कोरोना झाला तर 2 लाख रुपये देणार; या देशाची परदेशी पर्यटकांना ऑफर

कोरोना झाला तर 2 लाख रुपये देणार; या देशाची परदेशी पर्यटकांना ऑफर

पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या देशाच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

ताशकंद, 28 जून : परदेशात फिरणं म्हटलं की आपल्या खिशातील पैसे खर्च होतातच, मात्र आता कोरोनाच्या परिस्थितीत काही देश पर्यटकांनाच पैसे देण्याचं आश्वासन देऊन त्यांना आपल्या देशात बोलवत आहे. त्यापैकीच एक म्हणजे उज्बेकिस्तानने (Uzbekistan).

जर कोणत्या परदेशी पर्यटकाला (tourist) आपल्या देशात कोरोनाव्हायरसची लागण झाली, तर त्याला 3,000 डॉलर म्हणजे जवळपास 2 लाख 26 हजार रुपये देणार, अशी घोषणा उज्बेकिस्तान सरकारने केली आहे.

उज्बेकिस्तानमध्ये लॉकडाऊन (lockdown) लागू केल्यानंतर कोरोनाव्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे. आता लॉकडाऊनमध्ये विस्कटलेली आर्थिक घडी सुरळीत बसवण्यासाठी पर्यटन क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न देशाने सुरू केला आहे.  जर उज्बेकिस्तानमध्ये कोणता पर्यटक आजारी पडला तर त्याचा आरोग्य खर्च सरकार उचलणार आहे.

हे वाचा - ...तर 'त्या' शहरांमध्ये लॉकडाउन लागू होईल, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे

उज्बेकिस्तानमध्ये सुरक्षित यात्रा गॅरंटी हे अभियान चालवलं जातं आहे.  पर्यटकांना कोरोनाव्हायरसची लागण होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. पुरेपूर स्वच्छता राखली जात आहे आणि त्यामुळेच परदेशी पर्यटकाला कोरोनाव्हायरसची लागण झाल्यास त्याच्या आरोग्य खर्च उचलण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उज्बेकिस्तानचे राष्ट्रपती शवकात मिर्जीयोयेव यांनी हा निर्णय घेतला आहे.

उज्बेकिस्तानमधील ब्रिटिश पर्यटन दूत सोफी इबोटसन यांनी सांगितलं, आम्ही उज्बेकिस्तानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या आरोग्याबाबत आश्वास्त केलं जातं आहे. देशात पर्यटन क्षेत्रात सुरक्षा आणि साफसफाईची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आणि यामुळेच राष्ट्रपती परदेशी पर्यटकांना पैसे देण्यासाठी तयार झालेत.

हे वाचा - Lockdown की Unlock-2? देशातल्या राज्यांमध्ये असे आहेत नियम, वाचा एका CLICKवर

मात्र पर्यटनासाठी काही नियम आहेत. परदेशी पर्यटक स्थानिक टुरिस्ट गाइड्सहच फिरतील पर्यटकांना राहण्यासाठी असलेल्या हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस, पर्यटन स्थानकांमध्ये सुरक्षा आणि स्वच्छतेची योग्य खबरदारी घेतली आहे की नाही यासाठी सरकारकडून प्रमाणपत्रं घेणं बंधनकारक आहे.

चीन, इज्राइल, जपान आणि दक्षिण कोरिया अशा देशात जिथं आता कोरोनाव्हायरसची प्रकरणं कमी आहेत, या देशातील नागरिक पर्यटनासाठी येऊ शकतात. तर यूके आणि युरोपहून येणाऱ्या पर्यटकांना 14 दिवस क्वारंटाइन व्हावं लागेल.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: June 28, 2020, 4:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading