मुंबई, 30 सप्टेंबर : लहान मूल (children) म्हटलं की त्यांचा आवडता आणि सर्वात जवळचा मित्र म्हणजे टेडी बिअर (Teddy bear). प्रत्येक मुलाकडे असा टेडी असतोच. हा टेडीच त्यांना पहिला मित्र, सोबती असतो. झोपताना, खेळताना, खाताना, फिरायला जाताना हा टेडीच त्यांच्या हातात असतो. फार फार मुलींचं म्हणाल तर काही मुलींना बार्बी डॉल आवडते. पण एखाद्या लहान मुलाला हाडांचा सापळा (skeleton) आवडतो असं सांगितलं तर आश्चर्यच वाटेल ना. नुसता हाडांचा सापळा पाहिला तरी बहुतेक मोठ्या माणसांनाही भीती वाटते. मात्र हाच हाडांचा सापळा अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरड्याचा बेस्ट फ्रेंड आहे. यूएसच्या उटाहमधील दोन वर्षांचा थिओ. त्याचा खास दोस्त बेन्नी. हा बेन्नी म्हणजे 5 फूट उंच हाडांचा सापळा आहे. या दोघांच्याही मैत्रीची सध्या सोशल मीडियावर रंगते आहे.
थिओची आई अबिगेल ब्रेडीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला मुलगा आणि त्याच्या विचित्र मित्राचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिनं थिओ आणि बेन्नीची नेमकी भेट कशी झाली तेदेखील सांगितलं आहे. हे वाचा - VIDEO : 36 सेकंदात 20 लाख लंपास; अवघ्या 11 वर्षांच्या मुलाने बँकेत मारला डल्ला घराचं बेसमेंट साफ करत असताना थिओला तिथं हे हाडांचा सापळा सापडला. तेव्हापासून तो त्याचा मित्र झाला आहे. त्याचं नाव त्याने बेन्नी असं ठेवलं. त्याच्यासाठी हे एक खेळणं बनलं. हे खेळणं थोडं नाही खूपच विचित्र असलं तरी आता अबिगेलला ते पचनी पडलं आहे.
थिओ आणि बेन्नी नेहमी एकत्र असतात. थिओ बेन्नीसोबत खेळतो, खातो, झोपतो, अभ्यास करतो इतकंच नव्हे तर बाहेर फिरायला, शॉपिंगला, घरातील सामान खरेदी करायला, पार्कमध्ये आणि रेस्टॉरंटमध्येही त्याला घेऊन जातो. बेन्नीशिवाय थिओ कुठेच जात नाही असं अबिगेलने सांगितलं. जर बेन्नीला नेणार नाही असं सांगितलं तर थिओदेखील कुठेही जाण्यास थेट नकार देतो. हे वाचा - Viral Video : आजीचे प्राण वाचविण्यासाठी लहानग्याने केला उधळलेल्या वळूशी मुकाबला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका हाड्याचा सापळ्यासोबत राहणाऱ्या या चिमुरड्याला पाहून त्यावर संमिश्र अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या. बहुतेक नेटिझन्सची या चिमुरड्याचं कौतुक केलं आहे, त्याच्या हिमतीला दाद दिली आहे. अनेकांना त्याचं हे विचित्र खेळणं पाहून आपलं हसू आवरता आलं नाही. तर काहींनी त्याची आई त्याला हे खेळणं म्हणून कसं काय देऊ शकते, असा प्रश्नही उपस्थित केला.

)







