• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • पार्लरमधील वेदनादायी प्रक्रिया विसरा; घरच्या घरी फक्त अंड्यानेच Blackheads पासून मुक्ती मिळवा

पार्लरमधील वेदनादायी प्रक्रिया विसरा; घरच्या घरी फक्त अंड्यानेच Blackheads पासून मुक्ती मिळवा

अंड्यांमधील पांढरा भाग वापरून तुम्ही ब्लॅकहेड्सच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. फक्त तो वापरण्याची पद्धत समजून घ्या.

 • Share this:
  मुंबई, 01 सप्टेंबर : सध्या श्रावण म्हणून कदाचित तुम्ही अंडं (Egg) खात नसाल पण जर तुमच्या फ्रिजमध्ये अंड असेल तर त्याचा तुम्ही तुमच्या सौंदर्यासाठी (Beauty tips) नक्कीच वापर करू शकता. अंडं जसं आरोग्यासाठी उत्तम तसं ते सौंदर्यासाठीही (Egg for beauty) उत्तम आहे. काही सौंदर्यप्रसाधनांमध्ये अंड्याचा (Egg use) वापर केला जातो हे आपल्यालाही माहिती आहे. याच अंड्याचा घरच्या घरी तुम्ही तुमच्या बऱ्याच समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता, विशेषतः ब्लॅकहेड्सची (Blackheads) समस्या. ब्लॅकहेड्स (Egg for Blackheads) सहजासहजी जात नाही. पार्लरमध्ये यासाठी वेदनादायी प्रक्रिया वापरली जाते. स्क्रब, क्रीमचा वापर करून त्याचे काही दुष्परिणाम जाणवतात. पण अंड्याने मात्र तुम्ही अगदी वेदना न होता सहजसोप्या पद्धतीने काही क्षणातच ब्लॅकहेड्सपासून मुक्ती मिळवू शकता. अंड्यांमधील पांढरा भाग वापरून तुम्ही ब्लॅकहेड्सच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. फक्त तो वापरण्याची पद्धत समजून घ्या. हे वाचा - Personality Development Tips: इतरांशी महत्त्वाचं बोलताना कधीही करू नका 'या' चुका अंडी आणि बेकींग सोडा - अंड्यातील पांढरा भाग काढून घेतल्यानंतर त्यात दोन चमचे बेकींग सोडा मिसळवून त्याची एकत्र पेस्ट तयार करा. त्या पेस्टला हळूहळू चेहऱ्यावर पांढरे डाग आणि पुटकुळ्या आलेल्या भागावर 5 मिनिटांपर्यंत लावा. पेस्ट लावल्यावर ती चेहऱ्यावर दहा मिनिटं ठेवा आणि चेहरा वाळल्यावर धुवून घ्या. अंडी आणि दलिया - काळे डाग हटवण्यासाठी स्क्रब करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. त्यासाठीच अंड्यातील पांढरा भाग आणि दलिया एकत्र करून हळूहळू चेहऱ्यावर लावा. त्यानंतर दहा मिनिटं तसंच ठेवून चेहरा धुवा. अंडी आणि मध - अंडी आणि उत्तम दर्जाचे मध एकत्र करून त्याची पेस्ट तयार करावी. चेहरा साफ केल्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. साधारणतः 20 मिनिटं पेस्ट चेहऱ्यावर राहील याची काळजी घ्या. आणि त्यानंतर चेहरा धूवा. अंडी आणि साखर - अंड्यातील पांढऱ्या भागासोबत साखर मिसळून त्याची पेस्ट तयार करावी. त्यानंतर त्या पेस्टने चेहऱ्याची सर्कुलर मोशनमध्ये मसाज करावं. दहा मिनिटं चेहऱ्यावर पेस्ट लावल्यानंतर सामान्य पाण्याने धुवून काढावी. हे वाचा - प्रेग्नन्सीत त्वचा झाली खराब? फेशियल, ब्लीच करण्याआधी ही माहिती वाचा सूचना - ही माहिती सामान्य माहिती म्हणून देण्यात आली आहे. याचा अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही.
  Published by:Priya Lad
  First published: