जर पोटात दररोज दुखण्याची (stomach pain) समस्या उद्भवत असेल तर ते चरबीयुक्त यकृतसारख्या (fatty liver) आजाराचं लक्षण असू शकते. म्हणून जर सतत पोटात वेदना होत असतील तर डॉक्टरांकडून तपासणी केली पाहिजे. जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन मोठी समस्या उद्भवू शकते. चरबीयुक्त यकृत हा एक आजार आहे ज्यामध्ये यकृतामध्ये सूज येते. चरबीयुक्त यकृताची सुरुवातीची काही विशिष्ट लक्षणं नसतात. मात्र पोटदुखी हे एक सामान्य लक्षण आहे आणि हळूहळू इतर अनेक लक्षणं दिसू लागतात. myupchar.com शी संबंधित एम्सच्या डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी यांच्या मते, चरबीयुक्त यकृतमुळे पोटात वेदनांबरोबर उलटी, मळमळ, भूक न लागणं आणि अचानक वजन कमी होणं यासारखी लक्षणं दिसू शकतात. हा आजार बहुधा 40 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये आढळू शकतो. यामुळे कावीळदेखील होऊ शकते. जर याची काळजी घेतली नाही तर समस्या आणखी वाढू शकतात, ज्यामुळे यकृत खराब होऊ शकतं. चरबीयुक्त यकृताची कारणं लठ्ठपणा : लठ्ठपणा स्वतः बरोबर बर्याच रोगांना अमांत्रण देतो. लठ्ठपणामुळे मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल वाढण्यासारख्या समस्या उद्भवतात. या सर्व समस्या यकृतावर देखील परिणाम करतात, ज्यामुळे यकृत सूजते. जास्त प्रमाणात मद्यपान : जे लोक जास्त प्रमाणात मद्यपान करतात किंवा इतर मादक पदार्थांचं सेवन करतात त्यांच्या यकृतावर चरबीचा थर निर्माण होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे यकृतामध्ये सूज येते. यामुळे यकृत खराब होऊ शकतं. आनुवंशिक कारण : जर पालकांना किंवा घरातील कोणत्याही सदस्याला चरबीयुक्त यकृताचा रोग असेल तर त्यांच्याकडून हा रोग मुलांना देखील होऊ शकतो. औषधांचा ओव्हरडोज : अॅस्पिरिनसारख्या औषधांचा ओव्हरडोज घेतलेल्या लोकांना चरबीयुक्त यकृत रोगाचा धोका संभवतो. त्याचवेळी हिपॅटायटीस सी समस्यांनी ग्रस्त रुग्णांना देखील चरबीयुक्त यकृताशी संबंधित समस्या असू शकतात. याव्यतिरिक्त गर्भवती महिलांनादेखील चरबीयुक्त यकृताची समस्या होऊ शकते जे संप्रेरक बदलांमुळे होतं. अनियमित आहार : जे लोक वेळेवर खात नाहीत आणि अधिक तेलकट तिखट खातात. या व्यतिरिक्त जे लोक जंकफूड खातात त्यांनादेखील चरबीयुक्त यकृत रोग होऊ शकतो. चरबीयुक्त यकृतापासून कसं करावं संरक्षण myupchar.com शी संबंधित डॉ. आयुष पांडे यांनी सांगितलं, चरबीयुक्त यकृताची समस्या टाळण्यासाठी खाद्यपदार्थात विशेष काळजी घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. अशा आहाराचा आपल्या आहारात समाविष्ट करा जे यकृत निरोगी बनवतं. चरबीयुक्त पदार्थ टाळावे आणि जंक फूड खाणं देखील टाळावं. वजन कमी करण्याचा प्रयत्न देखील करावा. वजन कमी करण्यासाठी नियमितपणं व्यायाम करत रहा. मद्यपानासारख्या गोष्टींचं जास्त प्रमाणात सेवन टाळा. याशिवाय अशा औषधांचं जास्त प्रमाणात सेवन करणंदेखील टाळलं पाहिजे ज्याचा यकृतावर वाईट परिणाम होतो. हे टाळण्यासाठी शरीराचं वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रथम प्रयत्न केला पाहिजे. जसं जसं शरीराचं वजन वाढतं तसं तसं चरबीयुक्त यकृच्या समस्येचा धोका वाढतो. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - सकस आहार न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.