत कमी होऊ शकते, सोबतच गर्भपाताचा धोकाही कमी होतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात हे समोर आलं आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅम अँड टॉमीझ नॅशनल सेंटर फॉर मिसकॅरेजच्या (University of Birmingham and Tommy's National Centre for Miscarriage) संशोधकांनी हा अभ्यास केला. अमेरिकन जर्नल ऑफ ऑब्सटेट्रिक्स अॅण्ड गाइनॉकोलॉजीमध्ये (American Journal of Obstetrics and Gynaecology) हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.
हेदेखील वाचा - सावधान ! प्रेग्नन्सीमध्ये करू नका ‘ही’ चूक; नाहीतर बाळाला होऊ शकतं फ्रॅक्चर
काय आहे संशोधन?
संशोधकांनी सांगितल्यानुसार, प्रोजेस्टेरॉन हार्मोन अंडाशय (Ovary) आणि प्लेसेंटा (Placenta) मार्फत गर्भावस्थेच्या सुरुवातीलाच नैसर्गिकरित्या निर्मिती करण्यात आली.
संशोधकांनी 2 प्रकारे वैद्यकीय चाचणी केली, प्रोमिस (Promise) आणि प्रिज्म (Prism)
प्रोमिसच्या माध्यमातून गर्भपात झालेल्या 836 महिलांचा अभ्यास करण्यात आला, ज्यात हार्मोन थेरेपी दिल्याने यशस्वी जन्मदर 3 टक्क्यांनी वाढला
तर प्रिज्मच्या माध्यमातून ज्या महिलांना गर्भावस्थेत ब्लीडिंगची समस्या होती, अशा 4,135 महिलांचा अभ्यास करण्यात आला. त्यांना हार्मोन थेरेपी दिल्यानंतर यशस्वी जन्मदरामध्ये 5 टक्के वाढ झाली.
हेदेखील वाचा - सिझेरियन नको, नॉर्मल डिलिव्हरी हवी; मग गरोदरपणात घ्या 'ही' काळजी
संशोधनाचे अभ्यासक डॉ. एडम डेवल (Dr. Adam Devall) यांनी सांगितलं की, "गर्भावस्थेच्या दरम्यान 20 ते 25 टक्के गर्भपात होतात. अशा महिला आणि त्यांच्या कुटुंबाच्या मनावर मोठा आघात होतो. अशावेळी हार्मोन थेरेपी सर्वात स्वस्त आणि चांगला असा उपचार आहे. ज्या महिलांचा आधी गर्भपात झाला आहे. त्यांच्यासाठी ही थेरेपी खूपच फायद्याची आहे. या थेरेपीच्या माध्यमातून यशस्वी जन्मदरात 15 टक्क्यांची वाढ होऊ शकते. गर्भावस्थेच्या सुरुवातीला ज्या महिलांना रक्तस्राव होतो, त्यांना ही हार्मोन थेरेपी दिली जाईल. यामुळे गर्भपाताचा धोका कमी होऊ शकतो"