जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / प्रसूती झाली तरी पोट लागत होतं कडक; पुन्हा ऑपरेशन केल्यानंतर डॉक्टरांना बसला धक्का

प्रसूती झाली तरी पोट लागत होतं कडक; पुन्हा ऑपरेशन केल्यानंतर डॉक्टरांना बसला धक्का

प्रसूती झाली तरी पोट लागत होतं कडक; पुन्हा ऑपरेशन केल्यानंतर डॉक्टरांना बसला धक्का

प्रसूतीनंतर महिलेला इतका त्रास होऊ लागला की तिला चार महिन्यांनी पुन्हा ऑपरेशन करावं लागलं आणि वेळीच ऑपरेशन झालं नसतं तर ते तिच्या जीवावर बेतलं असतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

संदीप मिश्र/लखनौ, 02 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) सीतापूर (Sitapur) जिल्ह्यात राहणाऱ्या शगुफ्ता अंजुमला 4 महिन्यांपूर्वी तिची प्रसूती (delivery) झाली. मात्र त्यानंतर तिच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या आणि सातत्याने उलट्याही होत होत्या. औषधांचा काहीच परिणाम होत नसल्यानं 4 महिन्यांनी तिचं पुन्हा ऑपरेशन केलं आणि जे दिसलं ते पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. शगुफ्ता अंजुमलाच्या पोटात चक्क टॉवेल सापडला. प्रसूतीदरम्यान डॉक्टरांनी केलेला हलगर्जीपणा उघड झाला. 5 जून 2020 प्रसूती शगुफ्ता अंजुमला यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यांना सीतापूर जिल्ह्यातील महिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती गंभीर होती, त्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचं ठरवलं. मात्र बाळ झाल्यानंतर शगुफ्ताच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या आणि तिला सातत्याने उलट्याही होत होत्या, पोट कडक झालं होतं, असं तिचा पती मोहम्मद फैजान अख्तर अन्सारीनं सांगितलं. त्यानंतर तिला पुन्हा त्याच रुग्णालयात नेण्यात आलं, जिथं तिची प्रसूती झाली. सीएमएस डॉ. सुषमा कर्णवाल यांनी तिची प्रसूती केली होती. त्यांनी तिची तपासणी करून काही गोळ्या दिला आणि काही दिवसांत आराम मिळेल असं सांगितलं.  मात्र त्या औषधांचा काही परिणाम झाला नाही. तिचं अल्ट्रासाऊंट, सिटी स्कॅनही करून पाहिलं मात्र काहीच समजत नव्हतंस असं मोहम्मद फैजान म्हणाले. हे वाचा -  डोळा दुखू लागला म्हणून रुग्णालयात गेला; जे दिसलं ते पाहून डॉक्टरही हडबडले अखेर त्यांनी आपल्या पत्नीला लखीमपूरमधील रुग्णालयात नेलं. तिथं डॉ. जेड खान यांना दाखवलं. त्यांनी तिचं एमआरआय केलं. त्यावेळी तिच्या पोटात एक वस्तू असल्याचं समजलं आणि डॉक्टरांनी पुन्हा ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं. ऑपरेशननंतर तिच्या पोटातून टॉवेल निघाला. टॉवेल पोटात राहिल्यानं पोटात संक्रमण पसरलं होतं. तिची एक आतडी खराब झाली होती, जी कापावी लागली. कारण संक्रमणामुळे तिच्या जीवाला धोका होता, असं डॉक्टरांनी सांगितलं. आतडी कापून डॉक्टरांनी तिचा जीव वाचवला. आता तिला कोणताही धोका नसल्याचं तिच्या नवऱ्यानं सांगितलं. हे वाचा - दररोज पोटदुखीसह 5 लक्षणं; तुमच्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवात झालाय बिघाड मोहम्मद फैजाननं ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीप्रकरणी  10 ऑक्टोबरला पोलिसात तक्रार नोंदवली. 22 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी आणि सीएमओंना पत्र दिलं. संबंधित सीएमएसविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  दरम्यान ही गंभीर बाब आहे. या प्रकरणी सक्षम अधिकाऱ्यामार्फत तपास करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन सीएमओ डॉक्टर आलोक वर्मा यांनी दिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात