Home /News /lifestyle /

shocking! डोळा दुखू लागला म्हणून रुग्णालयात गेला; जे दिसलं ते पाहून डॉक्टरही हडबडले

shocking! डोळा दुखू लागला म्हणून रुग्णालयात गेला; जे दिसलं ते पाहून डॉक्टरही हडबडले

रुग्णाला डोळ्यांमध्ये समस्या (eye problem) जाणवत होती, मात्र थकव्यामुळे होत असावं असं समजून त्यानं फारसं लक्ष दिलं नाही.

    बीजिंग, 29 ऑक्टोबर : अनेकदा डोळे दुखू (eye pain) लागले की डोळ्यांवरील ताण, थकवा यामुळे ते दुखत असावेत असंच आपल्याला वाटतं. अशावेळी डोळ्यांमध्ये एखादा ड्रॉप टाकतो, ज्यामुळे तात्पुरता आराम मिळतो. मात्र डोळे दुखण्याचं कारण असं काही असू शकतं ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. चीनमधील (china) एका व्यक्तीला याचा अनुभव आला आहे. त्याच्या डोळ्यांतील वेदनांचं कारण होतं ते डोळ्यांतील किडे (worm in eye). चीनमधील एका व्यक्तीच्या डोळ्यांतून डॉक्टरांनी जिवंत किडे बाहेर काढले आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण एक-दोन नव्हे तर तब्बल 20 किडे डॉक्टरांना त्याच्या डोळ्यात सापडले. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार जिआंग्सू प्रांतातील सोझू शहरात राहणारे 60 वर्षांचे वान. त्यांच्या डोळ्यात त्यांना समस्या जाणवत होती. आपल्या डोळ्यात काहीतरी आहे, असं त्यांना सतत वाटत होतं. मात्र कदाचित  थकव्यामुळे असं होत असावं असं समजून त्यांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मात्र हळूहळू समस्या वाढतच गेली. त्यानंतर ते सुजो शहरातील एका रुग्णालयात गेले. तिथं डॉक्टारांनी त्यांच्या डोळ्यांची तपासणी केली. त्यांच्या डोळ्यात डॉक्टरांना किडे दिसले. हे वाचा - रुग्ण बोलत राहिला आणि डॉक्टरांनी केलं मेंदूचं ऑपरेशन; गप्पा मारत काढला ट्युमर वान यांच्या उजव्या डोळ्याच्या पापणीखाली किडे होते. डॉक्टरांनी एकेएक किडा काढायला घेतला. असे एक-दोन नव्हे तर तब्बल 20 किडे डॉक्टरांनी वान यांच्या डोळ्यांच्या पापणीवरून काढले. हे किडे जिवंत होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या किड्यांना नेमाटोड म्हटलं जातं. सामान्यपणे हे किडे कुत्रे, मांजर अशा प्राण्यांच्या डोळ्यात असतात. अळ्यांपासून किडे तयार व्हायरला 15 ते 20 दिवस लागतात. प्राण्यांच्या संपर्कात असताना माणसांच्या शरीरातही या किड्यांचा प्रवेश होऊ शकतो. मात्र वान यांच्या घरी कोणताच पाळीव प्राणी नव्हता. मात्र ते कामानिमित्त बाहेर जायचे. त्यावेळी ते प्राण्यांच्या संपर्कात आले असावेत आणि त्यांच्या डोळ्यातही किडे झाले असावे, असं डॉक्टरांनी सांगितलं. हे वाचा - कोरोनानंतर आता आणखी एका जीवघेण्या आजाराचं संकट; पुरुषांनाच सर्वात जास्त धोका त्यामुळे पाळीव प्राणी असलेल्या आपली विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. नेमाटोडसारखे प्राण्यांमधील परजीवी मानवी शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे प्राण्यांची स्वच्छा राखावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle

    पुढील बातम्या