• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Personality Development Tips: इतरांशी महत्त्वाचं बोलताना कधीही करू नका 'या' चुका; अन्यथा पडेल महागात

Personality Development Tips: इतरांशी महत्त्वाचं बोलताना कधीही करू नका 'या' चुका; अन्यथा पडेल महागात

कोणाशी संवाद साधताना कोणत्या चुका करू नये? याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 • Share this:
  मुंबई, 31 ऑगस्ट: जीवनात प्रत्येकालाच चांगली पर्सनॅलिटी (Personality Development), चांगलं रूप आणि भरपूर पैसे हवे असतात. पण हे आपल्या सर्वांना मिळेलच असं नाही. जीवनात मिळणाऱ्या या सर्व गोष्टी आपल्या मेहनतीवर (Hard work) आणि परिश्रमांवर अवलंबून असतात. तसंच आपण कोणाशी कोणत्या पद्धतीनं वागतो, बोलतो यावरही आपलं यश (how to be Successful) अवलंबून असतं. ऑफिसमध्ये आपल्या सहकाऱ्यांशी किंवा वरिष्ठांशी उद्धटपणे बोललो तर आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. तसंच आपली पर्सनॅलिटी (Personality Development Tips) आणि इतरांशी आपलं वागणं चांगलं असेल तर आपल्याला यश (Personality Development for Success) मिळतच. पण स्वतःमध्ये हे बदल आणावे तरी कसे? कोणाशी संवाद साधताना कोणत्या चुका करू नये? याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही सर्वांचे लाडके व्हाल. चला तर मग जाणून घेऊया. हातातील वस्तूंशी खेळू नका जर कोणी तुमच्याशी बोलत असेल किंवा तुम्हाला काही समजावून सांगत असेल, तर अशावेळी तुमच्या हातात असलेल्या किल्ली, पेन्सिल, मोबाईल किंवा कागदाकडे लक्ष देऊ नका किंवा या वस्तूंशी खेळत राहू नका. याचा अर्थ तुम्हाला समोरील व्यक्तीच्या बोलण्यात रस नाही असा होतो. हा त्या व्यक्तीला अपमानही वाटू शकतो. आवश्यकतेपेक्षा जास्त बोलू नका मीटिंग दरम्यान जास्त हालचाल करू नका. तसेच, हे लक्षात ठेवा की आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी बोलू नका. तुम्हाला जस्त्र बोलण्याची सवय असेल तर ही सवय लगेच बदला. तसंच इतरांचं म्हणणं ऐकून घ्या आणि मग स्वतःचं म्हणणं मांडा. हे वाचा - तरुणांनो, नोकरी शोधताय? मग 'या' टॉप जॉब सर्चिंग अप्लिकेशन्स मोबाईलमध्ये आहेत ना? लगेच करा डाउनलोड डोकं किंवा गाल खाजवू नका कुणाशी बोलत असताना डोकं, कपाळ किंवा गाल खाजवू नका. ज्या व्यक्तिंना काहीच येत नाही किंवा समजत नाही असे व्यक्ती गाल किंवा डोकं खाजवतात.  हे तुम्हाला काहीतरी समजत नसल्याचं लक्षण आहे. म्हणूनच अशा गोष्टी टाळा. वारंवार कपडे बघू नका आपले केस किंवा कपडे वारंवार दुरुस्त करू नका. यावरून असं दिसतं की तुम्ही फक्त तुमची काळजी घेता, तुम्हाला समोरच्या लोकांच्या बोलण्यात रस नाही. त्यामुळे अशा चुका टाळा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: