Home /News /lifestyle /

प्रेग्नन्सीत त्वचा झाली खराब? फेशियल, ब्लीच करण्याआधी ही माहिती वाचा

प्रेग्नन्सीत त्वचा झाली खराब? फेशियल, ब्लीच करण्याआधी ही माहिती वाचा

त्यामुळे आपण कितीही ब्युटी प्रॉडक्ट लावले तरी, त्यांचा परिणाम चांगला होतोच असं नाही. चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी अनेक होम रेमेडी केल्या असतील तरीदेखील हे सोपे उपाय करून पहा. यामुळे त्वचा तजेलदार दिसायला लागेल.

त्यामुळे आपण कितीही ब्युटी प्रॉडक्ट लावले तरी, त्यांचा परिणाम चांगला होतोच असं नाही. चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी अनेक होम रेमेडी केल्या असतील तरीदेखील हे सोपे उपाय करून पहा. यामुळे त्वचा तजेलदार दिसायला लागेल.

गर्भावस्थेच्या काळात चेहरा सुंदर दिसण्यासाठी फेशियल, ब्लीच करण्याचा विचार करत असाल तर, त्याचे परिणाम आधी जाणून घ्या.

    दिल्ली, 29 ऑगस्ट: गर्भावस्थेच्या काळामध्ये (During  Pregnancy) संपूर्ण शरीरावर परिणाम झालेला असतो. महिलांना या काळामध्ये अनेक आरोग्यविषयक समस्या (Post pregnancy Health Issues) होत असतात. याशिवाय केस गळणं, चेहऱ्यावर पिंपल्स किंवा डाग येणं यासारखे त्रास व्हायला लागतात. अशा वेळेस एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल किंवा अगदी बेबी शॉवर असेल तर, सुंदर दिसण्यासाठी महिलांना फेशियल किंवा ब्लीच (Facial & Bleach) करण्याची इच्छा होते. मात्र ब्युटीपार्लरमध्ये जाऊन फेशियल किंवा ब्लीच करणं किती योग्य आहे अशी शंका मनामध्ये येत राहते तर,जाणून घेऊयात प्रिग्नन्सीच्या काळामध्ये फेशियल किंवा ब्लीच करणं किती सुरक्षित आहे. (जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे; कधीच लागणार नाही चष्मा) एखादा स्किन प्रॉब्लेम असेल तर ब्युटीशियन आपल्याला फेशियल किंवा ब्लीच करण्याचा सल्ला देतात. मात्र फेशियल किंवा ब्लीचसाठी वापरल्या जाणाऱ्या क्रीम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स (Chemical) वापरले जातात. हे केमिकल्स बाळ आणि आई दोघांचाही आरोग्यासाठी घातक असतात. तरीही जर ब्युटीपार्लरमध्ये जायची इच्छा असेल तर, एखाद्या स्वच्छतेकडे लक्ष देणाऱ्या ब्युटी पार्लरमध्ये जा आणि केमिकल फ्री फेशियल करा. मात्र गर्भवती महिलांनी ब्लिच मुळीच करू नये. (‘या’ पदार्थांबरोबर कधीच खाऊ नका पपई; नाहीतर होतील साईड इफेक्ट्स) केमिकलयुक्त क्रीमने नुकसान प्रिग्नन्सीच्या काळामध्ये महिलांच्या शरीरामध्ये हार्मोनल बदल होत असतात. अशा काळात महिलांची त्वचा सेन्सिटिव्ह झालेली असते. या वेळी केमिकलयुक्त फेशियल किंवा ब्लीच केल्यामुळे चेहऱ्यावर आलर्जी रॅशेस किंवा पिंपल्स होऊ शकतात. काही क्रिममध्ये जास्त प्रमाणात केमिकल्स वापरलेले असतात. याच्या वासामुळे महिलांना उलटी होण्याचा त्रास होऊ शकतो. काही महिलांना केमिकलयुक्त क्रिम्स मुळे श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ शकतो. हे केमिकल्स रोमछिद्रांमधून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. त्याचा बाळ आणि आईवर वाईट परिणाम होऊ शकतो. (सावधान! फ्रिजमध्ये किती काळ ठेवावा कोणता पदार्थ? जाणून घ्या Side Effect) ब्लिच करताना वापरल्या जाणाऱ्या फेशियल क्रिममुळे, ब्लिचमध्ये वापरल्या जाणाऱ्या ॲक्टिवेटरमुळे स्किनवर खाज येणं किंवा रॅशेस येणं असे त्रास होऊ शकतात. प्रिग्नन्सीच्या काळामध्ये फेशियल करायचं असेल तर, घरच्या घरी होम रेमेडीज वापरून करता येऊ शकतं. याकरता टोमॅटो संत्र्याचा रस केळं अशी फळ वापरता येऊ शकतात. (पालकांनो जपा आपल्या लहानग्यांना!कोरोनामुळे होतोय मुलांच्या मेंदूवर परिणाम;ऐका तज) याशिवाय बेसन,हळद,गुलाब पाणी टाकून त्याचा फेसपॅक देखील चेहऱ्यावर लावता येऊ शकतो. कोरफड जेल लावणं फायदेशीर असतं. उन्हाचा त्रास होत असेल तर, चेहऱ्यावर चंदन आणि मुलतानी मातीचा फेस पॅक लावू शकता. गर्भावस्थेच्या काळामध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक वस्तूंचा वापर करावा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pregnancy, Pregnant woman, Skin care

    पुढील बातम्या