बायकोच्या हाती लागली एक चावी आणि एका क्षणात उलगडले नवऱ्याचे सर्व सिक्रेट्स

बायकोच्या हाती लागली एक चावी आणि एका क्षणात उलगडले नवऱ्याचे सर्व सिक्रेट्स

या एका चावीनं तिच्या नवऱ्याचे सर्व सिक्रेट्स तिच्यासमोर उलगलडले.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : शर्टावर लिपस्टिकचा डाग, महिलेचा केस, शर्टाला परफ्युचा वास म्हणजे आपला बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याचं दुसऱ्या मुलीसोबत लफडं आहे असा संशय घेणारी फिल्ममधील हिरोईन आणि मग त्याचा पाठपुरावा करून त्याचं सत्य समोर आणणं. सामान्यपणे आपण फिल्ममध्ये नेहमी पाहत असलेले सीन. प्रत्यक्ष आयुष्यात एका महिलेसोबत असंच काहीसं घडलं. तिनंही आपल्या नवऱ्याची ही चोरी पकडली. मात्र तिच्या हाती पुरावा म्हणून लिपस्टिकचा डाग, केस किंवा परफ्युचा वास नाही तर चक्का एक चावी लागली. या एका चावीनं तिच्या नवऱ्याचे सर्व सिक्रेट्स तिच्यासमोर उलगलडले.

आज तकच्या रिपोर्टनुसार एका महिलेनं एका रिलेशनशिप पोर्टलवर आपल्या जोडीदारानं आपल्याला कसं फसवलं याचा अनुभव मांडला आहे आणि इतरांनाही सावध केलं आहे.

महिलेचं आधी लग्न झालं होतं, तिचा घटस्फोट झाला होता. आधीच्या पतीपासून तिला एक मूलही आहे. घटस्फोटानंतर ती ब्रँडन नावाच्या पुरुषाला भेटली.

महिला म्हणाली, "ब्रँडन श्रीमंत, स्मार्ट होता. मला एखाद्या राजकुमारीसारखं ठेवायचा. त्याला माझ्यासोबत लग्न करायचं होतं. मात्र माझ्या आधीच्या नवऱ्याचा अनुभव आल्यानंतर मला कोणतंही नवं नातं जोडण्यासाठी घाई करायची नव्हती. त्यासाठी थोडा वेळ हवा होता. मी त्याच्याकडून एक वर्षाचा वेळ मागून घेतला. एक वर्षानंतर ब्रँडननं मला लग्नासाठी पुन्हा विचारलं. ब्रँडन माझ्या मुलीचीही नीट काळजी घ्यायचा. सर्वकाही एकदम परफेक्ट होतं"

"पण इतरांना तो प्लेबॉय वाटायचा. माझे जवळचे मित्रमैत्रिणी मला त्याच्यापासून सतर्क राहण्याचा सल्ला द्यायचे. त्याचा स्वभाव पाहता तो लग्नबंधनात अडकून राहिल असं कुणालाच वाटायचं नाही. पण मला वाटलं कदाचित मला भेटल्यानंतर तो बदलला असावा.  35 व्या वाढदिवशी मला तो सिंगापूरला हॉलिडेवर घेऊन गेला आणि तिथं त्यानं मला लग्नासाठी विचारलं. मी अखेर त्याला हो म्हटलं. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आम्ही दोघांनी लग्न केलं. माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा क्षण होता"

हनीमूनच्या दोन आठवड्यानंतर ब्रँडन काही कामानिमित्त शहराबाहेर गेला. काही दिवसांनी तो घरी परतला आणि महिलेसाठी गिफ्ट घेऊन आला.

महिलेनं सांगितलं, "तो माझ्यासाठी फूल आणि एक सुंदर नेकलेस घेऊन आला. जेव्हा तो अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला तेव्हा मी त्याचं सामान आवरू लागली. त्याचे कपडे आवरत असताना जॅकेटच्या एका पाकिटातून एक चावी जमिनीवर पडली. मला वाटलं तो ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्या हॉटेलच्या रूमची चावी असेल"

तो अंघोळ करून आला तिनं त्याला या चावीबाबत सहजपणे विचारलं आणि तिला चावीमागील सत्य ऐकून धक्काच बसला.

महिला म्हणाली, "मला वाटत होतं तितकी ही छोटी गोष्ट नव्हती. ब्रँडननं मला मग खरंखरं सांगितलं. तो हॉटेलमध्ये एका महिलेला भेटायला गेला होता आणि घरी परण्यापूर्वीदेखील तो तिलाच भेटला होता. मला यापुढे काहच ऐकायचं किंवा बोलायचं नव्हतं. मी पूर्णपणे तुटले. हॉटेलच्या त्या एका चावीनं माझं लग्न मोडलं. मी त्याला घरातून बाहेर काढलं. माझा दुसरा नवराही तसाच निघाला. जर मी माझ्या मित्रमैत्रिणींचं ऐकलं असतं तर माझ्यावर ही वेळच आली नसती. हे नातं मला आनंद नाही तर एक चांगला धडा देऊन गेलं आहे" त्यामुळे कुणावरही लगेच विश्वास ठेवू नका, असा सल्लाही या महिलेनं दिला आहे.

Published by: Priya Lad
First published: December 10, 2020, 11:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या